शनिवार, २९ जून, २०१९

सुवर्णमध्य


सुवर्णमध्य
राजकारण्यांनी केला आहे
जात आणि धर्माचा वापर
आपणच निवडून दिलं त्यांना
मग फोडावं कुणावर खापर

इर्षा, द्वेश, दूही पसरवुन
होत काय बरं साध्य
चर्चा, सुसंवादानेच निघेल
उपाय अन् सुवर्णमध्य
• रघुनाथ सोनटक्के
(२९ जून २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २२४)

Marathi Vatratika

शुक्रवार, २८ जून, २०१९

घोषणा आणि नारे

ख र पु स । वा त्र टि का •
 
घोषणा आणि नारे  
संसदेत तर कधी रस्त्यावर
होतात घोषणा आणि नारे
विषच पेरले जाईल मनात
काय साध्य होणार याने

सहिष्णुता आणि आदर
राहिलाच आहे कुठे?
भोगावे लागतील परिणाम
असल्या गोष्टींनी मोठे

सलोखा आणि शांती
राहावी समाजात टिकून
काय भेटेल सगळ्यांना
जर सदभावना टाकली विकून
• रघुनाथ सोनटक्के©

 (२८ जून २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २२३)
Marathi Vatratika

गुरुवार, २७ जून, २०१९

काळ्या पैशाची यादी


काळ्या पैशाची यादी
अखेर उघड झालीच
काळ्या पैशाची यादी
बडी धेंडं, उद्योगपती
नाही माणसं कुठेच साधी
• रघुनाथ सोनटक्के 

(२७ जून २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २२२)
Marathi Vatratika
 

बुधवार, २६ जून, २०१९

सायकल आणि हत्ती



सायकल आणि हत्ती
 पंक्चर झाली सायकल
मायावी हत्तीच्या भाराने
हत्ती म्हणे एकटा बरा
दणकून बसलेल्या माराने
 रघुनाथ सोनटक्के

(२५ जून २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २२१)
Marathi Vatratika
 

मंगळवार, २५ जून, २०१९

पदावर दावा

खरपूस • वात्रटिका
 
« पदावर दावा »
आपण दोघे भाऊ-भाऊ
दोघे मिळून-मिसळून खाऊ
आपलं ठरलयं तरीपण
समान करायचं बरं भाऊ

दोन्ही बाजूंनी दावा
सुप्त चालू रेटा आहे
दोघांनीही तयार ठेवलाय
सिएमचा पदाचा फेटा आहे
• रघुनाथ सोनटक्के
(२५ जून २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २२०)
Marathi Vatratika

 

सोमवार, २४ जून, २०१९

दुष्काळावर चर्चा

दुष्काळावर चर्चा

महाराष्ट्राला दुष्काळाची
नको तितकी झळ आहे
निवडलेल्या आमदारांचाच
चर्चेवेळी पळ आहे

दुष्काळी दौरा, यात्रेचा
उगीचच पुळका दाटतो
भेट देणारा प्रत्येकजणच
आता कुठे वेगळा वाटतो!
• रघुनाथ सोनटक्के
 
२४ जून २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २१९
Marathi Vatratika
 

शनिवार, २२ जून, २०१९

शब्दांची कोटी

शब्दांची कोटी
मागचे पेठे पंचावन्न
विधीमंडळात शाळा भरली आहे
माफक आणि सत्कारणी
चर्चा किती वेळा ठरली आहे!

उच्चाराचे नवे नियम
एकमेंकावर फक्त 'कोटी' आहे
वादविवादाच्या गदारोळात
चाललेली चर्चा ती वांझोटी आहे
• रघुनाथ सोनटक्के
 
२२ जून २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २१८
Marathi Vatratika
 

शुक्रवार, २१ जून, २०१९

आयाराम


आयाराम
निवडणूक पाहून लगेच
वारे वाहू लागले आहेत
आयाराम नव्या पक्षांचे 
गाणे गाऊ लागले आहेत 

नविन आले त्यांना
पदही मिळाले आहे
जुन्या-जाणत्यांना
निष्ठेबाबत कळाले आहे
• रघुनाथ सोनटक्के
 
