मंगळवार, १३ जून, २०१७

बढाई


बढाई

ना त्यांचा खरा होता 
ना ह्यांचा खरा होता 
शेतकऱ्याने दिलेला लढा
आपलाच असल्याचा होरा होता

तुम्ही तर नावालाच विरोधी 
सत्तेसाठी लढाई आहे 
शेतकऱ्याच्या दुःखाचं केलं भांडवल 
वरचढ होण्यासाठी बढाई आहे 

• रघुनाथ सोनटक्के
8805791905

गुरुवार, ८ जून, २०१७

कर्जाचा फास

कर्जाचा फास 

त्यांनी केलं 'सिंचन'
तुम्ही कुठे दिला भाव 'हमी'
तरी का झाल्या नाही
बळीच्या आत्महत्या कमी 

तुमचाही होता नारा 
'सबका साथ सबका विकास'
मग का बरं आहे अजुन 
गळ्यात कर्जाचा फास 

पाहू नका अंत आता 
पडेल कधी, कुठे बाँम्ब 
मग पडेल तुम्हाला सारी 
पळता भुई लांब 

• रघुनाथ सोनटक्के 
8805791905

बुधवार, ३१ मे, २०१७

शेतकर्‍याचा संप

« खरपुस वात्रटिका »

            शेतकर्‍याचा संप

          इतिहासात पहिल्यांदाच होतोय
शेतकर्‍याचा संप
सरकार, सामान्यांना आता
भरेल धरणीकंप

कुणीच एेकत नाही त्याचं
करा सातबारा कोरा
मालाला ना भाव, ना हमी
कधी होईल हा रोग बरा

मिळु दे धडा सरकारला
कळु दे जनतेला त्याच्या व्यथा
त्याच्याविणा जगणं कसं कठिण
लागेल आता सार्‍यांनाच पता
       • रघुनाथ सोनटक्के
भेट द्या : https://vatratika.blogspot.in

गुरुवार, २५ मे, २०१७

आशिर्वाद

« वात्रटिका »
आशिर्वाद

कुणाचं येईल विमान खाली
खरंच कुणाचा नेम नाही
आजचा दिवस चांगला
उद्याचा काही सेम नाही


आज हेलीकाॅप्टर पडलं
उद्या सरकार पडंल
कुणाच्याही आशिर्वादावर
उद्या काहीही घडंल!


शेतकर्‍यानं खुप पिकवलं
मात्र त्याला विकता नाही आलं
आशिर्वादावर कसं जगतात
हे त्याला शिकता नाही आलं
• रघुनाथ सोनटक्के
विजीट करा: https://vatratika.blogspot.in

गुरुवार, १८ मे, २०१७

सत्यपालन

« वात्रटिका »

'सत्यपाल'न
नसेल पचलं 'सत्य' कि
होतात असे भ्याड हल्ले
जिकडे तिकडे 'पाल'नकर्त्याचा
आवाज दाबणे चालले


प्रबोधनकार, विचारवंताना
राहिला ना कुणी वाली
पोलिस, सिबीआय काय
करतात कुठं रखवाली ?


कोण उचलुन धरणार
आता सत्याची बाजु
पानसरे, दाभोळकराचे मारेकरी 
लागले आहेत माजु
• रघुनाथ सोनटक्के
  8805791905

शनिवार, ६ मे, २०१७

निर्भयाचा लढा

« वात्रटिका »
निर्भयाचा लढा

निर्भयाची हत्या-बलात्कार
निर्दयी, पाशवी गुन्हा होता
शेवटपर्यंत लढली म्हणुन
देश तुझ्या पाठी उभा होता


तु दिलास लढा म्हणुन
गाजली तुझी दिल्ली
आजही असे नराधम
फिरताहेत गल्लोगल्ली


त्यांना दिल्यावर फाशी
न्याय मिळाला समजु नये
सजग राहु दे जनतेला
चेतलेली वात पुन्हा विझु नये
• रघुनाथ सोनटक्के
  8805791905
 

गुरुवार, २७ एप्रिल, २०१७

हातावर तुरी

हमीभाव

आधी म्हणायचे
पिकवा कडधान्य, तुरी
अाता मात्र हमीभावाची
शेतकर्‍याच्या गळ्यावर सुरी

आधी त्यांना कैवार होता
अाता बंधनाचा फास आहे
पिकवणार्‍याचा सातबारा गहाण
व्यापारी खातो नफ्याचा घास आहे

