शुक्रवार, ३० नोव्हेंबर, २०१८

श्रेयवाद

श्रेयवाद

श्रेयवादाची आता परत
लढाई सुरू झाली आहे
हुतात्म्यांना विसरून
बढाई सुरू झाली आहे

जल्लोष करायला हवा
कसोटीवर टिकलं पाहिजे
लोकांच्या इच्छेतूनच बदल होतो
सगळ्यांनीच शिकलं पाहिजे

• रघुनाथ सोनटक्के (पुणे)
  मो. 8805791905

१ डिसेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ५)
Vatratika

भ्रष्टाचाराची कीड

« भ्रष्टाचाराची कीड »

प्रशासनातील काहीजण 
भ्रष्टाचाऱ्यांची तळी धरतात 
स्वार्थ आणि लोभापायी 
सामान्य मग बळी ठरतात 

कामचुकारपणाचा रोग,
लाचखोरीची कीड लागली आहे 
खेकड्यांसारखी एकमेकांत 
खाण्याचीही चढाओढ लागली आहे 

जाब विचारून जनतेने 
सरकारनेही झापले पाहिजे 
'बेशरमी'सारखे  वाढण्याआधीच 
मुळासकट कापले पाहिजे 

रघुनाथ सोनटक्के (पुणे)
  मो. 8805791905

३० नोव्हेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ५४)
१ डिसेंबर २०१८ दै. पथदर्शी'ला प्रकाशित

VatratikaVatratika

गुरुवार, २९ नोव्हेंबर, २०१८

रामनाम

« रामनाम »

हा बघा तो बघा सद्या
रामनाम जपतो आहे
जगाचा पोशिंदा मात्र
दुष्काळाने खपतो आहे

महागाईने केला जुलूम
कुणी रोजगार मागतो आहे
राजकारणी मात्र त्याला
चेतवायला बघतो आहे

कुणातच, कशाचा आता
कुठे राम राहिला नाही
देवाच्या नादाने भूकेल्यात
कुणी राम पाहिला नाही

• रघुनाथ सोनटक्के
  मो. ८८०५७९१९०५
शब्दरसिक दिवाळी अंक: http://bit.ly/ShabdRasik-2018
९ नोव्हेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ५३)

मंगळवार, २७ नोव्हेंबर, २०१८

मेरी कोमचा पराक्रम



खरपूस • वात्रटिका

« मेरी कोमचा पराक्रम »

खेळाने दमदार आपल्या 
मेरीने नाव कोरले आहे
एक नाही दोन नाही सहाव्यांदा 
अजिंक्य ठरले आहे

कष्टाने मेरी तू तिरंगा
जगात फडकवला आहे
गर्व असावा असा पराक्रम
सातासमुद्रापार घडवला आहे

स्वत:साठी नाही तर देशासाठी 
खेळण्याचा धडा घेतला पाहिजे
खेळातही राजकारण करणार्‍यांनी
विचार तिचा थोडा घेतला पाहिजे
रघुनाथ सोनटक्के
   मो. ८८०५७९१९०५

(रोज दै. 'युवा छत्रपती' दैनिकात प्रकाशित)
शब्दरसिक दिवाळी अंक डाऊनलोड करा: http://bit.ly/ShabdRasik-2018

८ नोव्हेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ५२)
दै. पथदर्शी २९ नोव्हेंबर २०१८ ला प्रकाशित


अस्मितेचे राजकारण

« अस्मितेचे राजकारण »

सामान्यांचे प्रश्न गेले कुठे?
धर्म, जातींतच पेटले आहे
विकासावर बोलणार्‍यांचे
प्रमाण खुपच घटले आहे

स्वातंत्र्यानंतर कुठे निघालो
देशाशी नातेच तुटले आहे
अस्मितेचे राजकारण करणार्‍यांना
जणू मोकळे रानच भेटले आहे
• रघुनाथ सोनटक्के
   मो. 8805791905
ईबुक: https://goo.gl/aY6hVB

७ नोव्हेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ५१)
दै. पथदर्शी ३० नोव्हेंबर २०१८ ला प्रकाशित

 

सोमवार, २६ नोव्हेंबर, २०१८

स्वतंत्र बाणा

«  स्वतंत्र बाणा  »

कुणाची वाढली ताकद
तर कुणाचं झालं पारडं जड
कुणाला फडकवायचा झेंडा
तर कुणाला जिंकायचाय गढ

थोड्या थोड्या दिवसांनी
वाढतं यांचं राजकीय बळ
निकालांनी परत मग त्यांची
दाबली जाते दुखती कळ

युतीसाठी असतात आग्रही
मधेच कुठं घोडं अडतं!
निवडणूकीआधी तोरा
नंतर शहाणपण कळतं

निवडणुक पाहून बरोबर
जागा होतो 'स्वतंत्र' बाणा
मग सत्तेसाठी आपोआप 
मोडून पडतो यांचा कणा 
• रघुनाथ सोनटक्के
   मो. 8805791905
ईबुक: https://goo.gl/aY6hVB

