मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२०

स्वगृहाची आस

स्वगृहाची आस
सत्ता येईल म्हणून
घेतल्या होत्या उड्या
डाव फसला अन्
फसल्या सार्‍या खेळ्या

स्वगृहाची त्यांना आता
लागली आहे आस
दोन्हीकडून बसला आहे
पक्षनिष्ठेचा फास

• रघुनाथ सोनटक्के

शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२०

गरीबीवर झाकण

गरिबीवर झाकण
नेहमीच टाकल्या जाते
गरिबीवर झाकण
कधी होईल स्वप्न पुर्ण
कधी गरिबी हटण

हे काय अन् ते काय
सारेच कुठे खरे आहेत
माॅडेलच्या मार्कटिंगने फक्त
सत्तेचे डोकी तुरे आहेत

• रघुनाथ सोनटक्के

मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२०

मध्यावधी

मध्यावधी
अधूनमधून विरोधकांचा
मध्यावधीचा दावा आहे
आॅपरेशन राबवण्याचा तर
मनसुबा काय नवा आहे?

बोचणारं शल्य आहेच
हवेत बाण सोडत अाहेत
दंड थोपटणारे पैलवान
मैदान सोडून पळत अाहेत

• रघुनाथ सोनटक्के

सोमवार, १७ फेब्रुवारी, २०२०

वाद

किर्तन आणि वाद
बाबांचा तर कधी बुवांचा
चर्चा आणि वादविवाद असतो
मिडियाचा तेवढाच वेळ
बर्‍यापैकी बरबाद असतो

खरे किर्तन म्हणजे असते
चांगल्या विचारांची पेरणी
प्रबोधन तर कमी झाले
मंनोरंजनच झाले वरकरणी

• रघुनाथ सोनटक्के

शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२०

येरझार

येरझार
पद मिळणार नाही म्हणून
कुठे काहींची गळती आहे
काहींची हळू पावलाने
दुसरीकडे वळती आहे

मते बघून मोहऱ्यांना
पक्ष सारे जोडायला लागले
कुठे खिंडार पडले तर
कुणी गड फोडायला लागले

नेत्यांच्या येरझारा वाढल्या
जसे उंदीर पळू लागले
एकाच घरातील माणसे
भिन्न पक्ष कवटाळू लागेल
• रघुनाथ सोनटक्के

करवाढ

करवाढ
जनतेला विश्वासात न घेता 
करवाढ केली जाते 
गृहीत धरून मनमानीपणे 
दरवाढ केली जाते 

जनतेकडून पैसा असा 
बेमालूमपणे उकळू नये 
सुपात काय आहे हे न बघता 
भलतंच काही पाखडू नये 

सधन असतील काही 
मग काय कितीही भरू नये 
जनभावनेची वाट लावून 
मनमानी कारभार करू नये 
• रघुनाथ सोनटक्के

दलबदलूंचे थवे

दलबदलूंचे थवे
विरोधकांकडून सत्ताधार्‍यांकडे
दलबदलूंचे थवे आहेत
संख्याबळासाठी त्यांनाही
मोठे मासेच हवे आहेत

कार्यकता, विकासाच्या नावे
जो तो पळत असतो
तंबू खाली करत-करत
रोज एकजण गळत असतो

• रघुनाथ सोनटक्के

(दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २७९)

गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२०

आंदोलनाच्या स्मृती

आंदोलनाच्या स्मृती

दरवाढीविरोधाचा केला होता
त्यांनी तेव्हा विरोध
इतिहास उकलून दाखवला
घ्यायला थोडा बोध
 
सत्तेत असतांना पडतो
आंदोलनाचा विसर
काहीही दाखवलं तरी
होत नाही काही असर
 
सत्तेत आल्यावर होतो
दृष्टी आणि कामात बदल
शांत होऊन जाते आधीचं
तुफान आणि वादळ
रघुनाथ सोनटक्के
मो. ८८०५७९१९०५

डेजचं फॅड

डेजचं फॅड
डेज किती साजते करावेत
हरेकाची ती मर्जी आहे
प्रेम काय ठरवुन करायचे
सारेच आजकाल फर्जी आहे

साजरे करता करता
डेजची गर्दी झाली आहे
तरूणांसह म्हातार्‍यांचीही
टोळी दर्दी झाली आहे

