मंगळवार, ३० एप्रिल, २०१९

चर्चा


खरपूस • वात्रटिका 

 « चर्चा »
कुणाच्या कामाच्या
तर कुणाच्या दमाच्या चर्चा आहेत
मीडियात त्यांची वाहवा
कार्यकर्त्याच्या हाती खुर्च्या आहेत

आज आहे मोलाचा गडी
खूप त्याच्यावर खर्चा आहे
मतदान आटोपलं कि
फक्त सत्तेकडे मोर्चा आहे 

• रघुनाथ सोनटक्के

(३० एप्रिल २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १७६)
Vatratika

सोमवार, २९ एप्रिल, २०१९

सरशी

खरपूस • वात्रटिका
« सरशी  »
जेवढी होती ताकद जीभेची
तेवढी त्यांनी पाजळली आहे
प्रचाराच्या निमित्ताने का होईना
कारकिर्द त्यांची उजळली आहे

पाहणे आता मजेशीर कि
कुणाची किती होते सरशी
कुणाची जाईल पत उरलेली
तर जाईल कुणाची खुर्ची
• रघुनाथ सोनटक्के

(२९ एप्रिल २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १७५)
गुगल सर्च: 'kharpus vatratika'
Vatratika

शनिवार, २७ एप्रिल, २०१९

शेवटचा टप्पा

खरपूस • वात्रटिका

« शेवटचा टप्पा »
उरलेसुरल्यांनी आता
कंबर कसली आहे
एवढावेळ प्रचार करून
कळ सोसली आहे

नाचून-गाऊन एकदाचं
शेवटचा आता टप्पा आहे
पुढच्या पंचवार्षिकला भेटायला
त्याचा गणपती बाप्पा आहे
• रघुनाथ सोनटक्के

(२७ एप्रिल २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १७४)
Vatratika

शुक्रवार, २६ एप्रिल, २०१९

लाव रे तो विडिओ

खरपूस • वात्रटिका

« लाव रे तो विडिओ »
आधी काय बोलले त्याचा
दाखल्यासह पुरावा आहे
जिंकण्यासाठी नव्हे खटाटोप
तर इच्छा कुणी हरावा आहे

जुन्या फोटो आणि विडिओची
सभांमुळे खुप चलती आहे
जशास तशा उत्तराने त्यात काय
शुट करणाराची गलती आहे!

• रघुनाथ सोनटक्के
गुगल सर्च: 'kharpus vatratika'

(२६ एप्रिल २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १७३)
Vatratika

गुरुवार, २५ एप्रिल, २०१९

पोल

खरपूस • वात्रटिका

« पोल »
कुणाची येणार सत्ता
किती मिळणार जागा
शक्य-शक्यतांचा शेवटी
असतो एकच धागा

म्हणे जनमताचा कानोसा
कुणी करतो पोल
कुणाचं होते खच्चीकरण
कुणाचा वाजते ढोल

जनतेच्या मनातला
ओळखणे कठीण कल
निकालापर्यंत करत राहावा
नुसता असाच खल
 
• रघुनाथ सोनटक्के 
(२५ एप्रिल २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १७२)
Vatratika

बुधवार, २४ एप्रिल, २०१९

कसोटी

खरपूस • वात्रटिका

« कसोटी »
टप्पाटप्प्याने सुरू
दिग्गजांची कसोटी
दिशा बदलण्यात
त्यांची बरी हातोटी

कुणाची परिक्षा
कुणाची अटीतटी
पाठींबा, बळासाठी
चालल्यात भेटीगाठी

• रघुनाथ सोनटक्के
 गुगल सर्च: kharpus vatratika
 
(२४ एप्रिल २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १७१)
Vatratika

मंगळवार, २३ एप्रिल, २०१९

थप्पडबाजी

खरपूस • वात्रटिका

« थप्पडबाजी »
कुणी थप्पड मारतो
कुणाला मिळते चप्पल
आणायची असते ठिकाणावर
बोलघेवड्यांची अक्कल

