शुक्रवार, १९ जुलै, २०१९

पाकचा पोपट

खरपूस • वात्रटिका

« पाकचा पोपट »

खोट्या, लबाड पाकला
पुन्हा बसला दणका
पंधरा विरूध्द एकने
निर्णय दिला खमका

हिंमत नाही लढण्याची
कुरापती करू लागला आहे
कुत्र्याच्या शेपटासारखाच
परत आताही वागला आहे

• रघुनाथ सोनटक्के

(१
जुलै २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २४०)
Marathi Vatratika
 

गुरुवार, १८ जुलै, २०१९

मुख्यमंत्रीपदाचा मुकुट

खरपूस • वात्रटिका

« मुख्यमंत्रीपदाचा मुकुट »

नेत्यांचं ठरलेलं आहे
कार्यकर्ते भीडत आहेत
सत्तेखाली झाकलेलं वैर
पुनःपुन्हा काढत आहेत

मुख्यमंत्रीपदाचा मुकुट
दोघांनाही हवा आहे
थोड्याथोड्या अवधीने
पुन्हा त्यांचा दावा आहे

कितीही झाकली तरी
इच्छा पुन्हा उसळत आहे
कार्यकत्यांचं संतुलन
नको तेवढं ढासळत आहे

• रघुनाथ सोनटक्के

(१८ जुलै २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २३९)

Marathi Vatratika

बुधवार, १७ जुलै, २०१९

अजून प्रतिक्षाच

खरपूस • वात्रटिका

« अजून प्रतिक्षाच »
बरीच धरणं कोरडी
थो
डीच भरली आहेत
पावसाची मात्र प्रतिक्षाच
भाकीतं वांझ ठरली आहेत

भर पावसाळ्यातही सुर्य
कडाडून तापायला लागला
अर्धा महाराष्ट्र दुष्काळात
निसर्गही सावत्र वागायला लागला

• रघुनाथ सोनटक्के
शब्दरसिकचा दिवाळी अंक येथे बघा: http://bit.ly/ShabdRasik-2018
(१७ जुलै २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २३८)
Marathi Vatratika
 

 

मंगळवार, १६ जुलै, २०१९

पळापळीचा रोग

  « पळापळीचा रोग »
राजकारणातील घडोमोडींना
रोज धक्क्यावर धक्का आहे
फोडाफोडींचा वेग बघता
जो तो हक्काबक्का आहे
राज्याराज्यामधे पक्षांतराला
नव्याने वेग आला आहे
पळापळीचा भल्याभल्यांना
हा मोठा रोग झाला आहे
• रघुनाथ सोनटक्के
(१६ जुलै २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २३७)
Marathi Vatratika

शब्दरसिकचा दिवाळी अंक येथे बघा:
२०१८: http://bit.ly/ShabdRasik-2018
Vatratika, Raghunath Sontakke

सोमवार, १५ जुलै, २०१९

भूमिका

खरपूस • वात्रटिका

« भूमिका »
प्रत्येकजण भूमिका घेऊन
पक्ष आपला थाटत असतो
जरी सोयीने असला त्याच्या
थोडा आपला वाटत असतो

भूमिका, तत्व, निती आता
नावापूरतीच राहिली आहे
भूमिकेला ठाम राहण्याची
शाश्वती कुठे राहिली आहे!
• रघुनाथ सोनटक्के

(१५ जुलै २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २३६)
Marathi Vatratika

शनिवार, १३ जुलै, २०१९

यशापयश

खरपूस • वात्रटिका

« यशापयश »
हरलो जरी कितीदा
जिंकायची आम्हाला हाव आहे
हार-जीत तर होणारच
तो खेळाचा एक भाग आहे

चढउतार, यशापयश
जीवनाचा आधार आहे
अपयश पचवुन चालत राहणे
हा चांगला प्रकार आहे

• रघुनाथ सोनटक्के

(१३ जुलै २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २३५)
Marathi Vatratika

