बुधवार, २६ ऑगस्ट, २०२०

संविधानाचे मोल

संविधानाचे मोल
दुष्टपणे अपमान करणारे
उगवले आहेत सरडे
समतावादी संविधानपेक्षा
जड कुणाचे पारडे?

मोसमी उपटसुंभ अधूनमधून
वांगी आपली सोलत असतो
कालबाह्य, शोषनमुल्यासोबत
संविधान मग तोलत असतो

उगवलेला दंभ विचार
वेळीच असा ठेचला पाहिजे
ज्यावर आपण उभे आहोत
तो तरी विचार वाचला पाहिजे
रघुनाथ सोनटक्के, पुणे
   मो. ८८०५७९१९०५

गुगलवर सर्च करा: kharpus vatratika

शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२०

चौकशीचा फेरा

चौकशीचा फेरा

राजकारणासाठीच फक्त
तपासाची दिशा ठरत आहे
जे विचारवंत मारले गेले त्याचा
तपास कोण, कुठे करत आहे?

कुणाची करायची गोची म्हणून
विशेष चौकशीचा हेका आहे
मनुष्यबळ आणि यंत्रणेचा
गैरवापर होणे हा धोका आहे

शेतकर्‍यांच्या आत्महत्यांची
ना कुणाला कुठे चिंता आहे
सरळ समस्या न सोडवणारा
राजकारण हा गुंता आहे
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
  मो. ८८०५७९१९०५
Vatratika, Raghunath Sontakke
 


बंडखोरी म्यान

बंडखोरी म्यान

सोडून गेले होते काहीजण
नाराजीने अशोकाचे वन
विमान परतले पायलटचे
पाहून सुकलेले कमळबन

बंडखोरीची तलवार शेवटी
करावी लागली त्यांना म्यान
शेवट काय होतो यासाठी होतं
याकडे सार्‍या देशाचं ध्यान

कितीही भक्कम असलं तरी
चाणक्य आमदार फोडू शकतात
सत्तेच्या हावेपायी राजकारणात
कोणतेही चमत्कार घडू शकतात
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
   मो. ८८०५७९१९०५



गुरुवार, १३ ऑगस्ट, २०२०

भाभीची पापड

भाभीजी पापड

करोनाला रोखायाला म्हणे
असरदार भाभीजी पापड
बेजबाबदारपणाला दिलीच
शेवटी कोरोनाने झापड

काहीही बोलावे बिनधास्त
पदाचेही थोडे भान नाही
मंत्री असो कि संत्री मग
कोरोनाचे भेदाला स्थान नाही
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
   मो. ८८०५७९१९०५