शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०१९

स्वाभिमान

खरपूस • वात्रटिका
 
स्वाभिमान
टिकून-टिकून किती दिवस
स्वाभिमान टिकणार आहे
पोराबाळांसकट तो आता
म्हणे पक्षही विकणार आहे

सत्ताप्राप्ती हेच ध्येय
आणि तेच धोरण असते
कार्यकर्त्यांची इच्छा सांगणे
फक्त तेवढंच कारण असते
• रघुनाथ सोनटक्के

(३१ ऑगस्ट २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २७)

सोशलमिडीया

खरपूस • वात्रटिका
 
सोशलमिडिया
सोशलमेडियाच्या झोताने
येतात लोक उजेडात
कुणी होतो बदनाम तर
कुणी स्टार रातोरात

जाहिरातीच्या या जगतात
प्रसिद्धी रोज हवी असते
रोज घडणारी गोष्टही
कधी खुप नवी असते

दुधारी हे शस्त्र आहे
वापरणार्‍यावर ठरतं
कधी उगीच त्रासदायक
तर कधी असरदार ठरतं
• रघुनाथ सोनटक्के

(२८ ऑगस्ट २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २७०)

गुरुवार, २९ ऑगस्ट, २०१९

मानबिंदू

खरपूस • वात्रटिका

मानबिंदू

बॅडमिंटचं अजिंक्य
जिंकली आहे सिंधू
स्थापित केला भारताने
तिथंही मानबिंदू
• रघुनाथ सोनटक्के

(२ऑगस्ट २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २६९)

बुधवार, २८ ऑगस्ट, २०१९

आवकजावक

खरपूस • वात्रटिका

   • आवकजावक •
पक्षापक्षात आवकजावक
खुप मोठी वाढली आहे
प्रलोभनांच्या चुंबकाने
जुनी धेंडही ओढली आहे

पहिल्यासारखा पक्षनेतृत्वाचा
धाक उरला नाही
जनतेला बांधील असणारा
खाक उरला नाही

• रघुनाथ सोनटक्के

(२८ ऑगस्ट २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २६८)
 

मंगळवार, २७ ऑगस्ट, २०१९

मंदीचा फटका

खरपूस • वात्रटिका

• मंदीचा फटका •
सर्वसामान्यालाच बसतो आहे
मंदीचा दाहक फटका
उद्योग-व्यवसाय मोजताहेत
काही शेवटच्या घटका

कंपन्याही करताहेत
नोकरांची मोठी कपात
भरडल्या जातो सामान्य
काही आहेत सुपात

• रघुनाथ सोनटक्के
शब्दरसिकचा दिवाळी अंक येथे बघा:http://bit.ly/ShabdRasik-2018

(२ ऑगस्ट २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २६७)
 

शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१९

भ्रष्टाचारी नेता

खरपूस • वात्रटिका

• भ्रष्टाचारी नेता •
पदाचा फायदा घेऊन
करे भ्रष्टाचाराचा खेळ
कधीतरी येतेच मग
आतमधे जायची वेळ

भ्रष्टाचारी सापांचा अशा
पडतो आहे देशाला विळखा
समर्थन करणार्‍या पक्षांना
येतो तरी किती मोठा पुळका!

• रघुनाथ सोनटक्के

(२३ ऑगस्ट २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २६५)

गुरुवार, २२ ऑगस्ट, २०१९

जत्रा

खरपूस • वात्रटिका
« जत्रा »
कुणाला हवा आशिर्वाद
कुणाची वेगळीच जत्रा
अशा मतलबी राजकारणाचा
जास्तच आहे खतरा
• रघुनाथ सोनटक्के
(दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १६४)

बुधवार, २१ ऑगस्ट, २०१९

विरोधकांचं दमन

खरपूस • वात्रटिका
  • विरोधकांचं दमन •
राजकारण रंगत चाललं
कुणामागे लागली ईडी आहे
संस्थाचा गैरवापर करण्याची
सवय काय आजची थोडी आहे!