२१ जून २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २१७
Marathi Vatratika
 

अर्थसंकल्प

« अर्थसंकल्प »

दरवर्षीप्रमाणे अर्थसंकल्पावर
बरी-वाईट चर्चा झडत असते
कुणाला ज्यादा, कुणाला कमी
बोलायची संधी मिळत असते

सार्‍यांना खुश करणे म्हणजे
तारेवरची खरी कसरत असते
'अर्थ'पुर्ण असला कितीही
विरोधक तरी बरसत असते

कुठे कर-आकार, कुठे सुट
विकासरुपी वायदा असतो
निवडणुक बघून खैरात करणे
सत्ताधीशांचा छूपा फायदा असतो

   • रघुनाथ सोनटक्के
   मो. 8805791905
ईबुक: https://goo.gl/aY6hVB
ब्लॉग: https://vatratika.blogspot.in

(२० जून २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २१६)
Marathi Vatratika
 

बुधवार, १९ जून, २०१९

विरोधी नेता


विरोधी नेता
आधीचा पळवला होता
आताही पळवला आहे
सत्ताधार्‍यांनी ताबा
'विरोधी'वरही मिळवला आहे
• रघुनाथ सोनटक्के 

१९ जून २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २१५
Marathi Vatratika

मंगळवार, १८ जून, २०१९

पावसा

खरपूस • वात्रटिका
 
पावसा
कोरड्या धरतीला आता
फक्त तुझाच धावा आहे

तहान भागवायला आमची
तुच आम्हाला हवा आहे
• रघुनाथ सोनटक्के
१८ जून २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २१४
Marathi Vatratika

राधाकृष्णाची प्रित


राधाकृष्णाची प्रित

'राधा' आणि 'कृष्णा'ची
तशी त्याची प्रित आहे
पद आणि सत्तेकडे धाव
अशीच त्यांची रित आहे

आज येथे आले
काल ते तिथे होते
सत्तेशी प्रित करणारे
हेच ते विखे होते

पालखी यांची वाहायला
कार्यकर्ता बरा खंदा आहे
इकडून-तिकडे उड्या घेणे
दलबदलूचा धंदा आहे
• रघुनाथ सोनटक्के

१७ जून २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २१३
Marathi Vatratika

शनिवार, १५ जून, २०१९

पावसा


पावसा
कोरड्या धरतीला आता
फक्त तुझाच धावा आहे
तहान भागवायला आमची
तुच आम्हाला हवा आहे

फुलवं आमची स्वप्नं
अंत आता पाहू नको
दिल्या वचनाला जागून
बरसायचं तू राहू नको
• रघुनाथ सोनटक्के

१५ जून २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २१२ 
Marathi Vatratika
 

शुक्रवार, १४ जून, २०१९

पदाची लालसा


पदाची लालसा
मैत्री जरी झाली दोघांची
पदाची मात्र लालसा आहे
मनातून जागांची लावणी
वरून फक्त जलसा आहे
• रघुनाथ सोनटक्के

१४ जून २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २१
Marathi Vatratika
 

गुरुवार, १३ जून, २०१९

पाण्याचे नियोजन


पाण्याचे नियोजन
दुष्काळ, असंतुलनात
माणसाचा खुप मोठा वाटा आहे
कुठे काही दिवसापुरता
पुरेल एवढा पाण्याचा साठा आहे

निष्काळजीपणाचा कळस करून
माणूस जीवाशी खेळत आहे
पाऊस पडला कि परत
नियोजन करणे टाळत आहे

• रघुनाथ सोनटक्के

१३ जून २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २१० 
Marathi Vatratika

शुक्रवार, ७ जून, २०१९

फ़ाटाफूट

खरपूस • वात्रटिका

« फ़ाटाफूट » 
 कुठे चालली धुसफूस
कुठे बैठकांचं सत्र आहे
कुणाचं झालं मनोमिलन
कुणाचं नाममात्र आहे

वंचित आहे जोमात
आय अजून कोमात आहे
मोहरे वळवायला सत्ताधारी
त्यांच्या खूप प्रेमात आहे

