बुधवार, २८ ऑक्टोबर, २०२०
मंगळवार, २७ ऑक्टोबर, २०२०
कांद्याची महागाई
कांद्याची महागाईकांदा महाग झाला म्हणेथोडं त्याच्याही झोळीत पडू द्यासदा तोच रडत असतोजरा स्वत:लाही रडू द्या
कळून चुकेल त्यांचं दु:खथोडी सोसा महागाईची झळतुमचं तर थोड्या दिवसांचंत्याची आहे नेहमीची कळ• रघुनाथ सोनटक्के, पुणे मो. ८८०५७९१९०५
बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२०
आश्वासनांची पुर्ती
राज्य आहे आर्थिकदृष्ट्या
आपलं खुप आजारी
मदत करायची म्हणजे
आणखी कर्जबाजारी
त्यांनी मारलाय टोला
यांचा उलटा पलटवार
गरजूंना हवी आश्वासनपूर्ती
नको आश्वासने भरमार
काही करून व्हायला हवी
आश्वासनांची पुर्ती
नका दाखवु बोट तुम्ही
उगीच एकमेकांवरती
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
मो. ८८०५७९१९०५
रविवार, १८ ऑक्टोबर, २०२०
पाहणी दौरा
पाहणी दौरा
पीकांचं झालं नुकसान
सुरू नेत्यांचा पाहणी दौरा
फेकून आश्वासनाचे बोल
दोन दिवस पायाला भवरा
दुष्काळी भागाची पाहणी
नेत्यांचा हल्ली ट्रेंड झाला आहे
खोट्या सहानुभूतीचे नाटक
कैमेरा त्यांचा फ्रेंड झाला आहे
हे तर सारं चालतच राहिल
सरकारकडूनही फलित हवे
सात्वंनाच्या नावे विरोधकांनी
समजू नये याला कोलीत नवे
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
मो. ८८०५७९१९०५
गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२०
लसीची प्रतिक्षा
लसीची प्रतिक्षा
मंदिरची दारं
मंदीराची दारं
रविवार, ११ ऑक्टोबर, २०२०
परतीचा पाऊस
बुधवार, ७ ऑक्टोबर, २०२०
मिडियाचा खेळ
मिडियाचा खेळ
बेताल वक्तव्य करून ती
होत आहे ड्रामा 'क्वीन'
नाचणारे राहतात तयार
मिडियाचा घेऊन बीन
बाजू घ्यायला वाचाळांची
पक्षही हळूहळू भीडतात
खरे प्रश्न सोडून मिडियावाले
लाईव्ह-ब्रेकिंग खेळतात
कुरघोड्यांचा चाललाय हा
जणू कुत्र्यामांजरांचा खेळ
मिडियालाही हवी असते
बातम्यांची चटपटीत भेळ
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
मो. ८८०५७९१९०५
उलथापालथ
उलथापालथ
होणार आहे म्हणे राज्यात
काहीतरी उलथापालथ
आधीच परिस्थिती गंभीर
खराब होत चालली हालत
उडत असतात अधूनमधून
अशाच भुकंपाच्या चर्चा
माध्यमांचं ते खाद्य असते
अन् आपल्या वेळेचा खर्चा
कुणाची तिरकी चाल आहे
कुणाची आहे कुरघोडी
सुखासमाधानाने चालू द्या
रूळावर चाललेली गाडी
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
मो. ८८०५७९१९०५
शेतकर्यासाठी कायदा
शेतकर्यासाठी कायदा
सरकार म्हणते आणलाय
शेतकरी हिताचा कायदा
शेतकर्याचांच विरोध होतोय
कि भांडवलदारांचा फायदा!
सारं गेलं दिवाळखोरीत
सोडा देशाचा तरी कणा!
दुप्पट भावाचा वादा होता
हमीभावाचाही पत्ता कुणा?
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
मो. ८८०५७९१९०५
स्त्रियांचे दमन
स्त्रियांचे दमन
दिल्ली असो कि मग
असो गाव, शहर हाथरस
होतात बलात्काराच्या बळी
अन् जीवाचीही कसरत
निष्पाप स्त्रियांचे दमन करून
सर्वस्व त्यांचे लुटत आहेत
अपराधी कायद्याच्या कचाट्यातून
बिनधास्तपणे सुटत आहेत
सरकारकडूनही न्यायात भेद
काय अशा प्रशासनाचा फायदा?
