गुरुवार, ३० मे, २०१९

मुलींची बाजी

« मुलींची बाजी »
प्रत्येकवेळी निकालात
मुलींचीच बाजी असते
विक्रमाचा परीघ ओलांडणे
घटना आता ताजी असते

समाज रोज तिच्या
परीक्षावर परीक्षा घेत असतो
जुलमी काळासोबतही
सामना तिचा होत असतो

नुसते शिक्षित न होता
खरी परीक्षाही पास व्हावी
मुलीबद्दल चुकीची वागणूक
समाजातून आता ऱ्हास व्हावी
• रघुनाथ सोनटक्के (पुणे)
  मो. ८८०५७९१९०५
 (३० मे २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १८)
३१ मे २०१९ च्या दै. पथदर्शी मधे प्रकाशित

बुधवार, २९ मे, २०१९

घराणेशाहीची बिमारी

« घराणेशाहीची बिमारी »
पराभवानंतर घराणेशाही
जिव्हारी लागली आहे
जेष्ठांना पुत्रप्रेमाची म्हणे
बिमारी लागली आहे

यशात सारं काही
नगण्य म्हणून सोडलं जातं
चिंतनात बारीकसारीकही
सहजपणे ताडलं जातं

घराणेशाहीवरच आतापर्यंत
दम काढला आहे
घराणेशाहीनेच घराणेशाहीला  
घाम फोडला आहे
• रघुनाथ सोनटक्के (पुणे)
  मो. 
८८०५७९१९०५
 (२९ मे २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १९९)
Kharpus Vatratika
 
 
 
 
 

मंगळवार, २८ मे, २०१९

सत्तेचं स्वप्न

सत्तेचं स्वप्न

लहानसहान नेत्यांनाही 
भावीपणाचा आव होता
अॅन्टी-इंकबसीच्या नादात
नको तेवढा भाव होता

भेल मोठे आकडे मिळतील
स्वप्न आता भंगलं आहे
सत्तेच आसन तर दूरच
तुम्ही विरोधातच चांगलं आहे
• रघुनाथ सोनटक्के
 
(२८ मे २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १९८)
Kharpus Vatratika
 

शुक्रवार, २४ मे, २०१९

निकाल

« निकाल »

निकालात कुणी हरलं आहे 
तर कुणी थोडं तरलं आहे 
कुणाची फिरली लाट 
तर कुणाचं नाणं वधारलं आहे 

कुणाचा झाला पप्पू 
कुणी झाला फेल आहे 
भ्रमनिरास झाल्याने 
सत्ताधारी मात्र ट्रोल आहे 

हरणाऱ्याने करावं चिंतन 
जिंकणाऱ्याचं गाडं हललं आहे
आत्मस्तुती सोडून जाणावं 
जनतेच्या मनात काय चाललं आहे
• रघुनाथ सोनटक्के (पुणे)

 दिवाळी अंक: https://bit.ly/ShabdRasik-2018
  ईबुक वाचा:https://bit.ly/KharpusVatratika1

२ डिसेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ६४)
आणि दै. कोकण सकाळ मध्ये प्रकाशित
(२४ मे २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १९५)


Kharpus Vatratika



विजयाचा ढोल

« विजयाचा ढोल »
कुणाचा मुद्दा विकासाचा
कुणाचं जातीचं समिकरण
कुणाची वाढली टक्केवारी
तर कुणाचं झालं वस्त्रहरण 

नाटोलाही मतं गेली
वाढला लोकांच्या नाराजीचा सुर
जिंकल्याच्या आनंदात निघाला
बघा कसा विजयाचा धूर

मान्य करा पराभवही
जाणुन घ्या जनतेचा हा कौल
विकासाची वाहू द्या गंगा
वाजवु नका नुसता आता ढोल
• रघुनाथ सोनटक्के
मो. 8805791905
ईबुक: https://goo.gl/aY6hVB
ब्लॉग: https://vatratika.blogspot.in
(२३ मे २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १९४)
Kharpus Vatratika
 

गुरुवार, २३ मे, २०१९

निकालाचा अंदाज


« निकालाचा अंदाज »

कुणाचं गणित जुळेना
कुणाचा जातोय आकडा पार
अंदाज हा अंदाज असतो
नसतो जसाच्या तसा फार