राष्ट्रवाद, मराठी, आरक्षणाचा
राज्यात दमके तडका आहे
दुष्काळाकडे मात्र दुर्लक्ष
शेतकऱ्याचा खोटा पुळका आहे
• रघुनाथ सोनटक्के (पुणे)
  मो. ८८०५७९१९०५
 
(७ मे २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २०५)
Marathi Vatratika

गुरुवार, ६ जून, २०१९

आऊटगोईंग

खरपूस • वात्रटिका

« आऊटगोईंग » 
काही आमच्या संपर्कात
असले हजारो दावे असतात
आऊटगोईंग चालू असतेच
येणारे सार्‍यांनाच हवे असतात

कुणी या वाटेवर आहे
तर कुणी त्या वाटेवर आहे
उरलेसुरले सोडून गेल्याने
आय मात्र खाटेवर आहे
• रघुनाथ सोनटक्के (पुणे)
  मो. ८८०५७९१९०५
 
(६ मे २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २०४)
Marathi Vatratika

बुधवार, ५ जून, २०१९

पाण्याची बचत

खरपूस • वात्रटिका

« पाण्याची बचत »
जमिनीखालचं संपलं आता
पावसाचं साठवलं पाहिजे
इतिहासातल्या दुष्काळाला
आतातरी आठवलं पाहिजे

वृक्ष लागवड, जल-संवर्धन
हाच त्यावर उपाय नामी आहे
आज केलेली पाण्याची बचत
पुढच्या पिढीच्या कामी आहे
• रघुनाथ सोनटक्के
 (५ मे २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २३)
५ जून २०१९ च्या दै. बंधुप्रेम, पथदर्शीला प्रकाशित
Marathi VatratikaMarathi VatratikaMarathi Vatratika

फुट

« फुट »

होतच राहतील प्रयत्न
पाडण्याचे समाजात फुट
समाजकंटक असो वा राजकारणी
मिळू नये कुणाला सुट

भडकावुन जातीधर्माला
भाजू नका स्वार्थाची पोळी
हिंदू आहे कि कुण्या जातीचा
बघत नाही बंदूकीची गोळी


• रघुनाथ सोनटक्के

मो. 8805791905
     ईबुक: https://goo.gl/aY6hVB
     ब्लॉग: https://vatratika.blogspot.in
 (४ मे २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २०२)
Kharpus Vatratika


सोमवार, ३ जून, २०१९

विलिनीकरण



« विलिनीकरण »

सन्मान‍ाठीच तर आम्ही
‌अस्तित्व आमचं जपलं आहे
स्वप्न पाहून पाहूनच
नेतृत्व आमचं थकलं अ‍ाहे

खलबतं, चर्चा, आखणी
त्यांचा आमचा साथ आहे
विलिनीकरण म्हणजे
नुसतं अफवांचीच बात आहे

• रघुनाथ सोनटक्के (पुणे)
  मो. ८८०५७९१९०५


 (३ मे २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २
)
Kharpus Vatratika

रविवार, २ जून, २०१९

आत्मविश्वास

• ख र पु स । वा त्र टि का •
« आत्मविश्वास »
Calligraphy by Raghunath Sontakke

अती आत्मविश्वासही कधी
चांगलाच नडून जातो
स्वत:च्या बालेकिल्यात
आपणच पडून जातो

स्वत:च्याच नादात राहून
आपलं असं हरण होतं
दोघांच्या युतीने घरातच
आपलं कसं मरण होतं

भारी पडतो आपण
जर एकीची बात असेल
होईल सार्‍यांच‍ाच विकास
जर सबका साथ असेल
    • रघुनाथ सोनटक्के©
    मो. 8805791905


ड‍ाऊनलोड ईबुक: https://goo.gl/aY6hVB
विजिट ब्लॉग: https://vatratika.blogspot.in
'रसिक'चा फेब्रुवारी अंक येथे वाचा: https://goo.gl/RuZBEU 
(३ मे २०१८ च्या कल्याण टाइम्स मध्ये प्रकाशित)
(१ जून २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २००)