शुक्रवार, १२ जुलै, २०१९

आमदारांची नाराजी

आमदारांची नाराजी
आमदारांची नाराजी आहे
कुठे आमदारच लपले आहेत
कुणी होतात हायजॅक
काही स्वतःहून विकले आहेत
• रघुनाथ सोनटक्के
Marathi Vatratika
 (१२ जुलै २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २३४)

गुरुवार, ११ जुलै, २०१९

राजीनाम्यावर राजीनामा

खरपूस • वात्रटिका
 
« राजीनाम्यावर राजीनामा »
राहूलने दिला राजीनामा
तरी तोच त्यांचा फादर आहे
घराणेशाहीविणा पर्याय कुठे?
रोज राजीनामा सादर आहे

स्थानिक नेत्यांनी पक्षाचा
स्वत:साठी फक्त वापर केला
प्रतिमापूजनाशिवाय भागेना
म्हणून श्रेष्ठींचा आदर केला

• रघुनाथ सोनटक्के

 (१ जुलै २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २३)
Marathi Vatratika

बुधवार, १० जुलै, २०१९

ऑनलाईन फंडा

« ऑनलाईन फंडा »
ऑनलाईनच्या जमान्यात
पडू नका मोहाला बळी
फसवणारा तर गोवतोच
वाजत नाही एका हाताने टाळी

वैयक्तिक, गोपनिय माहिती
देऊ नका कुणा भीतीने
पायावर धोंडा मारणे
शक्य नाही तुमच्या साथीने

जपून वावरा आभासी जगात
दुधारी सोशल, ऑनलाईन फंडा
ओळखी, अनोळखी कुणीही
घालू शकतो तुम्हाला गंडा
• रघुनाथ सोनटक्के
(१० जुलै २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २३२)
Vatratika, Raghunath SontakkeRaghunath Sontakke

मंगळवार, ९ जुलै, २०१९

नकली बियाणे

« नकली बियाणे »
मदतीचे वचन मिळते
सरकारकडून नव्याने
फसवणूक तर होतच आहे
देऊन नकली बियाणे

मूळ बियाण्यांना तिलांजली
झालो कंपन्याच्या हवाली
टप्पाटप्प्याने खायला बसले
जिथेजिथे असले मवाली

• रघुनाथ सोनटक्के
शब्दरसिक दिवाळी अंक: http://bit.ly/ShabdRasik-2018
 (९ जुलै २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २३१)
Raghunath Sontakke
 

सोमवार, ८ जुलै, २०१९

खेकड्यांना भीती

खरपूस • वात्रटिका

« खेकड्यांना भीती »

खेकडीन म्हणाली खेकड्याला
जाऊ नका बाहेर
पोलिस पकडून तुम्हाला
घालतील गळ्यात टायर


सोडून देतील चोरांना
ठेचतील तुमची नांगी
धरणफुटीला जबाबदार
आहात म्हणतील तुम्ही


माणसांच्या चूकांमुळे
खेकड्यांना भीती आहे
दुसर्‍याला दोष देणे
हि माणसांची रिती आहे

• रघुनाथ सोनटक्के
 (८ जुलै २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २३०)
Raghunath Sontakke

शनिवार, ६ जुलै, २०१९

नाहक मरण

खरपूस • वात्रटिका

  « नाहक मरण »
कुठे खचली भिंत
कुठे फुटलं आहे धरण
निष्पाप जीवांना मात्र
नाहक मिळालं मरण

माणसांच्या चूकांनीच
निसर्ग कोपू लागला
ऐकमेकांना दोष देत
पुन्हा तसाच वागू लागला
• रघुनाथ सोनटक्के
(६ जुलै २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २२९)
Raghunath Sontakke

गुरुवार, ४ जुलै, २०१९

जर्सी

खरपूस • वात्रटिका

  « जर्सी »
कुणाला आवडला नाही
कलर टिमच्या जर्सीचा
भलत्याच कारणाने गाजतोय
वर्डकप या वर्षीचा

