शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१९

आरेचं जंगल


आरेचं जंगल
विकासाच्या नावाखाली
संकटात आरेचं जंगल
फुफ्फुसावर कुर्‍हाड घालून
होईल का आपलं मंगल?
• रघुनाथ सोनटक्के

हवामानबदल

खरपूस • वात्रटिका

हवामानबदल
हिवाळ्यात पडतो पाऊस
थंडी, धुके आणि बादल
ऋतुंची ही सरमिसळ
कि आहे हवामानबदल?

झाडांची बेसुमार कत्तल
रसायनांचा अनाठायी वापर
जीवसृष्टी आली धोक्यात
दिसू लागला त्याचा असर

स्वार्थापायी आज माणुस
निसर्गाला भुलला आहे
जे पेरलं त्याच्याच पिकाने
मळा आता फुलला आहे

   • रघुनाथ सोनटक्के
 

मंगळवार, २४ डिसेंबर, २०१९

पराभवाचा धक्का

पराभवाचा धक्का

अंहकार वाढला कि
मिळतो पराभवाचा धक्का
आपोआपच खालावतो मग
लोकप्रियतेचा टक्का

जनतेच्या आकांक्षावर
द्यावा लागतो सदा भर
पायऊतार व्हावे लागते
नाही काम केले तर

केला जरी प्रचार नेटाने
लाऊन धरत नको तो मुद्दा
ओळखून आहे मतदार
कोण खरा अन् खोटा सुध्दा
• रघुनाथ सोनटक्के

सोमवार, २३ डिसेंबर, २०१९

विस्तार

विस्तार
वाटाघाटी बस्स झाल्या
विस्तार आता हवा आहे
सत्तेची वाटणी खरं तर
नव्या मित्रांची दवा आहे

किती दिवस चालवणार
चर्चेचं नुसतं गुर्‍हाळ
खाऊन झालाय ना आता
पहिल्या अधिवेशनाचा फराळ

रघुनाथ सोनटक्के

गुरुवार, १९ डिसेंबर, २०१९

आखाडा

आखाडा
संसद आणि विधिमंडळाचा
झाला आहे आखाडा
समाधान शोधायला बसले कि
करायला नवा बखेडा

पोरांची शाळा तरी शांत
यांचा असतो त्याहून दंगा
प्रश्न, विधायक चर्चा व्हावी
कि घ्यावा ऐकमेकांशी पंगा

जनतेच्या प्रश्नासाठी
भरवले पाहिजे दालन
कायदा जिथे बनतो तिथे तरी
किमान हवे शिस्तचे पालन
• रघुनाथ सोनटक्के

बुधवार, १८ डिसेंबर, २०१९

कायदा


कायदा
मातीतल्या माणसांना
मिळेना हवा तसा फायदा
कशाला हवाय लोकांना
असा कोणता कायदा?

बेरोजगारी, महागाईवर
टाकत आहात का झाकण
परक्यांचा कशाला ठेका
कोण करेल त्यांचं राखण?
• रघुनाथ सोनटक्के

शुक्रवार, १३ डिसेंबर, २०१९

बंड

बंड
पक्षासाठी झटलेला नेता
पूर्वीपासूनच झटत असतो
अन्याय झाला कि मग
बंड करून पेटत असतो

त्या एका नाथाची
थोडीच राहिली प्रीती आहे    
पंकजाच्या जाण्याचीही
अंतर्गत भीती आहे  
 
आता गेला 'एक'नाथ
संपली होती त्याची प्रीती
पाकळ्या गळून जाण्याची
सतावे कमळाला भीती
• रघुनाथ सोनटक्के
Vatratika, Raghunath Sontakke


मंगळवार, १० डिसेंबर, २०१९

कळलाव्या

कळलाव्या
सारे पक्ष फिरून झाला
भाव नाही चाराणे
कधीच सरकं बोलत नाही
सदानकदा गार्‍हाणे

आहेत आमच्या संपर्कात
नाकाने भेल्या फोडत असतो
कळलाव्या लावायला कुणी
तारेच नुसते तोडत असतो
• रघुनाथ सोनटक्के

दाव्यांना प्रतिक्षा

दाव्यांना प्रतिक्षा
आजही प्रतिक्षेत आहेत
लाखो बलात्काराचे दावे
कधी मिळेल न्याय त्यांना
अन् कधी निराकरण व्हावे

एकविसाव्या शतकात
महाशक्तीची पाहत आहोत स्वप्ने
आकडेवारी फुगली कि
वाढले आहेत उगीच हे गुन्हे

बर्‍याचवेळा दिली जाते
याला जाती-धर्माची झालर
राजकारणीही करत आहेत
त्याचा हवा तसा वापर
• रघुनाथ सोनटक्के

शनिवार, ७ डिसेंबर, २०१९

न्यायाची दिरंगाई

न्यायाची दिरंगाई
मोर्चे, मेणबत्त्या पेटवणे
व्यर्थ चर्चांचा खल
दिरंगाईच वाढवत आहे
गुन्हेगाराचे मनोबल

कायदा आणि न्यायालय
पडत आहे पांगळे आणि लुळे
कित्येक निष्पापांचे जीव
जात आहेत खरेतर याचमुळे

वर्षानुवर्षे गुन्हेगार मोकाट
म्हणजेच मिळत राहते माफी
धाक आणि जरब बसावी
मग धजावणार नाही पापी
• रघुनाथ सोनटक्के

शुक्रवार, ६ डिसेंबर, २०१९

कांदा

कांदा
पिकवला जरी कष्टाने
मातीमोल होऊन रडवतो
अधूनमधून सामान्याला
भलताच म्हणे अडवतो

नेहमीसाठी तर कांद्याचा
भाव नुसता पडत असतो
क्वचित वाढला कि
शहरी माणूस रडत असतो
रघुनाथ सोनटक्के

सोमवार, २ डिसेंबर, २०१९

दंडवसूली

  • दंडवसूली •

दामदुप्पटीने वाढले आहेत
वाहतूकनियमांचे चलन
बिमारीपेक्षा उपायानेच
होतेय चालकांची जलन

आशा करूया बेशिस्तीचे
कमी होऊ दे बळी
लाचखोरीच्या कुरणावर
कुणी भाजू नये पोळी

• रघुनाथ सोनटक्के

खैरात

आश्वासनांची खैरात
ज्यांची त्यांची चालली आहे
वाटणे आश्वासनांची खैरात
निवडणूकीचा हा मोसम
आला आहे खुपच भरात

आवाक्याबाहेर वादे करून
जनतेला फक्त भूरळ असते
समजदार जनतेचं मत मात्र
थेट आणि सरळ असते
रघुनाथ सोनटक्के

प्रचार भ्रमन

प्रचार भ्रमन

कुणी मागतो हिशेब
कुणी करतो दावा नवा
नको तेवढा जोर यांचा
अन् मतदाराकडे धावा

फक्त आम्हालाच निवडा
एवढेच त्याचे टूमणे आहे
एका ठिकाणाहून दुसरीकडे
भीक मागत घुमणे आहे

• रघुनाथ सोनटक्के

राजकिय कुस्ती

राजकिय कुस्ती

कुस्त्यांचा रंगलाय फड
पहेलवानांची झाली तालिम
कुणी करतो बोलबच्चन
तर कुणाची टिका जालिम

टिका, शेरेबाजी आणि आरोप
सभा सारेच गाजवत आहेत
आपणच कसे चांगले त्यांपेक्षा
ढोल स्वत:चा वाजवत आहेत

• रघुनाथ सोनटक्के