सत्ताधार्‍याकंडून हरतर्‍हेने
विरोधकांचं दमन असते
सत्तेला शहाणपण सांगणे म्हणजे
पालथ्या घड्याला नमन असते

• रघुनाथ सोनटक्के

(२१ ऑगस्ट २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २६३)
 

शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०१९

पुराचा वेढा

खरपूस • वात्रटिका
« पुराचा वेढा »
पुरानं वेढलं आहे
कोल्हापूर आणि सांगली
मदतकार्यात प्रशासन थीटं
अब्रु वेशीवरच टांगली

खायला हवं अन्न-पाणी
पोहचायला हव्यात बोटी
समाजसेवी गेले धाऊन
यंत्रना पडत आहे थीटी
• रघुनाथ सोनटक्के
(दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २५८)
शब्दरसिकचा दिवाळी अंक येथे बघा:http://bit.ly/ShabdRasik-2018

गुरुवार, ८ ऑगस्ट, २०१९

पुराची विपदा

पुराची विपदा

जिथेजिथे बिकटस्थिती
साचलेले पाणी आणि पूर
संकटात धावून लगेच
करा लोकांची विपदा दूर

कठिण प्रसंगी अशा
मदतीला धावले पाहिजे
एकमेका सहाय्य करण्या
दोन हात लावले पाहिजे

पूर, भूकंप आदी विपदा
म्हणजे कठीण घटका असते
माणुसकी दाखवली तरच
संकटातून सुटका असते

• रघुनाथ सोनटक्के
ब्लाॅग : https://vatratika.blogspot.in

 (८ ऑगस्ट २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २५६) 
Vatratika, Raghunath Sontakke

 

बुधवार, ३१ जुलै, २०१९

पक्षबदलाचे वारे

खरपूस • वात्रटिका
« पक्षबदलाचे वारे »
 जिकडेतिकडे वाहतायत
पक्षबदलाचे वारे
ऐन मोसम पाहून फिरले
जूने, जाणते सारे

कुठे भगदाड पडले
घराचेही फिरले वासे
धाकाने तर कुठे लोभाने
गळाला लागले मासे

विरोधी पक्ष सगळे
पडले आहेत खाटेवर
सत्तेच्या मोहापायी
मोहरे निघाले वाटेवर

• रघुनाथ सोनटक्के 

शब्दरसिकचा दिवाळी अंक येथे बघा: http://bit.ly/ShabdRasik-2018 

(३१ जुलै २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २५०)
Marathi Vatratika

खड्डे

« खड्डे »


रस्त्यांची खड्डयांना
अन् खड्डयांची रस्त्यांन‍ा
गरज भासु लागली
माणसं चालली जीवानं
करांचा जनता भार सोसु लागली

नेमीची येतो पावसाळा
अविरत फिरणारं खड्डयांचं 'जातं'
पालिकेला काही फरक नाही
म‍ाध्यमांनी चालवलं जरी अविरत भातं

करोडो रुपये खर्चुन शेवटी काय ?
हाती पडतो मातीचा चुरा
खड्डयांनाही घ्यावा लागतो पुर्नजन्म
त्यांनाही चुकला ना फेरा
• रघुनाथ सोनटक्के
ब्लाॅग : https://vatratika.blogspot.in

 (३० जूलै २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २४९) 
Marathi Vatratika

सोमवार, २९ जुलै, २०१९

जागावाटप आणि बळ

खरपूस • वात्रटिका
 
« जागावाटप आणि बळ »
जागावाटपाने सगळ्यांचा
जोरात चालला खल आहे
निकालानंतर कळेलच
कुणाचं किती बल आहे

आता तर प्रत्येकातच
दहा हत्तीचं बाहू बळ आहे
शेवटी कोणाची, कधी दाबावी
'त्याच्या'च हाती कळ आहे
• रघुनाथ सोनटक्के
(२९ जूलै २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २४८)
Marathi Vatratika

शनिवार, २७ जुलै, २०१९

भिती आणि लालसा



« भिती आणि लालसा »
काहींना आहे पराभवाची 
भिती आणि लालसा
त्यांच्यामुळे पक्षांचे गड
होतात हळूहळू खालसा
• रघुनाथ सोनटक्के