कुठे दबलेल्या रागाची
अशी मोकळी होते वाट
कळेला आपल्याच गराड्यात
कोण घालेल असा घाट

तोंड सांभाळून बोलावं
आता अनेकांना पटलं असेल
नवल नसेल बोलतांना कुणी
तोंड हेल्मेटने झाकलं असेल

• रघुनाथ सोनटक्के
 (२३ एप्रिल २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १७०)
Vatratika
 

रविवार, २१ एप्रिल, २०१९

सत्तालोभी

« सत्तालोभी »
तुकडा मिळेल तिकडे
सत्तालोभींचा पळ आहे
जिथे मिळेल लाभ तिथे
सौदेबाजांचा तळ आहे

कुठे कुणी बाजी मारली
तर कुणी उतरला आहे
तिकीटाच्या रस्सीखेचमधे
इच्छूक पार बिथरला आहे

पद मिळणार नाही म्हणून
कुठे काहींची गळती आहे
लाभासाठी काहींची पावले
दुसरीकडे वळती आहे
• रघुनाथ सोनटक्के
(वात्रटिका क्रं.१४८)

(२० एप्रिल २०१९ दै. युवा छत्रपती वात्रटिका क्रं. १६८)

Vatratika

शुक्रवार, १९ एप्रिल, २०१९

जीभेचा ताबा

खरपूस • वात्रटिका

« जीभेचा ताबा »
धूमशान सुरू झालं
प्रत्येकजणच पेटला आहे
बरळण्यात जीभेचा ताबा
काहींचा खुपच सुटला आहे

अश्लिल, नैतिकता सोडून
हिन पातळी गाठली आहे
अभिव्यक्तीच्या नावाखाली
लोकशाही बाटली आहे
• रघुनाथ सोनटक्के

(१९ एप्रिल २०१९ दै. युवा छत्रपती वात्रटिका क्रं. १६७) 
Vatratika
 

बुधवार, १७ एप्रिल, २०१९

प्रलोभनांची नांदी

खरपूस • वात्रटिका

« प्रलोभनांची नांदी »
प्रचार म्हटलं कि
प्रलोभनांची
ही नांदी असते
मतदारांना
जोडण्यासाठी
कार्यकर्त्यांची च‍ांदी असते

खायला, प्यायला, फिरायला
खिशातही दाम असतो
नाकर्त्या नेत्यांच्या यशात
कार्यकर्त्यांचा घाम असतो

• रघुनाथ सोनटक्के

(१७ एप्रिल २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १६५), २२ एप्रिल २०१९ दै. पथदर्शी
(२५ एप्रिल, बलशाली भारत)

मतदार राजा

खरपूस • वात्रटिका
« मतदार राजा »
वेळ आल्यावर तर तो
मतदार 'राजा' असतो
देश त्याच्याहाती असल्याचा
मोठा गाजावाजा असतो

वाजतगाजत दारी जाऊन
त्याचे पाय धरले जातात
कधी गोड-गोड बोलून
तर कधी पैशेही पेरले जातात
• रघुनाथ सोनटक्के
(दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १६५)
१७ एप्रिल २०१९ च्या दै. पथदर्शी आणि प्रीतिसंगम मधे प्रकाशित
(२६ एप्रिल, बलशाली भारत)
 

मंगळवार, १६ एप्रिल, २०१९

ईव्हीएमचा घोळ


« ईव्हीएमचा घोळ »

कुठे ईव्हीएम मशिनचा
झाला म्हणे घोळ आहे
कुठे लाख मतदारांची 
नावे केली गहाळ आहे

खापर फोडण्यास आता
पराभवाची ही कळ आहे
चौकशी करण्यासाठी ह्याची
आता कुणाला वेळ आहे

कामे करुनही पराभव
सारा आकड्यांचा खेळ आहे
कुणी जाणले मतदाराच्या मनातले
समजदारीचीच आता वेळ आहे

नियोजन, संपर्क, कार्य करणे
एवढाच आमचा सल्ला आहे
पराभवाने खचुन न जाता
गाठायचा अजुन लांब पल्ला आहे
  