घातलं जरी कुणी कितीही
विजयासाठी खूप साकडं
जनतेचा ताकदीने मात्र
दिसू शकते चित्रं वेगळं

कुणी करेल विजयाचा जल्लोष 
कुणाचे पराभवाचे मंथन
निकाल जसा येतो जवळ
वाढलं आहे ह्रदयाचं स्पंदन
• रघुनाथ सोनटक्के

२२ मे २०१९ दै. पथदर्शी मधे प्रकाशित 
२3 मे २०१९ दै. वाचकमंचमधे प्रकाशित 
(२२ मे २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १९३)


मंगळवार, २१ मे, २०१९

आकड्यांचा खेळ

• ख र पु स । वा त्र टि का •
« आकड्यांचा खेळ »
Calligraphy by Raghunath Sontakke

मतदान झालं की सुरू होतो
आकड्यांचा खेळ
सत्तेसाठी जमतो बरोबर 
युती-आघाडीचा मेळ

कुणी ठेवतो ओलीस
कुणी विकल्या जातात
देवाणघेवाणीच्या बदल्यात
आपली मतं म‍ापल्या जातात

निवडणुकीआधी मतांची 
दलाली केल्या जाते
आपल्या मतांना सोयीस्कर
हवाली केल्या जाते
• रघुनाथ सोनटक्के©
  मो. 8805791905

शब्दरसिकचा एप्रिल अंक: http://bit.ly/Rasik-Apr18
वात्रटिकासंग्रह: http://goo.gl/7CcLUw
दिवाळी अंक २०१७: https://goo.gl/RxRw8g

(१९ मे. २०१८ च्या 'दै. युवा छत्रपती' मधे प्रकाशित)
(२१ मे २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १९२)

रविवार, १९ मे, २०१९

मोर्चे

• ख र पु स । वा त्र टि का •
Calligraphy by Raghunath Sontakke

« मोर्चे »


एकमेकांविरोधात मोर्चा काढण्याचा
हुरूप चढला अ‍ाहे
शिवराय, भिमराय बघा तुमचा महाराष्ट्र
कसा घडला आहे


धर्मजातीसाठी समाजात 
विष पेरू लागले 
मागण्या, दबावासाठी कसे 
वेठीस धरु लागले


धर्म, पुतळे, सत्तेसाठी
उघड बोलू लागले
गरिबी, भ्रष्टाचाराविरोधात मात्र
कांदे सोलू लागले


संपवा द्वेष, दुही, भेद
संकुचित विचार दुमू लागले
जिकडे बघावे तिकडे
मोर्चांचे वारे घुमू लागले

• रघुनाथ सोनटक्के©
    मो. 8805791905

शब्दरसिकचा मार्च अंक: https://goo.gl/NnhtL4
रघुनाथ सोनटक्के यांचा वात्रटिकासंग्रह: https://goo.gl/7CcLUw
दिवाळी अंक २०१७: https://goo.gl/RxRw8g
(१८ मे २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १९१)
Raghunath Sontakke

 

शुक्रवार, १७ मे, २०१९

छावणी

• ख र पु स । वा त्र टि का •
« छावणी »
दुस्कायातही काही भामटे
छळून रायले छावणी
बाक्या परसंगातही सायाचे
लावून रायले लावणी

माणसाच्या हिशाचं खाल्लं
आता जनावरावर भिळ्ळे
त्यातई भेटते का माल
पाऊन रायले सळ्ळे
• रघुनाथ सोनटक्के
(१७ मे २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १
Raghunath Sontakke




गुरुवार, १६ मे, २०१९

फेकुगिरी

• ख र पु स । वा त्र टि का •
 
« फेकुगिरी »

कितीही मोठा असला तरी
थोडा का होईना फेकू असतो
स्वत:ची फुशारकी मारायला
अतर्क्य गोष्टींचा टेकू असतो

फेकाफेकी करण्याची
सगळ्यांनाच बाधा झाली आहे
फोकळपणाच्या दाव्यांनांही
लज्जा मोठी आता झाली आहे
• रघुनाथ सोनटक्के©
 (१६ मे २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १८९)
Vatratika
 