कुणाला कशाचं तर
कुणाला कलरचं वावडं आहे
खेळ सोडून राजकारणातच
लक्ष नको तेवढं आहे

• रघुनाथ सोनटक्के

(४ जुलै २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २२८)
Raghunath Sontakke

बुधवार, ३ जुलै, २०१९

नियोजनशुन्यता

« नियोजनशुन्यता »
नियोजन नसल्याने शहरं
वाढली आहेत बेफाम
तुडूंब भरतात मग नाल्या
आणि रोडही होतात जाम

उन्हाळ्यात पडते कमालीची
पाण्यासाठी कोरड
पावसाळ्यात घुसते पाणी
पळापळ आणि ओरड

मुंबईसारखी इतरही शहरं
नको तशी वसली आहेत
नियोजनशुन्यतेने महापूरासारखी
भूतं मानेवर बसली आहेत
• रघुनाथ सोनटक्के

शब्दरसिक दिवाळी अंक: http://bit.ly/ShabdRasik-2018

(३ जुलै २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २२७)

Marathi Vatratika

मंगळवार, २ जुलै, २०१९

वंचितची बाजी


« वंचितची बाजी »

गड ढासळून गेल्यावर
वंचित आठवला आहे
हायकंमांडने आदेश
सरदारांना पाठवला आहे

लाखाने मते घेऊन
वंचितने घेतली बाजी आहे
हाताला पराभवाची जखम
अजून खुप ताजी आहे

• रघुनाथ सोनटक्के

(२ जुलै २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २२६)

सोमवार, १ जुलै, २०१९

पावसाची कृपादृष्टी


« पावसाची कृपादृष्टी »
वाट पाहून थकवलं होता
आता कुठे बरसला आहे
काही ठिकाणी धुवाधार
तर कुठे शेतकरी अजूनही
तरसला आहे
पेरणीची सुरू धामधूम
मातीला आता तृप्त कर
अशीच कृपादृष्टी राहू दे
दुष्काळापासून मुक्त कर
• रघुनाथ सोनटक्के

(१ जुलै २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २२५)
Marathi Vatratika

शनिवार, २९ जून, २०१९

सुवर्णमध्य


सुवर्णमध्य
राजकारण्यांनी केला आहे
जात आणि धर्माचा वापर
आपणच निवडून दिलं त्यांना
मग फोडावं कुणावर खापर

इर्षा, द्वेश, दूही पसरवुन
होत काय बरं साध्य
चर्चा, सुसंवादानेच निघेल
उपाय अन् सुवर्णमध्य
• रघुनाथ सोनटक्के
(२९ जून २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २२४)

Marathi Vatratika

शुक्रवार, २८ जून, २०१९

घोषणा आणि नारे

ख र पु स । वा त्र टि का •
 
घोषणा आणि नारे  
संसदेत तर कधी रस्त्यावर
होतात घोषणा आणि नारे
विषच पेरले जाईल मनात
काय साध्य होणार याने

सहिष्णुता आणि आदर
राहिलाच आहे कुठे?
भोगावे लागतील परिणाम
असल्या गोष्टींनी मोठे

सलोखा आणि शांती
राहावी समाजात टिकून
काय भेटेल सगळ्यांना
जर सदभावना टाकली विकून
• रघुनाथ सोनटक्के©

 (२८ जून २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २२३)
Marathi Vatratika

गुरुवार, २७ जून, २०१९

काळ्या पैशाची यादी


काळ्या पैशाची यादी
अखेर उघड झालीच
काळ्या पैशाची यादी
बडी धेंडं, उद्योगपती
नाही माणसं कुठेच साधी
• रघुनाथ सोनटक्के 

(२७ जून २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २२२)
Marathi Vatratika
 

बुधवार, २६ जून, २०१९

सायकल आणि हत्ती



सायकल आणि हत्ती
 पंक्चर झाली सायकल
मायावी हत्तीच्या भाराने
हत्ती म्हणे एकटा बरा
दणकून बसलेल्या माराने
 रघुनाथ सोनटक्के

(२५ जून २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २२१)
Marathi Vatratika