सोमवार, ३० नोव्हेंबर, २०२०

शेतकर्‍यांची दिल्ली

शेतकर्‍यांची दिल्ली
भक्तांकडून उडवली जातेय
शेतकरी आंदोलनाची खिल्ली
मागण्यासांठी गाठायचीय
काही करून दिल्ली
करा पोलीस बंदोबस्त
कितीही पाण्याचा मारा
करून मुस्कटदाबी अशी
नाही सत्तेचा अहंकार बरा
हित कशात आहे आपलं
कळतं शेतकर्‍यांना चांगलं
अहंकारी सरकार शेवटी
काळ्याचंही आहे नमलं
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
  मो. ८८०५७९१९०५
Vatratika, Raghunath Sontakke


रविवार, २९ नोव्हेंबर, २०२०

बिलात सुट

बिलात सुट
बिलात सुट देऊ आम्ही
सरकारने असं म्हटलं होतं
शब्दाला जागतील हे तरी
जनतेला खरं वाटलं होतं

संकटकाळात जनतेला

द्या थोडातरी बरं दिलासा
का मग शब्द भुलवता हो
साेडा हात मोकळा जरासा

काहींना तर आले आहेत

भरमसाठ बिलाचे आकडे
सुधारा जरा अधिकार्‍यांनो
चुकलेलं पाऊल वाकडे
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
   मो. ८८०५७९१९०५

सोमवार, ९ नोव्हेंबर, २०२०

फटाकेबंदी

फटाकेबंदी
मानवतेचा दृष्टीकोन
दाखवुन द्यायची संधी
त्रास होऊ नये कोरोनाग्रस्तांना
म्हणून फटाक्यांची बंदी

धोकादायक ठरू शकतो
रोग्यांना फटाक्यांचा धूर
सरकारकडूनही निघतोय
अघोषित बंदीचाच सुर

तसाही वर आलाय
जास्तच प्रदुषणाचा स्तर
का कमीच होणारय आंनद
फटाके नाही फोडले तर?
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
 मो. ८८०५७९१९०५
Vatratika, Raghunath Sontakke


रविवार, ८ नोव्हेंबर, २०२०

मागच्या दाराचा प्रवेश

मागच्या दाराचा प्रवेश
जनाधार नसलेला नेता पक्षाला
मौल्यवान खुप ठरत असतो
विधानसभा न लढता मग
मागुन प्रवेश करत असतो

नियुक्तीच्या कसोटीवर तो
खराखरा ठरला पाहिजे
शोभेचे बाहुले न राहता
विशेष प्रश्नांवर बोलला पाहिजे
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
  मो. ८८०५७९१९०५
Vatratika, Raghunath Sontakke


शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०२०

पत्रकारितेची आड

पत्रकारितेची आड
पत्रकारिता आहे नक्कीच
लोकशाहीचा चौथा स्तंभ
नि:पक्षपणे सत्य मांडणे 
नको उदोउदो, ना दंभ

हल्ला आहे म्हणे त्यावर
काढत आहेत काही गळे
पत्रकारितेच्या आडं झाकणे
गुन्हेगाराला बळे बळे
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
मो. ८८०५७९१९०५
Vatratika, Raghunath Sontakke



गुरुवार, ५ नोव्हेंबर, २०२०

पदाची रेस

पदाची रेस
ग्लॅमरस फेस, आयारामांना संधी
कार्यकर्त्यांना मिळेल का न्याय?
आधीच्यांनी घ्यायची मेहनत 
अन् दुसर्‍यांनीच खायची साय!

पद वाटणीच्या रेसमधे
पुढेपुढे ते करत असतात
पक्षाला मोठे करण्यात
कार्यकर्ते मात्र मरत असतात
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
  मो. ८८०५७९१९०५
Vatratika, Raghunath Sontakke