शुक्रवार, १२ एप्रिल, २०१९

वंचित आणि किंचित

 खरपूस • वात्रटिका

« वंचित आणि किंचित »
जो वंचित आहे तो
कुणाला किंचित वाटतो
सत्तेसोबत राहून कुणी
नेहमी पदही लाटतो

सार्‍या फिरून आघाड्या
त्यांनी अनुभव घेतलाय
आश्वासनाचे गाजर घेऊन
कुणी भलताच चेतलाय

कुणाची घेऊन सुपारी
आपणच वाजवावी बीन
स्वाभिमानावरून आठवले
किती व्हावी स्थिती दीन

• रघुनाथ सोनटक्के

(१२ एप्रिल २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १६१)
Vatratika

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks to comment on my blog. :)