सोमवार, ५ फेब्रुवारी, २०१८

मुद्दे

« मुद्दे »
Calligraphy-Raghunath Sontakke


मुद्द्यांना निवडणूकीआधी
वजन असतं भारी
तुडूंब वाहत असतात मग
आश्वासनांची खोरी
मुद्यांची चर्चा मग
वादात झडू लागते
राजकारण्यांच्या मुद्द्यांना
जनताही भाळू लागते

घोषणापत्रात मुद्दे घालून पक्ष
पुगळ्या कागदाच्या सोडू लागते
सत्तेत पोहचण्याचा हा 'अजेंडा' होता!
जनतेला नंतर कळू लागते

चांगले दिवस येतील यांची
नेहमीच जनतेला आशा असते
मतदानाच्या हक्कापुरती तेवढी
डोक्यात घुसली नशा असते

सत्तेपुढे शहाणपण चालत नाही
नेत्यांनाही पडतो मुद्यांचा विसर
खिसे भरून घेण्याशिवाय मग
सोडत नाहीत ते कसली कसर

कुणावर शिक्का मारावा
हाच खरा आता मुद्दा आहे
नाही म्हणुन सांगायचं तर
लोकशाही टिकवणं सुद्धा आहे
• रघुनाथ सोनटक्के

सोमवार, २९ जानेवारी, २०१८

स्वच्छता अभियान

« स्वच्छता अभियान »
Swach Bharat Abhiyan

कचरा, घाण, प्लॅस्टिकपासुन
स्वच्छ ठेवा आपला परिसर
आरोग्य, आनंदासाठी झटा
जसा लढतो सैनिक सिमेवर

घर ठेवतो आपण स्वच्छ
तसा परिसर ठेवायला पाहिजे
आरोग्य आणि आनंदासाठी
प्रत्येकाने भाग घ्यायला पाहिजे

गाडगेबाबा आणि गांधीजींनी
स्वच्छतेचा दिला मंत्र जगाला
सुरवात करावी स्वता:पासुन
सांगायची गरज नसावी कुणाला

स्वच्छतेच्या अभियानात सगळे
सामील होवुया तन आणि मनाने
सुंदर बनवुया आपलं 'तळेगाव'
सुरवात करू या स्वच्छ प्रणाने

• रघुनाथ सोनटक्के
    मो. 8805791905
    ब्लॉग:https://vatratika.blogspot.in
    ईबुक: https://goo.gl/aY6hVB


एकमुखाने देवूया सारे
सच्च्छतेचा नारा
साफ सुंदर करूया
परिसर हा सारा

गुरुवार, ११ जानेवारी, २०१८

पटसंख्येची शाळा

« पटसंख्येची शाळा »
    
  पटसंख्या पाहून शाळा बंद
  खरंच राज्य कायद्याचं आहे!
  नफा-तोटा बघून निर्णय घेणं
  'त्यांच्या'साठी फायद्याचं आहे

  पैशावालाच उघडेल शाळा
  गरिबांचा राहिला ना वाली
  'सर्वशिक्षा अभियान'ही आता
  झालं नशिबाच्याच हवाली

   • रघुनाथ सोनटक्के
    मो. 8805791905
ईबुक: https://goo.gl/aY6hVB

रविवार, ७ जानेवारी, २०१८

लालुंना जेल

« लालुंना जेल »
भ्रष्टांना जेलमधे घालण्याशिवाय
नाही कुठला 'चारा'
सौ चुहे खाके ते समाजात
मारत होते तोरा

खटले जर चालले तत्काऴ
आत होतील असे कित्येक लालु
जरब बसेल भ्रष्ट नेत्यांना
जर समाज लागेल वेळीच बोलू

सजग झाला पाहिजे समाज
वेळीच ओळखायला हवे कावे
उघडं पडेल पितळ त्यांचं
जरी केले ‍स्वच्छ असल्याचे दावे
    • रघुनाथ सोनटक्के
       मो. 8805791905
       ईबुक: https://goo.gl/aY6hVB
       ब्लॉग: https://vatratika.blogspot.in

