बुधवार, २८ ऑक्टोबर, २०२०

दुषणे आणि सामना

दुषणे आणि सामना
तो बेडूकांचा बाप आहे
आणि त्याची दोन पिल्ले
वाघ मारतो छक्के-पंजे
आणि त्यांचे परतीचे हल्ले

कुणाचे खरे, कुणाचे खोटे
हिंदुत्व काय चिज आहे!
एवढे खरे कि सत्तेत जाण्याचा
तो दोघांचाही ब्रिज आहे

नका काढू एकमेंकाची लायकी
सन्मानाने दोघांनीही वागा
महाराष्ट्र हाच धर्म मानुन
विकास व्हावा समान धागा
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
मो. ८८०५७९१९०५

मंगळवार, २७ ऑक्टोबर, २०२०

कांद्याची महागाई

कांद्याची महागाई
कांदा महाग झाला म्हणे
थोडं त्याच्याही झोळीत पडू द्या
सदा तोच रडत असतो
जरा स्वत:लाही रडू द्या

कळून चुकेल त्यांचं दु:ख
थोडी सोसा महागाईची झळ
तुमचं तर थोड्या दिवसांचं
त्याची आहे नेहमीची कळ
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
   मो. ८८०५७९‍१९०५

बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२०

आश्वासनांची पुर्ती

 आश्वासनांची पुर्ती
राज्य आहे आर्थिकदृष्ट्या 
आपलं खुप आजारी
मदत करायची म्हणजे
आणखी कर्जबाजारी

त्यांनी मारलाय टोला
यांचा उलटा पलटवार
गरजूंना हवी आश्वासनपूर्ती 
नको आश्वासने भरमार

काही करून व्हायला हवी
आश्वासनांची पुर्ती
नका दाखवु बोट तुम्ही
उगीच एकमेकांवरती
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
 मो. ८८०५७९१९०५
Vatratika, Raghunath Sontakke


रविवार, १८ ऑक्टोबर, २०२०

पाहणी दौरा

पाहणी दौरा

पीकांचं झालं नुकसान
सुरू नेत्यांचा पाहणी दौरा
फेकून आश्वासनाचे बोल
दोन दिवस पायाला भवरा

दुष्काळी भागाची पाहणी
नेत्यांचा हल्ली ट्रेंड झाला आहे
खोट्या सहानुभूतीचे नाटक
कैमेरा त्यांचा फ्रेंड झाला आहे

हे तर सारं चालतच राहिल
सरकारकडूनही फलित हवे
सात्वंनाच्या नावे विरोधकांनी
समजू नये याला कोलीत नवे
रघुनाथ सोनटक्के, पुणे
  मो. ८८०५७९१९०५

 

Vatratika, Raghunath Sontakke

गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२०

लसीची प्रतिक्षा

लसीची प्रतिक्षा

वाट पाहून थकलेत सारे
येणार तरी कधी लस?
किती दिवस कोडून राहावं
झालं आता बाबा बस्स!

भय त्यांचं संपलं जणू
चिंता अजूनही जात नाही
आज येते उद्या येते म्हणत
लवकर ती काही येत नाही!
रघुनाथ सोनटक्के, पुणे
मो. ८८०५७९१९०५
Vatratika, Raghunath Sontakke


मंदिरची दारं

मंदीराची दारं

जवळपास सगळंच उघडलंय
माॅल, हाॅटेल आणि बार
कधी उघडणार आहे म्हणे
बंद देवाचे दार?

राजकारण करणार्‍यांच्या हातून
देवही आता सुटला नाही
भक्तीपायी पदाचा आदर ठेवणे
महत्वाचा त्यांना वाटला नाही
रघुनाथ सोनटक्के, पुणे
  मो. ८८०५७९१९०५
Vatratika, Raghunath Sontakke


रविवार, ११ ऑक्टोबर, २०२०

परतीचा पाऊस

परतीचा पाऊस
हाती आलेलं पीक
भीजलं डोळयादेखत
शेतकर्‍याच्या नशिबात
सदाच वाईट वखत

मधेच कुठे गायब होतो
वेळेवर चींब भीजवतो
दान देतानाही असा का
हाहाकार तो माजवतो
रघुनाथ सोनटक्के, पुणे
  मो. ८८०५७९१९०५

