मंगळवार, १९ जून, २०१८

शिक्षणाचा बाजार

• ख र पु स । वा त्र टि का •
« शिक्षणाचा बाजार »
Calligraphy by Raghunath Sontakke

सरकार लेखी खुली झाली
शिक्षणाची दारं
अजुनही मोलमजूरी करतात
गरिबाची पोरं

शिक्षणाची मंदिरं झालीत
पैशावाल्यांची खुली दुकानं
झोपड्या राहिल्या अशिक्षित 
देखावेबाज झाली मनं

फि, डोनेशनच्या नावाखाली
गरिबाचं चाललं शोषण
'वाघिणीचं दूध' कोण पितं?
'बडे'च तर करतात मलई प्राशन

कुणी झालं 'शिक्षणसम्राट'
हातोहात डिग्र्या लागल्या मिळू 
भ्रष्ट लोकांच्या बाजारात
ज्ञानीजन खरा लागला सडू

सरकारही करतं डोळेझाक
मग यांना मिळतं मोकळं कुरण
शिक्षणाचा मांडला 'बाजार'
होतकरूंचा होत चाललं मरण


• रघुनाथ सोनटक्के
    तळेगाव दाभाडे, पुणे 

    मो. 8805791905


शब्दरसिकचा मे अंक: https://bit.ly/RasikMay18

वात्रटिकासंग्रह: https://goo.gl/7CcLUw

दिवाळी अंक २०१७: https://goo.gl/RxRw8g


२२ जून २०१८ च्या दै. डहाणू मित्र मधे प्रकाशित व  २८ जून २०१८ च्या दै. नवाकाळ मधे प्रकाशित 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks to comment on my blog. :)