        • रघुनाथ सोनटक्के©

  (दि २ जून २०१८ च्या दै. 'युवा छत्रपती' या लातूरच्या दैनिकात प्रकाशित )
(१६ एप्रिल २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १६४) 




सोमवार, १५ एप्रिल, २०१९

लक्ष्यभेद

खरपूस • वात्रटिका
« लक्ष्यभेद »

बिनाडब्यांचं इंजिन
आवाज करत पळते आहे
सत्ताधार्‍याच्या विरूध्द
विरोधाचा धूर सोडते आहे

राजकारण ढवळून राज्यभर
मुद्दयांवर बोट ठेवलं आहे
जोडगोळीला लक्ष्यभेद करत
आघाडीचं मस्त फावलं आहे

‍सभा कुणाची, पैसा कुणाचा
खोलात कुणाला जायचं नाही
हिशेब मात्र जनताच लावेल
अन् आसन कुणाला द्यायचं नाही

• रघुनाथ सोनटक्के

(१५ एप्रिल २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १६३)
Vatratika

शनिवार, १३ एप्रिल, २०१९

गुरू शिष्य

खरपूस • वात्रटिका

« गुरू-शिष्य»
कुणी कुणाचा शिष्य आहे
तर कुणी आहे गुरू
रणांगणात वाक-युध्द
त्यांचे झाले सुरू

असे कसे हे नाते
चिखलफेक करतात जाहीर
ऐकमेंकाची खेचायला
आहेत किती माहीर

खोटी प्रशंसा करून
मनातल्यामनात हसवलं जातं
दुतोंडी राजकारण करून
जनतेलाच फसवलं जातं

• रघुनाथ सोनटक्के

(१३ एप्रिल २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १६)
Vatratika

शुक्रवार, १२ एप्रिल, २०१९

वंचित आणि किंचित

 खरपूस • वात्रटिका

« वंचित आणि किंचित »
जो वंचित आहे तो
कुणाला किंचित वाटतो
सत्तेसोबत राहून कुणी
नेहमी पदही लाटतो

सार्‍या फिरून आघाड्या
त्यांनी अनुभव घेतलाय
आश्वासनाचे गाजर घेऊन
कुणी भलताच चेतलाय

कुणाची घेऊन सुपारी
आपणच वाजवावी बीन
स्वाभिमानावरून आठवले
किती व्हावी स्थिती दीन

• रघुनाथ सोनटक्के

(१२ एप्रिल २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १६)
Vatratika

गुरुवार, ११ एप्रिल, २०१९

पैशाचा वापर

खरपूस • वात्रटिका
« पैशाचा वापर »
निवडणूकीच्या मोक्यावर
निघतो आहे पैसा काळा
साम, दामाच्या वापराला
मतदारांनो आता टाळा

जिंकण्यासाठी अतोनात
पैसा खुप ओतला जाईल
तुमच्या खिशातून काढून मग
त्यांच्या घशात घातला जाईल

प्रलोभनाला बळी पडून
देऊ नका अशांना मौका
जाणून घ्या वेळीच हा
लोकशाहीचा खरा धोका
• रघुनाथ सोनटक्के
(१ एप्रिल २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १६०)
Vatratika

जनतेची फिरकी

खरपूस • वात्रटिका

« जनतेची फिरकी »
त्यांनी संकल्प केला आहे
ह्यांना न्याय द्यायचा आहे
कुणाचा जाहिरनामा खरा
आता तेच पाहायचा आहे

तेच तेच वादे, घोषणा
आलटूनपालटून देत असतात
राजकारणाच्या पटलावर
फिरकीवर फिरकी घेत असतात

• रघुनाथ सोनटक्के

(१० एप्रिल २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १५९)
Vatratika

मंगळवार, ९ एप्रिल, २०१९

प्रचाराचा खेळ

खरपूस • वात्रटिका

« प्रचाराचा खेळ »

तोफा लागल्या धडाडायला
रण आता पेटले आहे
नामी, सुज्ञ राजकारणी
चिखलफक करत सुटले आहे

धन आणि वाचाशक्तीचा
खेळ खुप रंगला आहे
निकाल लागेपर्यंत मतदाराने
जीव त्यांचा टांगला आहे
• रघुनाथ सोनटक्के
ब्लाॅग: https://vatratika.blogspot.com