६ नोव्हेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ५०)
Vatratika

शनिवार, २४ नोव्हेंबर, २०१८

धर्म-जात आणि राजकारण

« धर्म-जात आणि राजकारण »
र्म आणि राजकारणाचं
नातं खुप आहे जुनं
कोणी विभागलं धर्मानं
तर जातीला पोसलं आहे कोणं

विकास नाही देशाचा

जनतेला भरकटवल्या 'जात' आहे
कुणाची पैशाच्या जोरावर
तर कुणाची समीकरणानं मात आहे

खरी लोकशाही आणायला

जात आता गेली पाहिजे
चेहरा असु द्या कुणाचाही
विकासालाच मतं दिली पाहिजे
• रघुनाथ सोनटक्के
मो. 8805791905
ईबुक: https://goo.gl/aY6hVB
७ नोव्हेंबर २०१८ (दै. पथदर्शी, बीड)
४ नोव्हेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ९)
Vatratika Vatratika

गुरुवार, २२ नोव्हेंबर, २०१८

मनमोहन आणि मौन

मनमोहन आणि मौन

चौकशी नाकरल्यावर
'मना'चंही 'मौन' सुटलं आहे
संशयाचं मोहळं पुन्हा 
परत एकदा उठलं आहे

आरोपांची विमानं उडतांना
वाटतं दालमे कुछ काला है!
देशवासियांना प्रश्न पडलाय
खरंच घोटाळा झाला आहे?


• रघुनाथ सोनटक्के
   मो. ८८०५७९१९०५
शब्दरसिक दिवाळी अंक: http://bit.ly/ShabdRasik-2018

३ नोव्हेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ८)

आरक्षणावर चर्चा

खरपूस • वात्रटिका

« आरक्षणावर चर्चा »

चर्चा ना पटलावर आला
कुणी राजदंड पळवला आहे
राजकारणापायी मुद्याला
कुठच्या कुठे वळवला आहे

आरक्षणावरून वाटतो आता
जातीजातीत पंगा आहे
सरकार आणि विरोधीपक्षाचा
सभागृहात नुसता दंगा आहे


रघुनाथ सोनटक्के
   मो. ८८०५७९१९०५


शब्दरसिक दिवाळी अंक मोफत डाऊनलोड करा: 

 नोव्हेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ७)
३ डिसेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ५६)


बुधवार, २१ नोव्हेंबर, २०१८

मंदिराची कसम

« मंदिराची कसम »

तुम्ही घाई केली होती
आता आम्ही करतो आहे
मंदिराच्या राजकारणात
तुमच्याही वरचढ ठरतो आहे

अस्मितेच्या नावाखाली ही
मंतांची बेगमी चालली आहे
प्रत्येकानेच मंदिर बनवण्याची
कसम आता खाल्ली आहे
   
   • रघुनाथ सोनटक्के
      मो. ८८०५७९१९०५
  १ नोव्हेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ६)

मंगळवार, २० नोव्हेंबर, २०१८

ठग्ज आॅफ हिंदूस्थान

खरपूस वात्रटिका

« ठग्ज आॅफ हिंदूस्थान »

आधी तुम्ही ठगवले होते
आता ह्यांनी ठगवले आहे
दोघांनीही जनतेला असे
सावत्र म्हणून वागवले आहे

ठग्ज आॅफ हिंदूस्थानमधे
ठगविण्याची अशीच रित आहे
वर्षानुवर्षे आश्वासनाचं जहर
जनता मुकाट्याने पित आहे

• रघुनाथ सोनटक्के,  मो. ८८०५७९१९०५
२० नोव्हेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ५)



सोमवार, १९ नोव्हेंबर, २०१८

हमीभाव

हमीभाव



उद्योगपतींना खुशाल आम्ही
कर्ज करतो माफ
फक्त शेतकर्‍यानंच काय केलं
एवढं मोठं पाप

घ्यावा लागतो शेतकर्‍याला
अडकवुन गळ्यात फास
आत्महत्यांची आकडेवारी सांगताना
लागत नाही ढास

'हमी' नाही त्याला कशाची
फक्त आश्वासनापुरता 'भाव'
साथ नाही त्याला निसर्गाची
सरकाराही ढकलतय धिमे नाव

     •रघुनाथ सोनटक्के©
     https://vatratika.blogspot.in

(दि २ जून २०१८ च्या दै. 'युवा छत्रपती' लातूर या दैनिकात प्रकाशित )

 नोव्हेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. )


 

रविवार, १८ नोव्हेंबर, २०१८

जांगळगुत्ता

« वात्रटिका »

जांगळगुत्ता

कालपर्यंत भांडले अवसान आणुन
आज बसलेत खाऊन कथ्था
उद्या वाटाघाटी करतील बंदरूममधे
अन् जमवतील जांगळगुत्ता

जनशक्ति दाखवुन देईल
कोण लायक आहे अन् होता
त्याच्याच हाती चाबी असेल
अन् त्याचीच चालेल सत्ता

