मंगळवार, २० नोव्हेंबर, २०१८

ठग्ज आॅफ हिंदूस्थान

खरपूस वात्रटिका

« ठग्ज आॅफ हिंदूस्थान »

आधी तुम्ही ठगवले होते
आता ह्यांनी ठगवले आहे
दोघांनीही जनतेला असे
सावत्र म्हणून वागवले आहे

ठग्ज आॅफ हिंदूस्थानमधे
ठगविण्याची अशीच रित आहे
वर्षानुवर्षे आश्वासनाचं जहर
जनता मुकाट्याने पित आहे

• रघुनाथ सोनटक्के,  मो. ८८०५७९१९०५
२० नोव्हेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ५)



सोमवार, १९ नोव्हेंबर, २०१८

हमीभाव

हमीभाव



उद्योगपतींना खुशाल आम्ही
कर्ज करतो माफ
फक्त शेतकर्‍यानंच काय केलं
एवढं मोठं पाप

घ्यावा लागतो शेतकर्‍याला
अडकवुन गळ्यात फास
आत्महत्यांची आकडेवारी सांगताना
लागत नाही ढास

'हमी' नाही त्याला कशाची
फक्त आश्वासनापुरता 'भाव'
साथ नाही त्याला निसर्गाची
सरकाराही ढकलतय धिमे नाव

     •रघुनाथ सोनटक्के©
     https://vatratika.blogspot.in

(दि २ जून २०१८ च्या दै. 'युवा छत्रपती' लातूर या दैनिकात प्रकाशित )

 नोव्हेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. )


 

रविवार, १८ नोव्हेंबर, २०१८

जांगळगुत्ता

« वात्रटिका »

जांगळगुत्ता

कालपर्यंत भांडले अवसान आणुन
आज बसलेत खाऊन कथ्था
उद्या वाटाघाटी करतील बंदरूममधे
अन् जमवतील जांगळगुत्ता

जनशक्ति दाखवुन देईल
कोण लायक आहे अन् होता
त्याच्याच हाती चाबी असेल
अन् त्याचीच चालेल सत्ता

• रघुनाथ सोनटक्के
  8805791905

१७ नोव्हेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ३)


शनिवार, १७ नोव्हेंबर, २०१८

बंड

बंड
कधी कुणाच्या हाती 
बंडाचा झेंडा आहे
कुणी समजतोय 'दादा' 
तर कुणी गुंडा आहे

तिकिटांसाठी भरलाय 
इच्छुकाचा मेळा आहे
पक्ष बदलायत मातब्बर
कितीतरी वेळा आहे
   • रघुनाथ सोनटक्के
     ८८०५७९१९०५

१६ नोव्हेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. )

Vatratika


बुधवार, १४ नोव्हेंबर, २०१८

शहर‍ांचे नामांतर

शहरांचे नामांतर

पाटी पुसून नवीन अक्षर
परत-परत गिरवलं जाते
भावनांचा जातं अधूनमधून 
असंच हे फिरवलं जाते

मतांसाठींचे उपद्व्याप की
नुसतंच हे खुळ आहे
रणांगण पाहून दौडायला 
उडवणे चालले धूळ आहे

- रघुनाथ सोनटक्के 

१५ नोव्हेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. )


बोलणीकडे पावलं


बोलणीकडे पावलं

एक एक करत पावलं 
बोलणीकडे सरकू लागतात
बंद दाराआड चर्चा 
गुपचूप उरकु लागतात

दाखवायला वेगळे
खायचे वेगळे दात असतात
पोटात काय ओठावर काय
झाकून मलई खात असतात

 • रघुनाथ सोनटक्के (पुणे)
      मो. ८८०५७९१९०५

१२ नोव्हेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ३)


अवणीप्रेम

अवणीप्रेम

अवणीच्या मृत्यूने अवेळी
संवेदनशिलता जागी होते
डझणभर शेतकर्‍यांच्या बळीने
कुणाचा जीव नाकी येते

प्राणीप्रेमींच्या आवईला
बेगडीणाचा गंध येतो
कुत्रा-मांजर पाळणार्‍यांना
नरभक्षकांचाही कंड येतो 

 • रघुनाथ सोनटक्के (पुणे)
      मो. ८८०५७९१९०५

८ नोव्हेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ३७)


मंगळवार, १३ नोव्हेंबर, २०१८

गर्भलिंगनिदान


स्त्रि-पुरूष समानतेचे
गातो आम्ही गाणे
बरे आहे का आमच्या राज्यात
गर्भलिंगनिदान होणे

डाॅक्टर, दलालांसोबत जन्मदाताही
वाटेकरी आहे त्या पापाचा
निर्दयीपणे कापतो गळा
जिव कुठे असतो माय-बापाचा

स्वार्थ आणि प्रथेपायी
खुडू नका कोवळी कळी
तिचा काय दोष त्यात
जातो का नाहक बळी

कसाबात अन् तुमच्यात
फरक राहिलाच कशाचा
नराधम बनुन काय लागेल
दिवा आपल्या देशाचा

• रघुनाथ सोनटक्के

१३ नोव्हेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ३९) 
Vatratika
  

बुधवार, ७ नोव्हेंबर, २०१८

बेटी बचाव

« बेटी बचाव »

Beti Bachav-Calligraphy by Raghunath Sontakke

'बेटी बचाव' म्हणजे काय
आज आम्हाला कळले आहे
एवढे शहाणे होऊनही मग
कोणते विचार पाळले आहे?