शुक्रवार, ५ जानेवारी, २०१८

वाद

« वाद »

वादही जुने आहेत
दंगली काही नव्या नाहीत
जात, धर्म आम्हाला प्रिय
माणुसकीच्या बाता हव्या नाहीत

जातीधर्माच्या नावावर
राजकारणाची पोळी भाजली जाते
उच्चनिच, पैशाने 'माणसा'ची
उंची थोडी मोजली जाते?
• रघुनाथ सोनटक्के
   मो. 8805791905
ईबुक: https://goo.gl/aY6hVB

बुधवार, ६ डिसेंबर, २०१७

सर्वशिक्षा अभियान

« सर्वशिक्षा अभियान »


सर्वशिक्षा अभियान नावालाच फक्त
वेगळाच सरकारचा आचार आहे
खेड्यापाड्यातील शाळा बंद करण्याचा
किती चांगला विचार आहे!

सर्वांना शिक्षण कुठंय?
समानता, हक्काच्या बाता आहेत
पैशावाल्यांचंच शिक्षण झालं
सरकारी धोरणंही त्यांच्यामागं आता आहेत

• रघुनाथ सोनटक्के

शुक्रवार, २४ नोव्हेंबर, २०१७

निर्भया

« निर्भया »
Nirbhaya
अजून किती बळी पडाव्यात
बालकं, स्त्रिया अन् निर्भया
आहे गुन्हेगाराची एकच 'जात'
करू नये कसलीही दयामाया

फाशीच शिक्षा होऊ शकते
त्या विकृत नराधमांना
धाक, जरब बसेल मग
कथित अन् रानटी भावनांना

• रघुनाथ सोनटक्के
    8805791905
ईबुक: https://dl.orangedox.com/cs0YIg

हार्दिक स्वागत

« हार्दिक स्वागत »
आमच्या जातीला द्या आरक्षण
तरच तुमचं 'हार्दिक' स्वागत आहे
पक्ष, संघटनांचं फायदेशीर राजकारण
हरेक धंद्येवाईक म्हणुन वागत आहे

कुणी करेल विकासाची बात
बघू जनतेला कुणाचं 'पटेल'
कळेल कुणाचं खणखणीत नाणं
अन् कुणाचं भांडं फुटेल

• रघुनाथ सोनटक्के
   8805791905
ईबुक: https://dl.orangedox.com/cs0YIg

सोमवार, २० नोव्हेंबर, २०१७

खरपूस वात्रटीका : भाग १


माझं पहिलं ईबुक प्रकाशित झालं आहे,

डाउनलोड करून वाचा आणि अभिप्राय कळवा.
https://drive.google.com/open?id=17Pl-1nitFY5TsWv0HgfC5xzk3wh26YTg

https://drive.google.com/open?id=17Pl-1nitFY5TsWv0HgfC5xzk3wh26YTg

शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०१७

आपलं सरकार

« आपलं सरकार »
बाकी आहेत अजुन दोन वर्ष
आला जाहिरातबाजीला ऊत
करोडो रुपयांचं बजेट लावुन
बसवलं वेड्या विकासाचं भुत

दोनवर्षाआधीच निवडणुकीचे
ढग कसे बरसायला लागले
न केलेल्या कामाच्याही जाहिरातीत
जुने 'लाभार्थी' झळकायला लागले

प्रचाराचं पिक हंगामा आधीच
मस्त अन् जोमदार आहे
कळेलच थोड्या वर्षांनी
'आपलं सरकार' किती दमदार आहे
• रघुनाथ सोनटक्के
मो. 8805791905

गुरुवार, ९ नोव्हेंबर, २०१७

नोटबंदीची वर्षपूर्ती

नोटबंदीची वर्षपूर्ती
कधी देशभक्ती, कधी डिजीटल
तर कधी भ्रष्टाचारमुक्तीचं नाव
दिडशे लोकांनी जीव गमावुनही
विकासदर कुठं गेलाय राव?