नाही म्हणायचं नाही
पाहिजे ते करायचं नाही
संपला काय तुमचा बारदाणा
आता काय आहे ते पण भरायचं नाही

फिकवतो त्याला
आता हमी नाही तर भाव द्या
काहीच उरलं नाही त्याच्या हाती
तुम्हीच आता त्याला नवं नाव द्या

उरलेत किती दिवस
सुधारा आता तरी
नाहीतरी देतच आहात 
नेहमीच हातावर तुरी
   
• रघुनाथ सोनटक्के
   8805791905

चाबुक आणि संघर्ष

« वात्रटिका »

चाबुक आणि संघर्ष


शेतकर्‍यासाठी कुणाचा 'संघर्ष'
कुणी आेढला 'चाबुक' आहे
आम्ही विजयाच्या नशेत
आसन आमचे शाबुत आहे

विकासाची आणली यांनी लाट
शेतकर्‍याच्या सदा 'पाठीशी' आहे
विसरू नका तुम्ही 'त्यांचा' इतिहास
आधीचा अनुभव 'गाठीशी' आहे

• रघुनाथ सोनटक्के
8805791905

रविवार, १६ एप्रिल, २०१७

नारायणाचे गार्‍हाणे

नारायणाचे गार्‍हाणे
पक्षात आता मला वाव नाही
एकच माझा 'नारा' आहे
स्वपक्षीयावर चिखल किती फेकू
त्यांच्यापेक्षा मि किती बरा आहे

विरोधात राहून किती दिवस
गात आहे स्वपक्षीयांचे गार्‍हाणे
उडी मारायला तयार आहे मी
थकलो आता सततच्या पराभवाने

सत्तेसाठी काहीही करू
गाऊ आता किती स्वकियांचे गार्‍हाणे
सुटला होता 'बाण' कधीचा
शोभेल आता 'हात' टवटवीत कमळाने

• रघुनाथ सोनटक्के
8805791905

पाकचा उद्दामपणा

पाकचा उद्दामपणा

दहशतवादाची मुळभुमी असुनही
पाकच्या उलट्या बोंबा
हेरेगिरीचा ठपका ठेवुन फाशी
देते फक्त त्यालाच शोभा

अपहरण करून फाशी
पाकचा उद्दामपणा कायम आहे
कुरापती काढणे हा तर
त्याचा नापाक व्यायाम आहे

काय नाहीच त्या पाकमधे
करायला त्यांची हेरेगिरी
संन्याशाला देवुन फाशी
चोर करतोय बघा शिरजोरी

कळून चुकलं जगाला
कोण पाक अन् नापाक आहे
काश्मिर मिळणं अशक्य
शेवटी भारत तुमचा बाप आहे
• रघुनाथ सोनटक्के
  तळेगाव, पुणे
  8805791905

गुरुवार, ६ एप्रिल, २०१७

कर्जमाफीचं माॅडेल

कर्जमाफीचं माॅडेल
माॅडेलचा विचार करा
बघुन या 'उत्तर', तामिळनाडू
बदलाची काय भाषाच फक्त
बदला धोरण वेळकाढू

कर्जमाफीच्या टाॅनिकने करा
'हिल' आत्महत्येचा रोग
हवालदील शेतकर्‍याला बदलण्याचा
येईल कधी बरा 'योग'
• रघुनाथ सोनटक्के©
मो. 8805791905
(http://vatratika.blogspot.in येथे भेट द्या.)

गुरुवार, २३ मार्च, २०१७

शेतकर्‍याचा बळी

« वात्रटिका »
शेतकर्‍याचा बळी

शेतकर्‍याच्या कर्जमाफीवर 
विरोधकांची 'गोंधळ'कला
निलंबनाच्या कारवाईने परत
सत्ताधारी 'वरचढ' झाला

अविश्वाच्या भितीपोटी
सत्ताधारी बाकांची 'खेळी'
दोघांच्या भांडणात सदा जातोय 
शेतकर्‍याचाच 'बळी'
  • रघुनाथ सोनटक्के©

बुधवार, २२ मार्च, २०१७

गणसंख्या

«वात्रटिका »
गणसंख्या
जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी 'खास'
बनविलेले संसदचे 'दार' आहे
लोकांचे कामे करण्यातच गुंतले
आपले खासदार फार आहे


कामकाज, चर्चेसाठी 
त्यांची 'गणसंख्या' कोअर आहे
उपस्थितीसाठी विनंती नको 
प्रत्येक खासदार त्यास जबाबदार आहे


ना बैठुंगा ना बैठने दुंगा
पण मोदीजी तुम्हावर ना'राज' आहे
सध्या 'उत्तर' जरी मिळाले
लोकसभेची चिंता जायज आहे
• रघुनाथ सोनटक्के
https://vatratika.blogspot.in येथे विजीट करा.