Vatratika, Raghunath Sontakke


बुधवार, ७ ऑक्टोबर, २०२०

मिडियाचा खेळ

मिडियाचा खेळ

बेताल वक्तव्य करून ती
होत आहे ड्रामा 'क्वीन'
नाचणारे राहतात तयार
मिडियाचा घेऊन बीन

बाजू घ्यायला वाचाळांची
पक्षही हळूहळू भीडतात
खरे प्रश्न सोडून मिडियावाले
लाईव्ह-ब्रेकिंग खेळतात

कुरघोड्यांचा चाललाय हा
जणू कुत्र्यामांजरांचा खेळ
मिडियालाही हवी असते
बातम्यांची चटपटीत भेळ
रघुनाथ सोनटक्के, पुणे
   मो. ८८०५७९१९०५

उलथापालथ

उलथापालथ
होणार आहे म्हणे राज्यात
काहीतरी उलथापालथ
आधीच परिस्थिती गंभीर
खराब होत चालली हालत

उडत असतात अधूनमधून
अशाच भुकंपाच्या चर्चा
माध्यमांचं ते खाद्य असते
अन् आपल्या वेळेचा खर्चा

कुणाची तिरकी चाल आहे
कुणाची आहे कुरघोडी
सुखासमाधानाने चालू द्या
रूळावर चाललेली गाडी
रघुनाथ सोनटक्के, पुणे
  मो. ८८०५७९१९०५

Vatratika, Raghunath Sontakke


शेतकर्‍यासाठी कायदा

शेतकर्‍यासाठी कायदा
सरकार म्हणते आणलाय
शेतकरी हिताचा कायदा
शेतकर्‍याचांच विरोध होतोय
कि भांडवलदारांचा फायदा!

सारं गेलं दिवाळखोरीत
सोडा देशाचा तरी कणा!
दुप्पट भावाचा वादा होता
हमीभावाचाही पत्ता कुणा?
रघुनाथ सोनटक्के, पुणे
  मो. ८८०५७९१९०५

Vatratika, Raghunath Sontakke

स्त्रियांचे दमन

स्त्रियांचे दमन 

दिल्ली असो कि मग
असो गाव, शहर हाथरस
होतात बलात्काराच्या बळी
अन् जीवाचीही कसरत

निष्पाप स्त्रियांचे दमन करून
सर्वस्व त्यांचे लुटत आहेत
अपराधी कायद्याच्या कचाट्यातून
बिनधास्तपणे सुटत आहेत

सरकारकडूनही न्यायात भेद
काय अशा प्रशासनाचा फायदा?
जात असतील जर असेच बळी
नक्कीच कमी पडतो कायदा
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
  मो. ८८०५७९१९०५

Vatratika, Raghunath Sontakke

मंगळवार, ६ ऑक्टोबर, २०२०

झाडांची कत्तल

झाडांची कत्तल

एकीकडे कोटींनी रोपन
आरेत रात्रीची कत्तल
झाडांवर चालवून कुर्‍हाड
विकासाची भारी शक्कल

पर्यायांची चाचपणी नाही
असल्या विचारांचा धोका आहे
रात्र वैर्‍याची ते खरंच
प्रसंग मोठा बाका आहे

जर असेच सुरू राहिले
वृक्ष कत्तलीचे सत्र
स्वत:च ओढून घेईल मग
माणुस काळरात्र
• रघुनाथ सोनटक्के

 

आश्वासनांचा बहार

आश्वासनांचा बहार 

कुणी देतो म्हणे थाळी
कुणी देतो म्हणे आहार
प्रचाराच्या नादात आलाय
आश्वासनांचा बहार

जनतेचा वाली असल्याचा
प्रत्येकाला मोठा आव असतो
मनमोहक जाहिरनाम्यांना
शेवटी रद्दीचाच भाव असतो
- रघुनाथ सोनटक्के, पुणे

 

प्रचाराची पातळी


प्रचाराची पातळी
कुणाच्या कोपरखळ्या
कुणाच्या नकला हातवारे
इथूनतिथून सारेच आहेत
पातळी सोडून बोलणारे

कुणाचा भरवसा असतो
आरोपांची कॅसेट घासून
हरप्रकारेच घेत असतात
ते आपलं नाणं घासून
रघुनाथ सोनटक्के