• रघुनाथ सोनटक्के

(दै. युवा छत्रपतीत रोज प्रकाशित)
दिवाळी अंक: http://bit.ly/ShabdRasik-2019

बुधवार, १२ फेब्रुवारी, २०२०

विकासाला मत


विकासाला मत
विकासाला भरघोस मतं
विजयी आकडा आहे
भेदी राजकारणाचा झाला
साफ सुपडा आहे

जनता झाली सुजाण
जाती-धर्माला थारा नाही
विकास आणि विकासच
दुसरा कोणता नारा नाही

• रघुनाथ सोनटक्के

सोमवार, १० फेब्रुवारी, २०२०

मुद्दा

मुद्दा
       
कुणी इकडून आहे
तर कुणी तिकडून आहे
एकाने सोडलेला मुद्दा
दुसरा घट्ट पकडून आहे

एकाच मुद्द्यावर दोघांचा
जमकर अन् रेटून दावा आहे
सत्ता मिळवण्यासाठी दोघांनाही
तोच मुद्दा हवा आहे
• रघुनाथ सोनटक्के

पिडीत


पिडीत
थांबला अखेर आणखी एका
निर्भयाचा श्वास
वासना आणि सुडाने घेतला
आणखी एक घास

बळी पडत आहेत किती
बलात्कारीत आणि जळीत
असंख्य वाट पाहतायत
अशाच मायाबहिणी पिडीत

कठोर हवी शिक्षा म्हणजे
घडणार नाही पातक
फासावरच लटकावावेत
असे नराधम घातक

• रघुनाथ सोनटक्के
 
 

शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०२०

सत्य असत्य

सत्य असत्य
सत्य असत्याच्या युध्दाने
समाज पेटला आहे
राजकारणाने निचपणाचा
तळ गाठला आहे

धुक्यासारखं असत्याने
वातावरण घेरलं आहे
प्रकाशाने अजून कुठे
अंधाराला चिरलं आहे?

• रघुनाथ सोनटक्के

Vatratika, Raghunath Sontakke

थापेबाजी

थापेबाजी 
नेत्यांच्या भाषणांच्या
फक्त होऊ नयेत थापा
कारभार करणे म्हणजे
हा मार्ग नाही सोपा

हेही खरे कि सगळ्यांनाच
जमत नाही भाषणाची कला
फिरवु नये निराशेचा वरवंटा
हवा विचार जनतेचाही भला

• रघुनाथ सोनटक्के

गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०२०

ॲसिड हल्ला


ॲसिड हल्ला
ॲसिड फेकणे, जाळणे
देत नाही समाजाला शोभा
महिलांचा आदर करणे
हा आहे मानवतेचा गाभा

दुष्टांना होतो विखारीआनंद
साहते स्त्री दु:ख आणि पीडा
ठेचायला हवा कायद्याने
पुरूषी अहंकाराचा हा किडा

• रघुनाथ सोनटक्के

मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२०

भाषणबाजी

भाषणबाजी
नेत्यांना अवगत आहे
भाषणाची उत्तम कला
कथनीपेक्षा भारीच असते
करणीची नेहमी तुला

नुसत्या भाषणांच्या
होऊ नयेत फक्त थापा
कारभार करणे म्हणजे
हा मार्ग नाही सोपा

हेही खरे कि सगळ्यांनाच
जमत नाही भाषणाची कला
फिरवु नये सत्तेचा वरवंटा
हवा विचार जनतेचाही भला

खुशाल वळवळू द्यावा
नेत्यांनी भाषणाचा किडा
जनतेच्या विकासाचाही
विचार व्हायला हवा थोडा
• रघुनाथ सोनटक्के

बंद

बंद
कधी यांचा बंद आहे
कधी त्यांचा बंद आहे
आता वाटायला लागले
सार्‍यांनाच याचा छंद आहे!

तोडगा काढण्यासाठी
खरे तर चर्चेचा रस्ता
आहे
 हिंसाचारात गमावणार्‍यांचा
जीव काय एवढा सस्ता आहे?
• रघुनाथ सोनटक्के
 
(दै. युवा छत्रपतीत प्रकाशित)

व्हायरस

व्हायरस
वर्षातून एकदा माणसाला
नव्या व्हायरस पिळत आहे
शेकडो माणसांना विळख्याने
काही करून गिळत आहे

संशोधकांचा ताफा असूनही
माणसांना तो गिळत असतो
आधीच्यापेक्षा जास्त खतरनाक
नवा व्हायरस मिळत असतो

• रघुनाथ सोनटक्के