    ज्याच्या हाती काठी आहे
    त्याचे पाप झाकले जाते
    अपराध्याला पाठीशी घालणे
    जगापासून कुठे लपले जाते

नारे द्य‌ायचे नारी-शक्तीचे
बाकी काय बरकत आहे?
कृतीवाचून गप्पा मारणे म्हणजे
विचारांशी घेतलेली फारकत आहे

    स्त्रि-जातीचा सन्मान करणे
    कृतीतुनही झळकला पाहिजे
    लपलेला सैतान ठेचण्यासाठी
    लाखामधूनही ओळखला पाहिजे

• रघुनाथ सोनटक्के©
   फोन: 8805791905
   शब्दरसिकचा मार्च अंक: http://goo.gl/NnhtL4
   वात्रटिकासंग्रह: http://goo.gl/7CcLUw
   दिवाळी अंक २०१७: http://goo.gl/RxRw8g

(दि २२ एप्रिलच्या दै.  विदर्भ मतदार मध्ये प्रकाशित )
'बेटी बचाव' ही कविता माझ्या केलिग्राफीसह आजच्या 'युवा छत्रपती' या लातूरच्या दैनिकात प्रकाशित झाली. 
http://yuvachhatrapati.com/epaper/edition/244/april/page/4
६ नोव्हेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ३५)
(दि ११ नोव्हेंबर २०१८ च्या दै.  नवाकाळमध्ये प्रकाशित )

९ डिसेंबर २०१८ च्या तरुण भारत, 'अक्षरयात्रा'मध्ये प्रकाशित 

                       Raghunath Sontakke - Vatratika
                                               



सोमवार, ५ नोव्हेंबर, २०१८

दिवाळीचा उत्सव



दीपोत्सव

प्रकाशाचा उत्सव दिवाळी 
सगळ्यानांच दिसावा 
उपेक्षित कुणी या जगी 
उपाशी ना निजावा 

मनामनात पेटाव्यात 
दया आणि  शांतीच्या ज्योती 
विजय करू अंधःकारावर
पेटवूया ज्ञानाच्या वाती 

दंभाला द्यावे पेटवून 
चेतवून द्यावे विकाराला 
सत्याचा जळो दीप 
दूर लोटून अन्यायाला 


 • रघुनाथ सोनटक्के (पुणे)
      मो. ८८०५७९१९०५

७ नोव्हेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ३)



पाण्याचं मोल


« पाण्याचं मोल »

पाण्याचं मोल खरंच आता
प्रत्येकानं जाणलं पाहिजे
संकट नेहमीचं झालेलं हे
आवाक्यात आणलं पाहिजे

संपत नाही पावसाळा
कळा त्याच्या जाणवू लागतात
दुष्काळग्रस्तांचे अश्रू पाहून
कडा डोळ्यांच्या पाणवू लागतात

जे तहानलेले, व्याकूळ
त्यांना प्यायला मिळलं पाहिजे
पर्यावरणासोबत पाण्याचं महत्व 
सगळ्यांनाच कळलं पाहिजे

    • रघुनाथ सोनटक्के (पुणे)
      मो. ८८०५७९१९०५

५ नोव्हेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ३)


रविवार, ४ नोव्हेंबर, २०१८

कोण लहान कोण मोठा

« कोण लहान कोण मोठा »

कोण लहान कोण मोठा 
आपणच ठरवू लागतो
पुशारकी मारत मारतच
स्वत:ला मिरवू लागतो

काय बोलतो काय करतो
भान आपल्याला उरत नाही
वांगी खाऊन पुराण वाचणे
मग कधीच हे सरत नाही

कोण भिडेल आपल्याला
याचा काही नेम उरला नाही
खाऊ कुण्या बापाचा मार
याचा काही नेम उरला नाही

रघुनाथ सोनटक्के
  तळेगाव दाभाडे, पुणे 
  मो. 8805791905

 नोव्हेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ३)




गुरुवार, १ नोव्हेंबर, २०१८

भाडेवाढ

खरपूस • वात्रटिका

   « भाडेवाढ »