कुणाची स्तुतीसुमनं
कुणी काळा दिवस पाळतो
भ्रष्ट, श्रीमंतचोर मात्र सेफ
शेवटी गरिबच पोळतो

रांगा लावुन, नोटा बदलून
काय साध्य झालं अंती?
भ्रष्टाचाराला आळा घालणं सोडा
अन् फसवी झाली नोटबंदी
• रघुनाथ सोनटक्के
मो. 8805791905

गुरुवार, २ नोव्हेंबर, २०१७

दरवाढ

« खरपुस वात्रटिका »
दरवाढ
दरवाढीने मारला 
सामान्याच्या कमाईवर डल्ला
'विकास' झाला वेडा
जनता करायला लागली कल्ला

गावातल्या 'उज्वला'साठी
दिली गॅसची टाकी
दरवाढीने आता आणले 
सार्‍यांच्या नऊ नाकी

कधी पेट्रोल-डिझेल
आता गॅसची दरवाढ
बंद झालंच कि जवळपास
मिळालेले अनुदान
• रघुनाथ सोनटक्के
8805791905






बुधवार, १ नोव्हेंबर, २०१७

फेरीवाले

« खरपुस वात्रटिका »
      फेरीवाले
कुणाला हवेत फेरीवाले
कुणाला नको त्यांचा जाच
कुणी बघतं 'मराठी' आहे का?
तर कुणी करतं उगाच वाद

केलं जरी 'राज'कारण
जनतेला सारं कळतं
सत्तेशिवाय कुठं कुणाला
शहाणपण 'असं' मिळतं?

जबाबदारी झटकुन मोकळे 
होतात सत्ताधार्‍यांचे हात
जो करेल प्रवाशांची सोय
त्याला मिळेल जनतेची साथ
• रघुनाथ सोनटक्के
   मो. 8805791905

शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०१७

बुलेट विकास

  « वात्रटिका »
बुलेट विकास

सरकार आमचे सुपरफास्ट
'बुलेट' ट्रेन आणायला लागले
साधे पुल, प्लॅटफार्म नाहीत
बघा किती 'विकास' करायला लागले

हकीकत वेगळीच आहे

स्वप्नांचे इमले बांधायला लागले
घरात नाही ज्वारीचं पिठ
पुरनपोळीचे आवतन यायला लागले

जमिनीवर पाय शाबुत ठेवा

तुम्ही तर हवेत उडायला लागले!
जनतेला सोडून वार्‍यावर
कुठे सरकारधर्म पाळायला लागले?

• रघुनाथ सोनटक्के 

  मोबा. 8805791905


वऱ्हाडी रूपांतर
बुलेट ईकास

सरकार आम्चं सुपरफास्टं
'बुलेट' टेरेन आनुन राह्यले
साधे पुल, प्लॅटफार्म नाहीत
तुमीच पा किती 'ईकास' करून राह्यले

हकीकत अलगच आहे

सपनाचे ईमले बांदुन राह्यले
घरात नाही जवारीचं पिटं
अन् पुरनपोया रांदुन राह्यले

जमिनीवर पाय शाबुत ठेवा
तुमी तं हवेत उळून राह्यले!
जनतेला सोळून वार्‍यावर
कुठे सरकार धर्म पाळुन राह्यले?

• रघुनाथ सोनटक्के 

  मोबा. 8805791905

  

मंगळवार, २६ सप्टेंबर, २०१७

महागाई

« खरपुस वात्रटिका »
महागाई
महागाईनं मुश्किल झालं
सर्वसामान्यांचं जीनं
जागतिकदर कमी तेलाचे
तरी जनतेच्या तोंडाला पानं

सरकार काढतंय हिस्सा
वाढताच आहे अधिभार
जनता मात्र खात आहे
तोंड दाबुन बुक्याचा मार

पैश्याने उतरतो कधी
चढतो रूपयाने तेलाचा भाव
कोणतंही सरकार बधत नाही
जरी केली कितीही कावकाव
• रघुनाथ सोनटक्के
  फोन: 8805791905
  ब्लाॅग: https://vatratika.blogspot.in