• रघुनाथ सोनटक्के
  8805791905

१७ नोव्हेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ३)


शनिवार, १७ नोव्हेंबर, २०१८

बंड

बंड
कधी कुणाच्या हाती 
बंडाचा झेंडा आहे
कुणी समजतोय 'दादा' 
तर कुणी गुंडा आहे

तिकिटांसाठी भरलाय 
इच्छुकाचा मेळा आहे
पक्ष बदलायत मातब्बर
कितीतरी वेळा आहे
   • रघुनाथ सोनटक्के
     ८८०५७९१९०५

१६ नोव्हेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. )

Vatratika


बुधवार, १४ नोव्हेंबर, २०१८

शहर‍ांचे नामांतर

शहरांचे नामांतर

पाटी पुसून नवीन अक्षर
परत-परत गिरवलं जाते
भावनांचा जातं अधूनमधून 
असंच हे फिरवलं जाते

मतांसाठींचे उपद्व्याप की
नुसतंच हे खुळ आहे
रणांगण पाहून दौडायला 
उडवणे चालले धूळ आहे

- रघुनाथ सोनटक्के 

१५ नोव्हेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. )


बोलणीकडे पावलं


बोलणीकडे पावलं

एक एक करत पावलं 
बोलणीकडे सरकू लागतात
बंद दाराआड चर्चा 
गुपचूप उरकु लागतात

दाखवायला वेगळे
खायचे वेगळे दात असतात
पोटात काय ओठावर काय
झाकून मलई खात असतात

 • रघुनाथ सोनटक्के (पुणे)
      मो. ८८०५७९१९०५

१२ नोव्हेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ३)


अवणीप्रेम

अवणीप्रेम

अवणीच्या मृत्यूने अवेळी
संवेदनशिलता जागी होते
डझणभर शेतकर्‍यांच्या बळीने
कुणाचा जीव नाकी येते

प्राणीप्रेमींच्या आवईला
बेगडीणाचा गंध येतो
कुत्रा-मांजर पाळणार्‍यांना
नरभक्षकांचाही कंड येतो 

 • रघुनाथ सोनटक्के (पुणे)
      मो. ८८०५७९१९०५

८ नोव्हेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ३७)


मंगळवार, १३ नोव्हेंबर, २०१८

गर्भलिंगनिदान


स्त्रि-पुरूष समानतेचे
गातो आम्ही गाणे
बरे आहे का आमच्या राज्यात
गर्भलिंगनिदान होणे

डाॅक्टर, दलालांसोबत जन्मदाताही
वाटेकरी आहे त्या पापाचा
निर्दयीपणे कापतो गळा
जिव कुठे असतो माय-बापाचा

स्वार्थ आणि प्रथेपायी
खुडू नका कोवळी कळी
तिचा काय दोष त्यात
जातो का नाहक बळी

कसाबात अन् तुमच्यात
फरक राहिलाच कशाचा
नराधम बनुन काय लागेल
दिवा आपल्या देशाचा

• रघुनाथ सोनटक्के

१३ नोव्हेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ३९) 
Vatratika
  

बुधवार, ७ नोव्हेंबर, २०१८

बेटी बचाव

« बेटी बचाव »

Beti Bachav-Calligraphy by Raghunath Sontakke

'बेटी बचाव' म्हणजे काय
आज आम्हाला कळले आहे
एवढे शहाणे होऊनही मग
कोणते विचार पाळले आहे?

    ज्याच्या हाती काठी आहे
    त्याचे पाप झाकले जाते
    अपराध्याला पाठीशी घालणे
    जगापासून कुठे लपले जाते

नारे द्य‌ायचे नारी-शक्तीचे
बाकी काय बरकत आहे?
कृतीवाचून गप्पा मारणे म्हणजे
विचारांशी घेतलेली फारकत आहे

    स्त्रि-जातीचा सन्मान करणे
    कृतीतुनही झळकला पाहिजे
    लपलेला सैतान ठेचण्यासाठी
    लाखामधूनही ओळखला पाहिजे

• रघुनाथ सोनटक्के©
   फोन: 8805791905
   शब्दरसिकचा मार्च अंक: http://goo.gl/NnhtL4
   वात्रटिकासंग्रह: http://goo.gl/7CcLUw
   दिवाळी अंक २०१७: http://goo.gl/RxRw8g

(दि २२ एप्रिलच्या दै.  विदर्भ मतदार मध्ये प्रकाशित )
'बेटी बचाव' ही कविता माझ्या केलिग्राफीसह आजच्या 'युवा छत्रपती' या लातूरच्या दैनिकात प्रकाशित झाली. 
http://yuvachhatrapati.com/epaper/edition/244/april/page/4
६ नोव्हेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ३५)
(दि ११ नोव्हेंबर २०१८ च्या दै.  नवाकाळमध्ये प्रकाशित )

९ डिसेंबर २०१८ च्या तरुण भारत, 'अक्षरयात्रा'मध्ये प्रकाशित 

                       Raghunath Sontakke - Vatratika