शुक्रवार, ३ मार्च, २०१७

कविता खासमखास

« चारोळी »

माझ्या शब्दांना चिकटलाय
सखे तुझ्या प्रेमाचा सुवास
सहज बरळलोय तरी होतात
माझ्या कविता खासमखास

• रघुनाथ सोनटक्के
व्हिजीट करा : https://kavitamanamanatalya.blogspot.in

शुक्रवार, १७ फेब्रुवारी, २०१७

मतदारराजा

मतदार राजा
कुणी म्हणतं लुटलं त्यांनी
कुणाच्या पारदर्शकतेच्या बाता
कुणी ठरवतं चोर कुणाला
द्याव्या कुणाच्या हाती चाव्या आता

यांचा काय चार दिवस
वाद, मतभेद अन् गाजावाजा आहे
तुच निवड स्वत:चं भविष्य
कारण तुच मतदार राजा आहे
• रघुनाथ सोनटक्के
  8805791905
  (आणखी वात्रटिकांसाठी https://vatratika.blogspot.in या ब्लॉगला सबस्काईब करा. )

बुधवार, १ फेब्रुवारी, २०१७

मनसे युती

«वात्रटिका»

मनसे युती

नाही अटी, जागांबाबत
आमचा काही वाद आहे
मराठी मतांसाठी फक्त
'मन'से आमची साद आहे


स्व:ताहून टाळी देतो आम्ही
कशी बघा आली वेळ आज आहे
'उध्दवा' तुला चांगलंच माहीत
यात काय गोड 'राज' आहे

    • रघुनाथ सोनटक्के

       ८८०५७९१९०५
(आणखी वात्रटिकांसाठी https://vatratika.blogspot.in येथे विजिट द्या.)

सोमवार, ३० जानेवारी, २०१७

औकात

औकात

कुणी 'औकात' दाखविण्याची
करतो बात आहे
तर कुणी म्हणतो आम्हाला 
जनतेची साथ आहे


आम्ही त्यांना 'पाणी पाजू'
बसतो आमचा घसा आहे.

'भावां'नाही दाखवुन देवु
कारभार 'पारदर्शक' कसा आहे
     • रघुनाथ सोनटक्के
        ८८०५७९१९०५

बुधवार, २५ जानेवारी, २०१७

रईस

रईस

प्रमोशनसाठी करू रेल्वेत प्रवास 
भारी आमची अशी अक्कल आहे
कुणाच्या जिवाची ना पर्वा आता
एवढी भारी आमची शक्कल आहे



राज आमचे 'किंग'ही आम्ही
पैसा, प्रसिध्दीने आम्ही 'रईस' आहे
अॅक्टरांची 'खान' फक्त तिकडे
एवढं मिळवुनही किती हव्यास आहे

        • रघुनाथ सोनटक्के©
          8805791905
वात्रटिकांसाठी https://vatratika.blogspot.in येथे विजिट द्या

बुधवार, १८ जानेवारी, २०१७

समाजवादी

'सायकल'ही तुझी पुत्रा
तुझ्याचकडे सत्तेची गादी आहे

चाव्या आणि तिजोरीही तुझी

आम्ही कुठे 'समाजवादी' आहे ?



गुळाजवळ मुंगळे जमलेत
पुत्र बापावर वरचढ आहे

कोण खरा 'नेताजी' होता

अन् कळला कुणाचा गढ आहे



• रघुनाथ सोनटक्के

8805791905

सोमवार, १६ जानेवारी, २०१७

चरखा आणि खादी


Modi's Picture in KVIC Calender

फिरवतो आम्हीच चरखा
आम्हीच वापरतो खादी
राजमुद्रेवरही छापु प्रतिमा
लागु नये कुणी आता नादी


खोडून काढू त्यांची प्रतिमा
अन् देऊ तशी पोज आता
भक्त आहेत माझ्या पाठीशी
बदलू कोट मग रोज आता


• रघुनाथ सोनटक्के©
8805791905