खरपुस । वात्रटिका
गोळी देवून अफुची
भलताच कुणी पेटतोय
भरदिवसा पुरोगाम्याला
सार्यादेखत लुटतोय
बुध्दीवादी, सुधारकही
अधर्मामुळे मिटतोय
अहिंसात्मक धर्माचा
तोल का असा सुटतोय
असहिष्णूता, सुड, हिंसा
हाच आता धर्म वाटतोय
मानवतेच्या पुजार्याला बघा
काय 'प्रसाद' भेटतोय
खुनी आणि पुजार्यातला
भेद आता मिटलाय
देव पाण्यात ठेवून
धर्मच आता बाटलाय
भलताच कुणी पेटतोय
भरदिवसा पुरोगाम्याला
सार्यादेखत लुटतोय
बुध्दीवादी, सुधारकही
अधर्मामुळे मिटतोय
अहिंसात्मक धर्माचा
तोल का असा सुटतोय
असहिष्णूता, सुड, हिंसा
हाच आता धर्म वाटतोय
मानवतेच्या पुजार्याला बघा
काय 'प्रसाद' भेटतोय
खुनी आणि पुजार्यातला
भेद आता मिटलाय
देव पाण्यात ठेवून
धर्मच आता बाटलाय
• रघुनाथ सोनटक्के
तळेगाव दाभाडे, पुणे
मो. 8805791905
४ सप्टेंबर २०१८ च्या सायबर क्राईम मधे प्रकाशित
२६ ऑगस्ट २०१८ च्या डहाणू मित्रमधे प्रकाशित



