(९ एप्रिल २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १५८)
Vatratika

सोमवार, ८ एप्रिल, २०१९

प्रचाराची पातळी

  प्रचाराची पातळी
प्रचाराच्या घाईगडबडीत
खरे मुद्देच विसरले आहेत
समस्यांकडे दुर्लक्ष करून
कुटूबांवरच घसरले आहेत

उणीदुणी, टिंगलटवाळी
दुसर्‍याचं कुसळ दिसत आहे
मतदारांना भरकटवायला
प्रचार खुप उथळ वाटत आहे
रघुनाथ सोनटक्के

(दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १५७)
Vatratika
 

रविवार, ७ एप्रिल, २०१९

आश्वासने

खरपूस • वात्रटिका
 
« आश्वासने »
कुणी म्हणते हवा आहे
तर कुणाची लाट आहे
विकासापेक्षा आश्वासनांची
गाडी खुप सुसाट आहे

मतदारांना गृहित धरून
आश्वासनांचा मेवा आहे
आरोप-प्रत्यारोपांच्या गर्दीत
फक्त विकासच हवा आहे
• रघुनाथ सोनटक्के
(६ एप्रिल २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १५६)
(बलशाली भारत, ८ एप्रिल)
VatratikaVatratika
 

गुरुवार, ४ एप्रिल, २०१९

गरिबीचं शुक्लकाष्ठ

खरपूस • वात्रटिका

  « गरिबीचं शुक्लकाष्ठ »
तुम्हाला वाटतं यांच्यामुळे
गरिबी तुमची हटेल?
कित्येक वर्षापासून तेच ते
आताही मनाला पटेल!

गरिबी फक्त त्यांची हटली
आपली हटणार नाही
घराणेशाहीच्या युगात
शुक्लकाष्ठ हे सुटणार नाही

गरिबीला जाहिरनाम्यात
दरवेळी ठळक स्थान आहे
घराण्यांना सत्ता देणे
हा लोकशाहीचा अपमान आहे

• रघुनाथ सोनटक्के
(दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १५)
Vatratika

जाहिरनामे

खरपूस • वात्रटिका

  « जाहिरनामे »
आवाक्याबाहेर वादे करून
जनतेला फक्त भूरळ असते
समजदार जनतेचं मत मात्र
थेट आणि सरळ असते

जनतेचा वाली असल्याचा
प्रत्येकाला मोठा आव असतो
मनमोहक जाहिरनाम्यांना
शेवटी रद्दीचाच भाव असतो

• रघुनाथ सोनटक्के

( एप्रिल २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १५४)



बुधवार, ३ एप्रिल, २०१९

गरमागरम

खरपूस • वात्रटिका

    « गरमागरम »

 ऐन उन्ह‍ाळ्यात सगळीकडे
वातावरण खुप तापलं आहे
गरमागरम चर्चा, बातम्यांनी
समाजमन व्यापलं आहे

आरोप, आश्वासनांची
धूळफेक खुप चालली आहे
मतदारांना खुश करण्याची
कसम हरेकाने खाल्ली आहे


• रघुनाथ सोनटक्के
(३ एप्रिल २०१९ दै. युवा छत्रपती, बलशाली भारत, मराठवाडा संचार, वात्रटिका क्रं. १५३)
  ४ एप्रिल २०१९ च्या दै. पथदर्शी मधे प्रकाशित

मंगळवार, २ एप्रिल, २०१९

फोडाफोडी

खरपूस • वात्रटिका

 « फोडाफोडी »
एकाच पक्षात हजार दावेदार
कुठे कुणाचं बंड आहे
उमेदवारी मिळाली की
मग मात्र सारं थंड आहे

मते आणि मोहरे
पक्ष सारे जोडायला लागले
कुठे खिंडार पडले तर
कुणी गड फोडायला लागले
• रघुनाथ सोनटक्के

 २ एप्रिल २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १५२