जात असतील जर असेच बळी
नक्कीच कमी पडतो कायदा
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
मो. ८८०५७९१९०५
मंगळवार, ६ ऑक्टोबर, २०२०
झाडांची कत्तल
झाडांची कत्तल
आश्वासनांचा बहार
आश्वासनांचा बहार
कुणी देतो म्हणे थाळी
कुणी देतो म्हणे आहार
प्रचाराच्या नादात आलाय
आश्वासनांचा बहार
जनतेचा वाली असल्याचा
प्रत्येकाला मोठा आव असतो
मनमोहक जाहिरनाम्यांना
शेवटी रद्दीचाच भाव असतो
- रघुनाथ सोनटक्के, पुणे
प्रचाराची पातळी
प्रचाराची पातळी
कुणाच्या कोपरखळ्या
कुणाच्या नकला हातवारे
इथूनतिथून सारेच आहेत
पातळी सोडून बोलणारे
कुणाचा भरवसा असतो
आरोपांची कॅसेट घासून
हरप्रकारेच घेत असतात
ते आपलं नाणं घासून
• रघुनाथ सोनटक्के
शनिवार, २६ सप्टेंबर, २०२०
कोरोनाचा धोका
कोरोनाचा धोका
मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२०
नट-नट्यांचा वापर
नट-नट्यांचा वापर
सोमवार, १४ सप्टेंबर, २०२०
महापुरूषांशी तुलना
महापुरूषांशी तुलना
उत्साही कार्यकर्ते लागलेत
तुलना महापुरूषाशी करू
कुठे ते पराक्रमी राजे अन्
कुठे हे भंपक विकासगुरू
अतीउत्साहाच्या भरामधे
अशी बरोबरी ते साधत असतात
लीन झालेले भक्त मंदपणे
बेतालासारखे वागत असतात
व्यक्तीचा उदो-उदो करणे
बाकी त्यांना कशाची तमा नाही
असल्या अंधपणाच्या खुळाला
जनतेच्या मनामधे क्षमा नाही
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
मो. ८८०५७९१९०५
बुधवार, २६ ऑगस्ट, २०२०
संविधानाचे मोल
दुष्टपणे अपमान करणारे
उगवले आहेत सरडे
समतावादी संविधानपेक्षा
जड कुणाचे पारडे?
मोसमी उपटसुंभ अधूनमधून
वांगी आपली सोलत असतो
कालबाह्य, शोषनमुल्यासोबत
संविधान मग तोलत असतो
उगवलेला दंभ विचार
वेळीच असा ठेचला पाहिजे
ज्यावर आपण उभे आहोत
तो तरी विचार वाचला पाहिजे
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
गुगलवर सर्च करा: kharpus vatratika
शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२०
चौकशीचा फेरा
चौकशीचा फेरा
तपासाची दिशा ठरत आहे
जे विचारवंत मारले गेले त्याचा
तपास कोण, कुठे करत आहे?
कुणाची करायची गोची म्हणून
विशेष चौकशीचा हेका आहे
मनुष्यबळ आणि यंत्रणेचा
गैरवापर होणे हा धोका आहे
शेतकर्यांच्या आत्महत्यांची
ना कुणाला कुठे चिंता आहे
सरळ समस्या न सोडवणारा
राजकारण हा गुंता आहे
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
बंडखोरी म्यान
बंडखोरी म्यान
सोडून गेले होते काहीजण
नाराजीने अशोकाचे वन
विमान परतले पायलटचे
पाहून सुकलेले कमळबन
बंडखोरीची तलवार शेवटी
करावी लागली त्यांना म्यान
शेवट काय होतो यासाठी होतं
याकडे सार्या देशाचं ध्यान
कितीही भक्कम असलं तरी
चाणक्य आमदार फोडू शकतात
सत्तेच्या हावेपायी राजकारणात
कोणतेही चमत्कार घडू शकतात
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
मो. ८८०५७९१९०५