(१ जून २०१८ च्या 'दै. युवा छत्रपती' मधे प्रकाशित)
http://yuvachhatrapati.com/epaper/edition/279/june/page/2

१९ सप्टेंबर २०१८ च्या दै. पथदर्शी मध्ये प्रकाशित तसेच ५ जून २०१८ च्या दै. डहाणू मित्र मध्ये प्रकाशित 
४ जुलै २०२० दै. आदर्श महाराष्ट्र 
Vatratika, Raghunath Sontakke

मंगळवार, १९ सप्टेंबर, २०१७

निर्णय

« निर्णय »
बाहेर पडायचं कधी ?
मुहूर्त अजुन मिळाला नाही
सोबत तर आहोत सत्तेसाठी
युतीचाही 'अर्थ' कळाला नाही

आमदारांचीच कामं होत नाहीत
तिथं आम जनतेचं काय
मंत्रीपदं म्हणजे झाली फक्त 
सरकारी झुल हाय

निर्णय काय होत नाही
दोन वर्ष अजुन बाकी आहे
'वाघाचं' मन दोलायमान
'डरकाळी' नसुन 'झाकी' आहे

• रघुनाथ सोनटक्के 

  8805791905

बुधवार, ३० ऑगस्ट, २०१७

बाबांचा डेरा

« बाबांचा डेरा »
भक्तांच्या भोळ्या मनावर
बाबांचा बसला पक्का डेरा
माया, खुन, बलात्कार
आहे त्यांचा चेहरा खरा

भक्तांचे कवच धारण करून
चालु त्यांच्या रासलीला
कायद्यापुढे सारेच समान
कुणासाठी जाऊ नये वाकविला

तुकवु नका कुणापुढे
मग म्हणो कुणी स्वत:ला राम वा अल्ला
तुमचे शोषण चालूच राहील
मग करा तुम्ही कितीही कल्ला
• रघुनाथ सोनटक्के

  8805791905

मंगळवार, २९ ऑगस्ट, २०१७

सच्चा? 'डेरा'

« सच्चा डेरा? »
Calligraphy-Raghunath Sontakke

उघड झाल्याच शेवटी
शेकडो त्याच्या 'रासलीला'
तुरुंगवास कमीच पडतो
लटकवायला हवं फाशीला

करू नका आपल्या भावनांचा
कुण्या बाबापुढे 'सौदा' जरा
स्वत:ला अवतार म्हणवत नाही
कधीच संत 'सच्चा' वा खरा

भुलवुन तुमच्या बुध्दीला
टाकतात ते 'डेरा'
जगासमोर मात्र 'गुरमीत' असतात
भक्तांचा होतो खेळ सारा

• रघुनाथ सोनटक्के

  8805791905

शनिवार, १९ ऑगस्ट, २०१७

चायनामेड

« चायनामेड »
वारंवार देत आहे ड्रॅगन
युध्दाचे पुत्कार

आपणही झालो 'चायनामेड'
ठाम नाही सरकार

तोडून टाका चिन्यांची 'रसद'
'स्वदेशी'चा फक्त नारा नको

आचरणातही आणा आता
इकडून तिकडे गेला नुसता वारा नको

सैनिक भिडतील सिमेवर
आपण करू डेटा 'लिक'

'भाई-भाई' करणे चूक होती
कधी घेणार आपण 'सिख' ?
• रघुनाथ सोनटक्के
  8805791905

Vatratika, Raghunath Sontakke

मंगळवार, १५ ऑगस्ट, २०१७

राजीनामा

« राजीनामा »
Calligraphy - Raghunath Sontakke

विरोधकांची रेटून मागणी
आमचाही राजीनामा खिशात आहे
प्रमुखांची भक्कम पाठराखण
सत्तेचं अडकलं हाडूक घशात आहे


दबाव वाढला जरी 'त्यांच्या'वर
'प्रकाश' डोक्यात पडत नाही
स्वच्छ आमचा कारभार जरी
पारदर्शक असे काही घडत नाही


• रघुनाथ सोनटक्के©
   8805791906