बुधवार, १५ मे, २०१९

एक्झीट पोल

• ख र पु स । वा त्र टि का •
« एक्झीट पोल »
कोण होईल एक्झीट
कोण जाईल खोल
ज्याच्या त्याच्या मनात
वेगवेगळा पोल

दाखवली जाते जागा
दिली जाते चाबी
कुणी होईल पायउतार
कुणाला मिळेल गादी

शेवटी निकाल सांगतो
कुणाच्या मागे कौल
खोटे पडते तज्ञाचे मत
उरत नाही मोल
• रघुनाथ सोनटक्के©
  मो. 8805791905

शब्दरसिकचा एप्रिल अंक: http://bit.ly/Rasik-Apr18
वात्रटिकासंग्रह: http://goo.gl/7CcLUw
दिवाळी अंक २०१७: https://goo.gl/RxRw8g

(१५ मे २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १८
Vatratika

मंगळवार, १४ मे, २०१९

वाचाळपणा

खरपुस । वात्रटिका


« वाचाळणा »

बोलण्यात आजकाल कुणाच्या 
'राम' उरला नाही
काल का बोलले त्यात आज
'दम' उरला नाही

प्रत्येकाला आपला कसाही करून 
ढोल वाजवायचा असतो
वेळ पाहून सत्ता, पैशाचा
अहम दाखवायचा असतो

काहीही करण्याचं असल्या धुंदीत
वचन दिलं जातं 
सारवासारव करून माफीनाम्याचं 
वाचन केलं जातं 


• रघुनाथ सोनटक्के
१२ सप्टेंबर २०१८ च्या दै. डहाणू मित्र  मधे प्रकाशित 
(१४ मे २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १८७)
Vatratika

उजळणी

« उजळणी »
त्यांनी केले कांड-घोटाळे
त्यांनीच केली फाळणी
त्याच त्याच त्या रडगाण्याची
कितीदा ही उजळणी

त्यांनी केलेल्या पापांचं
फोडणार किती वेळा खापर
राजकिय फायद्यासाठी अजून
करणार किती त्याचा वापर

जुने मुद्दे उकरून कुणाचा
काय होईल फायदा?
तुम्हीही केला होता जनतेशी
विकासाचा वायदा!

त्यांनी तसं केलं म्हणुन
तुम्ही असं करू नका
तुमच्याही कामाचा हिशेब देताना
तुमचं हसं करू नका

   • रघुनाथ सोनटक्के
     मो. 8805791905
ईबुक: https://goo.gl/aY6hVB

 (१३ मे २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १८६) 
Vatratika

शनिवार, ११ मे, २०१९

दुष्काळाचा दौरा

खरपूस • वात्रटिका
   « दुस्काळी दौरा »
कामासाठीच प्रत्येकाला
दुष्काळाचा दौरा भावला आहे
प्रचारापासून सुटल्यावर लगेच
पायाला भवरा लावला आहे

दुष्काळाच्या झळांनी कंठाशी
सगळ्यांचा प्राण आला आहे
एसीमध्ये बसणार्‍यांना बघा
बिनकामाचा घाम आला आहे

• रघुनाथ सोनटक्के

शब्दरसिक दिवाळी अंक: http://bit.ly/ShabdRasik-2018
 
(११ मे २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १८५)

(१६ मे २०१९ दै. पथदर्शी)
VatratikaVatratika

शुक्रवार, १० मे, २०१९

चुनावी जुमला

खरपूस • वात्रटिका

« चुनावी जुमला »
निवडणूक काळातच निघतात
घोटाळे अन् सिड्या बाहेर
कुणी देतो छुपा टेकू 
तर कुणाचा असतो घरचा आहेर


कुणाचे 'घोडे' घेतल्या जातात विकत
तर कुणाचं निघतं गंगेत न्हाऊन
जनतेला 'उल्लू' बनवायला मग
फिरतात कार्यकर्ते दारू पिऊन


जाहीरनामा, वचन अ्न वादे
असतो साराच 'चुनावी जुमला'
एकदा का झालं मत'दान'!
मग विकासाच्या नावानं बोंबला
• रघुनाथ सोनटक्के
(१० मे २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १८४)

Vatratika

गुरुवार, ९ मे, २०१९

सभ्यतेची पातळी

खरपूस • वात्रटिका

« सभ्यतेची पातळी »
राजकारणात सभ्यतेची
पातळी आता घटू लागली
वैयक्तिक लक्तरे, लाज काढत
मोठी-मोठीही सुटू लागली

