शुक्रवार, १७ फेब्रुवारी, २०१७

मतदारराजा

मतदार राजा
कुणी म्हणतं लुटलं त्यांनी
कुणाच्या पारदर्शकतेच्या बाता
कुणी ठरवतं चोर कुणाला
द्याव्या कुणाच्या हाती चाव्या आता

यांचा काय चार दिवस
वाद, मतभेद अन् गाजावाजा आहे
तुच निवड स्वत:चं भविष्य
कारण तुच मतदार राजा आहे
• रघुनाथ सोनटक्के
  8805791905
  (आणखी वात्रटिकांसाठी https://vatratika.blogspot.in या ब्लॉगला सबस्काईब करा. )

बुधवार, १ फेब्रुवारी, २०१७

मनसे युती

«वात्रटिका»

मनसे युती

नाही अटी, जागांबाबत
आमचा काही वाद आहे
मराठी मतांसाठी फक्त
'मन'से आमची साद आहे


स्व:ताहून टाळी देतो आम्ही
कशी बघा आली वेळ आज आहे
'उध्दवा' तुला चांगलंच माहीत
यात काय गोड 'राज' आहे

    • रघुनाथ सोनटक्के

       ८८०५७९१९०५
(आणखी वात्रटिकांसाठी https://vatratika.blogspot.in येथे विजिट द्या.)

सोमवार, ३० जानेवारी, २०१७

औकात

औकात

कुणी 'औकात' दाखविण्याची
करतो बात आहे
तर कुणी म्हणतो आम्हाला 
जनतेची साथ आहे


आम्ही त्यांना 'पाणी पाजू'
बसतो आमचा घसा आहे.

'भावां'नाही दाखवुन देवु
कारभार 'पारदर्शक' कसा आहे
     • रघुनाथ सोनटक्के
        ८८०५७९१९०५

बुधवार, २५ जानेवारी, २०१७

रईस

रईस

प्रमोशनसाठी करू रेल्वेत प्रवास 
भारी आमची अशी अक्कल आहे
कुणाच्या जिवाची ना पर्वा आता
एवढी भारी आमची शक्कल आहे



राज आमचे 'किंग'ही आम्ही
पैसा, प्रसिध्दीने आम्ही 'रईस' आहे
अॅक्टरांची 'खान' फक्त तिकडे
एवढं मिळवुनही किती हव्यास आहे

        • रघुनाथ सोनटक्के©
          8805791905
वात्रटिकांसाठी https://vatratika.blogspot.in येथे विजिट द्या

बुधवार, १८ जानेवारी, २०१७

समाजवादी

'सायकल'ही तुझी पुत्रा
तुझ्याचकडे सत्तेची गादी आहे

चाव्या आणि तिजोरीही तुझी

आम्ही कुठे 'समाजवादी' आहे ?



गुळाजवळ मुंगळे जमलेत
पुत्र बापावर वरचढ आहे

कोण खरा 'नेताजी' होता

अन् कळला कुणाचा गढ आहे



• रघुनाथ सोनटक्के

8805791905

सोमवार, १६ जानेवारी, २०१७

चरखा आणि खादी


Modi's Picture in KVIC Calender

फिरवतो आम्हीच चरखा
आम्हीच वापरतो खादी
राजमुद्रेवरही छापु प्रतिमा
लागु नये कुणी आता नादी


खोडून काढू त्यांची प्रतिमा
अन् देऊ तशी पोज आता
भक्त आहेत माझ्या पाठीशी
बदलू कोट मग रोज आता


• रघुनाथ सोनटक्के©
8805791905

सोमवार, १२ डिसेंबर, २०१६

नोटाबंदीचा फास



काळापैशासाठी नोटाबंदी 
सामान्यांच्या लांबच लाब रांगा
सापडायला लागल्या आता
नव्या नोटांच्याही बॅगा

देशासाठी सोसा म्हणे
आणखी काही दिवस त्रास
बडे मासे शाबुत आहेत
गरिबाच्याच गळ्याला फास

घेतलाय शंभरांचा जिव
कधी येणार ह्यांना चेव
आधी देशभक्तिचं नाव
अन आता कॅशलेसच भेव

रघुनाथ सोनटक्के
8805791905