दिवाळीच्या मुहूर्तावर
भाडेवाढ झाली आहे
सामान्यांची परत एकदा
कुचंबना केली आहे

सरकारी असो कि खाजगी
सारखीच निती आहे
कधी कशाची कधी कशाची 
मनात सदा भीती आहे
रघुनाथ सोनटक्के (पुणे)

मो. 8805791905

 नोव्हेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ३)


पळ

खरपूस • वात्रटिका

« पळ »

काल तो मल्ल्या गेला
आता नवा पळाला आहे
बुडवून कर्ज बॅकेचे
त्यालाही मुहूर्त मिळाला आहे

गेल्यावरच कळते कसे?
आपल्याला किती बुडवून गेला!
'बुडव्याला बॅंकेचा आधार' 
म्हण नवी अशी घडवून गेला

•  रघुनाथ सोनटक्के
  तळेगाव दाभाडे, पुणे
   मो. 8805791905

१ नोव्हेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ३)





बुधवार, ३१ ऑक्टोबर, २०१८

तोंडावर टाळं

खरपूस • वात्रटिका

« तोंडावर टाळं »

कर्जमाफी करायला सदा 
तोंडाला टाळं असते 
पळून गेलेल्यांचं मात्र 
तोंड तसंच काळं असते 

निरव, मल्ल्या आणि  
पळून जातो चोक्सी  
शेतकरी मात्र येथे 
रडतो ओक्साबोक्सी 

•  रघुनाथ सोनटक्के (पुणे)
    मो. 8805791905

१ ऑक्टोबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ३०)



मंगळवार, ३० ऑक्टोबर, २०१८

शेतकऱ्याचा प्रश्न

खरपूस • वात्रटिका

« शेतकऱ्याचा प्रश्न »

शेतकर्‍याचा प्रश्न आता
नाजूक अन् गंभीर आहे
प्रत्येकवेळी शासन म्हणते
पाठीशी आम्ही खंबीर आहे

प्रश्न सोडवण्याचं कसब
सरकारच्या हाती आहे
दोघांच्या भांडणात शेवटी
शेतकर्‍याचीच माती आहे

•  रघुनाथ सोनटक्के (पुणे)
    मो. 8805791905


३० ऑक्टोबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २)


Vatratika

जलयुक्त शिवार

खरपूस • वात्रटिका

« जलयुक्त शिवार »

जलयुक्त शिवारात पाणी 
नेहमीच मुरत असते
बोलले जेवढे त्यावर तेवढे
कमीच ठरत असते

एवढे कोटी पैसा म्हणे
कुठे शिवारी लागतो!
या घडीचा वार त्यांच्या
आता जिव्हारी लागतो

कोटींची रक्कम घालवुनही
बांध फुटायला लागतो
कामे दिसत नाही म्हटल्यावर
साहेबांना घाम फुटायला लागतो

•  रघुनाथ सोनटक्के (पुणे)
    मो. 8805791905


२९ ऑक्टोबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २८)



शनिवार, २७ ऑक्टोबर, २०१८

स्मारकांचे राजकारण

खरपूस • वात्रटिका

« स्मारकांचे राजकारण »

पुतळे, स्मारकांचे राजकारण
आता विकार झाला आहे
विचार सोडून सामान्य माणूस
अस्मितेचा शिकार झाला आहे

धर्म, मंदीर, पुतळे यांचे
लोणचे केले गेले आहे
विचार घेवून खरेच
कोणते भले केले आहे

महात्म्यांचे विचार सोयिस्करपणे
पुरून ठेवले जातात
स्मारके, पुतळे नुसतेच उभे
करून ठेवले जातात

•  रघुनाथ सोनटक्के (पुणे)
    मो. 8805791905

२७ ऑक्टोबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २७)



शुक्रवार, २६ ऑक्टोबर, २०१८

छंद

खरपूस • वात्रटिका

    « छंद »
    

कुणी म्हणतो भक्त आहे
कुणी म्हणतो तख्त आहे
माध्यम‍ांच्यांही तोंडी भाषा
तशीच आज व्यक्त आहे

कुणी अंध आहे
तर कुणी मंद आहे
ऐकमेकांना डिवचण्याचा
हा बरा छंद आहे

•  रघुनाथ सोनटक्के
  तळेगाव दाभाडे, पुणे

   मो. 8805791905

२५ ऑक्टोबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २५)






मंगळवार, २३ ऑक्टोबर, २०१८

मुद्यांची पळवाळवी

« मुद्यांची पळवाळवी »

निवडणूकीच्या तोंडावर
मुद्यांची पळवाळवी केली जाते
बावन पत्यासारखी त्य‍ांची
अदलाबदली केली जाते

काल त्यांनी चालवला
आज ह्यांच्याकडून चालवल्या जाते
जनतेला परत गुंतवून
काम आपलं भागवल्या जाते

२४ ऑक्टोबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २४)