मंगळवार, १९ जून, २०१८

शिक्षणाचा बाजार

• ख र पु स । वा त्र टि का •
« शिक्षणाचा बाजार »
Calligraphy by Raghunath Sontakke

सरकार लेखी खुली झाली
शिक्षणाची दारं
अजुनही मोलमजूरी करतात
गरिबाची पोरं

शिक्षणाची मंदिरं झालीत
पैशावाल्यांची खुली दुकानं
झोपड्या राहिल्या अशिक्षित 
देखावेबाज झाली मनं

फि, डोनेशनच्या नावाखाली
गरिबाचं चाललं शोषण
'वाघिणीचं दूध' कोण पितं?
'बडे'च तर करतात मलई प्राशन

कुणी झालं 'शिक्षणसम्राट'
हातोहात डिग्र्या लागल्या मिळू 
भ्रष्ट लोकांच्या बाजारात
ज्ञानीजन खरा लागला सडू

सरकारही करतं डोळेझाक
मग यांना मिळतं मोकळं कुरण
शिक्षणाचा मांडला 'बाजार'
होतकरूंचा होत चाललं मरण


• रघुनाथ सोनटक्के
    तळेगाव दाभाडे, पुणे 

    मो. 8805791905


शब्दरसिकचा मे अंक: https://bit.ly/RasikMay18

वात्रटिकासंग्रह: https://goo.gl/7CcLUw

दिवाळी अंक २०१७: https://goo.gl/RxRw8g


२२ जून २०१८ च्या दै. डहाणू मित्र मधे प्रकाशित व  २८ जून २०१८ च्या दै. नवाकाळ मधे प्रकाशित 


शुक्रवार, १५ जून, २०१८

अस्पृशता

• ख र पु स । वा त्र टि का •

« अस्पृशता »
Calligraphy by Raghunath Sontakke


अस्पृशता या देशात खरं तर
रोग आहे जुना
अजुनही काही घटनांवरून
दिसतात खाणाखुणा

जात पुसली पाहिजे
भेद मिटला पाहिजे
संकुचितपणाचा वाढता दर
खरंच घटला पाहिजे

भ्रामक, भेदभावाच्या 
पुसून टाकूयात खुणा
सुपिक समाजासाठी
'माणुसकी' हाच कणा

गरिब, ज्ञानी सारीच जनता
सुखाने आता जगली पाहिजे
संतानी दिलेल्या शिकवणीसम
जनता आता वागली पाहिजे

• रघुनाथ सोनटक्के
   तळेगाव दाभाडे, पुणे 
   मो. 8805791905
शब्दरसिकचा मे अंक: https://bit.ly/RasikMay18
वात्रटिकासंग्रह: https://goo.gl/7CcLUw
दिवाळी अंक २०१७: https://goo.gl/RxRw8g

(१९ मे. २०१८ च्या 'दै. युवा छत्रपती' मधे प्रकाशित)

http://yuvachhatrapati.com/epaper/edition/294/june/page/2
Raghunath Sontakke-Yuva Chhatrapati


बुधवार, १३ जून, २०१८

आत्महत्या

• ख र पु स । वा त्र टि का •
« आत्महत्या »
परिक्षा, ताणतणाव, गरिबी
कारणं हजार असतात
धीर, आत्मबळाने सामना
काहीजण करत असतात
संकटे येतच राहणार
परिस्थितीला तोंड द्यावं लागतं
अपयश, हानी भरून निघेन
असं समजावुन घ्यावं लागतं
‍आलेल्या परिस्थितीवर धीराने
मात करायला हवी
अंधार्‍या रात्रीतुन सुर्य उगवणाची
बात करायला हवी
•  रघुनाथ सोनटक्के©
   मो. 8805791905
   शब्दरसिकचा मे अंक: https://bit.ly/RasikMay18
   वात्रटिकासंग्रह: https://goo.gl/7CcLUw
   दिवाळी अंक २०१७: https://goo.gl/RxRw8g

Vatratika, Raghunath Sontakke

सोमवार, ४ जून, २०१८

शेतकर्‍याची दैना

• ख र पु स । वा त्र टि का •

  « शेतकर्‍याचा मोर्चा »
Calligraphy by Raghunath Sontakke


हमीभाव कधी मिळत नाही
कुणी नसतो त्याचा वाली
फेकुन द्यावे लागते दूध, माल
रस्त्यावर असाच दरसाली

जाणत नाहीत कष्टाचं मोल
मतापुरता असतो फक्त वाली
सारंच बेभरवश्याचं झालं
कधी सरकार कधी निर्सगाच्या हवाली

समित्या, अहवाल काढणे
खोटा पुळका अन् बागलबुवा
आत्महत्यांचा आकडा मात्र
वाढत असतो दरवर्षी नवानवा

संप, मोर्च्यांची तात्पुरती दखल
शक्कल काढलेली आहे नामी
कर्जमाफीच्या नावे थट्टा
पदरी अवेहलना आणि मानहानी

• रघुनाथ सोनटक्के
   मो. 8805791905

   शब्दरसिकचा मे अंक:  https://bit.ly/RasikMay18

    वात्रटिकासंग्रह: https://goo.gl/7CcLUw

    दिवाळी अंक २०१७: https://goo.gl/RxRw8g

 जून २०१८ च्या दै. युवा छत्रपतीमध्ये प्रकाशित 
http://yuvachhatrapati.com/epaper/edition/297/june/page/2
तसेच १० जून २०१८ च्या दै. डहाणू मित्र मध्ये प्रकाशित
२८ जून २०१८ च्या सायबर क्रॉईम (औरंगाबाद)मध्ये प्रकाशित 

Yuva Chhatrapati-युवा छत्रपती