 २७ जूलै २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २४७
Marathi Vatratika
 

शुक्रवार, २६ जुलै, २०१९

पावसाची प्रतिक्षा

खरपूस • वात्रटिका

« पावसाची प्रतिक्षा »
पावसा तू तर भरपूर
पुण्या-मुंबईत पडला
विकासासारखाच इथंही
अन्याय आम्हावर घडला

थोडासा शिरकावा पडला होता
रोप आता करपली आहेत
तुझ्या येण्याची वाट पाहत
लेकरं तुझी तरसली आहेत

माना टाकल्यात पिकांनी
पानं आता आवरली आहेत
आत्महत्येच्या विचाराने आता कुठं
पोरं तुझी सावरली आहेत

• रघुनाथ सोनटक्के


( जुलै २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २४६)
Marathi Vatratika

गुरुवार, २५ जुलै, २०१९

हिमा दासचे यश

खरपूस • वात्रटिका
 
हिमा दासचे यश
पाच गोल्ड जिंकले
एकट्या दास हिमाने
उंचावली देशाची मान
मोठ्या अभिमानाने

शेतकऱ्याच्या पोरीने
देशाचे नाव कोरले आहे
तिचे यश देशालाही
अद्वितीय ठरले आहे

एकाच खेळामागे न जाता
बहूआयामी धोरण आखले पाहिजे
भंपकपणा होणार नाही याचे
माध्यमांनी भान राखले पाहिजे
• रघुनाथ सोनटक्के
( जुलै २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २४)  

Marathi Vatratika

बुधवार, २४ जुलै, २०१९

चंद्रावर पाऊल

खरपूस • वात्रटिका
 
« चंद्रावर पाऊल »
चांद्रयान एकदाचं
आकाशात पोचलं आहे
मानाचं पान आणखी
भारताने खोचलं आहे

विज्ञान आणि चिकाटी
त्याचंच हे फलित आहे
सक्षमीकरणाचं पाऊल
आणि क्षमता मुलींत आहे

स्वदेशीच्या आधारे आपली
चंद्रावर ही स्वारी आहे
खऱ्या अर्थाने आता
आपण जगात भारी आहे
• रघुनाथ सोनटक्के
( जुलै २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २४)
Raghunath Sontakke

मंगळवार, २३ जुलै, २०१९

दावेदार

खरपूस • वात्रटिका
 
« दावेदार »
निकाला आधीच दोघे
पदावर दावा मांडायला लागले
नैसर्गिक मित्र असूनही
दुश्मनासारखे भांडायला लागले


एकत्र लढायला तयार
कारण मित्र हवा असतो
पदाच्या खुर्चीवरही मात्र
जोरदार त्यांचा दावा असतो
• रघुनाथ सोनटक्के
(२३ जूलै २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २४३)
Raghunath Sontakke

इधरभी उधरभी

खरपूस • वात्रटिका

« इधरभी उधरभी »
सावलीत राहून मला
फळे गोड चाखायचे
राबायला फक्त 'आवडतं'!
पण शेत मला राखायचे

मोसम आला कि फक्त
उंटावरून शेळ्या हाकायच्या
दोन्ही घरचं खाऊन
नुसत्या पाट्या टाकायच्या

• रघुनाथ सोनटक्के
( जुलै २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २४)
Raghunath Sontakke

शनिवार, २० जुलै, २०१९

वृक्षारोपण

खरपूस • वात्रटिका
 
 « वृक्षारोपण »
 वृक्षारोपण आजकाल
फोटोपुरते उरते आहे
प्रसिद्धीसाठीच फक्त
हा कार्यक्रम ठरते आहे

स्वच्छ कपड्यातील नेता
झाडांना हळूच टेकतो आहे
तेवढ्यापुरते चेला त्याचा
फोटोच नुसते टिपतो आहे

रघुनाथ सोनटक्के


(२० जुलै २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २४)
२८ जुलै २०१९ च्या दै. वाचकमंच मधे प्रकाशित
Raghunath SontakkeRaghunath Sontakke