रविवार, ६ मे, २०१८

आरोप-प्रत्यारोप

« आरोप-प्रत्यारोप »



निवडणूकीच्या तोंडावरच
आरोपांच्या फैरी झडत असतात
एरवी सन्मान करणारेही
वैर्‍यासारखे लढत असतात

बिनबुडाचे बिनधास्त
आरोप केले जातात
निकाल लागल्यावर मात्र
निरोप दिले जातात

आरोप-प्रत्यारोपाने जोरदार
हल्ला केल्या जातो
मतदारांना सजग राहण्याचा
सल्ला दिल्या जातो

केलेल्या आरोपांचा त्या
निकाल कधीच लागत नाही
रणधूमाळीनंतर त्यांचा 
हिशेब कुणीच मागत नाही

आरोपांच्या हल्ल्याने मतदार
विचलित केल्या जातो
एकवेळ 'शिक्का' बसल्यावर
त्याला 'ठेंगा' दिल्या जातो

• रघुनाथ सोनटक्के
   तळेगाव दाभाडे, पुणे
   मो.8805791905

(दि १० मे २०१८ च्या दै. 'युवा छत्रपती' या लातूरच्या दैनिकात प्रकाशित )
Yuva Chhatrapati-Raghunath Sontakke



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks to comment on my blog. :)