• ख र पु स । वा त्र टि का •
« आत्महत्या »
परिक्षा, ताणतणाव, गरिबी
कारणं हजार असतात
धीर, आत्मबळाने सामना
काहीजण करत असतात
संकटे येतच राहणार
परिस्थितीला तोंड द्यावं लागतं
अपयश, हानी भरून निघेन
असं समजावुन घ्यावं लागतं
आलेल्या परिस्थितीवर धीराने
मात करायला हवी
अंधार्या रात्रीतुन सुर्य उगवणाची
बात करायला हवी
• रघुनाथ सोनटक्के©
मो. 8805791905
शब्दरसिकचा मे अंक: https://bit.ly/RasikMay18
वात्रटिकासंग्रह: https://goo.gl/7CcLUw
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks to comment on my blog. :)