मुद्दे सोडून गाडी
भलतीकडेच पळू लागली
घडू नये अशी घटना
रोजरोज घडू लागली

भीती असली कि मनात
भल्याभल्यांची जीभही घसरते
कामांची चर्चा न होता
मैदानात धूळच जास्त पसरते

• रघुनाथ सोनटक्के
(९ मे २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १८३)
Vatratika

बुधवार, ८ मे, २०१९

अंदाज

खरपूस • वात्रटिका

« अंदाज »
काहींचे भाकित आहे
तर काहींचा अंदाज आहे
फोकस घेतो प्रत्येकजण
माध्यमांचा तर धंदाच आहे

कुणाचा होईल पराभव
कुणाचं नशीब फळफळेल
आता कितीही केल्या चर्चा
तरी निकाल वेळेवरच कळेल

• रघुनाथ सोनटक्के
(८ मे २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १८२)
Vatratika
 

मंगळवार, ७ मे, २०१९

गरिबाची पिळवणूक

खरपूस • वात्रटिका

      « गरिबाची पिळवणूक »
गरिबाला जागोजागी अजून
नाहक छळल्या जाते
एकी नसली कि त्यांच्यात
तर्‍हेतर्‍हेने पिळल्या जाते

हक्क आणि अधिकारासाठी
वंचित आता पेटला आहे
बाजारूंना ताळ्यावर आणायला

तोही आता एकवटला आहे
• रघुनाथ सोनटक्के

(७ मे २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १८१)
Vatratika

सोमवार, ६ मे, २०१९

बगळे

खरपूस • वात्रटिका

   « बगळे »
लोकसभा आटोपल्यावर
विधानसभेची पेरणी आहे
थोड्या विश्रामानंतर पुन्हा
मतदाराच्या चरणी आहे
 
नव्या मुद्दयांवर नवी भाषणे
तेच ते नेते सगळे आहेत
ध्यान लावून बसलेले
मासे टिपणारे बगळे आहेत

• रघुनाथ सोनटक्के

(६ मे २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १८०)
Vatratika

शनिवार, ४ मे, २०१९

नक्षली हल्ला

खरपूस • वात्रटिका
« नक्षली हल्ला »
विचाराची साथ सोडून
नक्षल्यांचा लढा आहे
एकसंघ भारताच्या शांतीला
थोडा-थोडा तडा आहे

प्रवाह, लोकशाही सोडून
न्याय मिळणार नाही
हिंसाचाराच्या रक्ताने
विकास फळणार नाही

माणसांचा जीव घेणारी
बंदकीची गोळी असते
फलित मात्र काही नाही
दुःख, गरिबीची झोळी असते

• रघुनाथ सोनटक्के
(४ मे २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १७९)
Vatratika
 

गुरुवार, २ मे, २०१९

गरमीची लाट

खरपूस • वात्रटिका

« गरमीची लाट »
कोणती असो वा नसो
गरमीची भारी लाट आहे
सुर्याला आग ओकायची
ख्वाहीश भरमसाठ आहे

चटका बसला कि मग
आपल्याला थोडा राग येतो
पाण्याअभावी निष्पाप मरतो
तेवढयापुरता मग जाग
येतो

पर्यावरणाला टिकवण्याची
ताकद आपल्या सर्वांत आहे
र्‍हासापासून बचाव करणे
एवढेच आता हातात आहे

 • रघुनाथ सोनटक्के

(३ मे २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १७८)
(४ मे २०१९ दै. पथदर्शी) (७ मे २०१९, दै. लोकांकित)

बुधवार, १ मे, २०१९

निकालाआधीच

खरपूस • वात्रटिका 

« निकाला आधीच  »
निकालाआधीच ठरू लागले
पदाचे दावेदार
एका जागेसाठी इच्छुकांची
आहे भरमार

अंदाज आणि पेरणी
काहींचा हातखंडा असतो
निकाल लागल्यावर
मामला मात्र थंडा असतो
 
• रघुनाथ सोनटक्के 
गुगल सर्च: 'kharpus vatratika' 
(१ मे २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १७७)
३ मे २०१९ दै. बलशाली भारत