शुक्रवार, २७ एप्रिल, २०१८

शब्द

ख • र • पू • स । वा • त्र • टि • का
Calligraphy by Raghunath Sontakke

« शब्द »
आधी दिलेला शब्द बघा
नंतर कुणी पाळत नाही
फिरवुन बोललेलं चलाखीने
आम्हाला काय कळत नाही!

विकास करू सगळ्यांचा
शब्द तुम्ही दिला होता
चांगलं आठवते आजही
ना काही भ्रम झाला होता

दिलेल्या शब्दाला न जागता
बोलणं आता टाळलं जातं
आश्वासनाचं गाजर नेहमी
साखरेत परत घोळलं जातं

• रघुनाथ सोनटक्के
   मो. 8805791905

   शब्दरसिकचा एप्रिल अंक: http://bit.ly/Rasik-Apr18

वात्रटिकासंग्रह: https://goo.gl/7CcLUw

दिवाळी अंक २०१७: https://goo.gl/RxRw8g

२६ ऑक्टोबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २६)
(दि ५ मे २०१८ च्या दै. 'युवा छत्रपती' या लातूरच्या दैनिकात प्रकाशित )

Vatratika
http://yuvachhatrapati.com/epaper/edition/251/may/page/4
http://yuvachhatrapati.com/epaper/edition/254/may/page/5

गुरुवार, २६ एप्रिल, २०१८

बाबा-बापूचा फास

« बाबा-बापूचा फास »
Calligraphy by Raghunath Sontakke


भक्तांच्या भोळ्या मनावर
बाबांचा बसला पक्का डेरा
मायाजाल, खुन, बलात्कार
आहे त्यांचा चेहरा खरा

मुखातच फक्त 'राम' असतो
मन‍‍ात असते भोगाची 'आस'
भोळ्या भक्तांचा होतो वापर
टाकतो मग 'बापू' गळी फास

भुलवुन तुमच्या बुध्दीला
टाकतात ते 'डेरा'
जगासमोर मात्र 'गुर्मीत' असतात
भक्तांचा होतो खेळ सारा

करू नका आपल्या भावनांचा
कुण्या बाबापुढे 'सौदा' जरा
स्वत:ला अवतार म्हणवत नाही
कधीच संत 'सच्चा' वा खरा

भक्तांचे कवच धारण करून
चालु त्यांच्या होतात रासलीला
कायद्यापुढे सारेच समान
कुणासाठी जाऊ नये तो वाकवीला

तुकवू नका कुणापुढे मान
म्हणो कुणी स्वत:ला राम वा अल्ला
नाहीतर शोषण होतच राहील
मग करा तुम्ही कितीही कल्ला

• रघुनाथ सोनटक्के
  8805791905


(दि  एप्रिल २०१८ च्या दै. 'युवा छत्रपती' या लातूरच्या दैनिकात प्रकाशित )

(दि १३ मे २०१८ च्या दै.  विदर्भ मतदार मध्ये प्रकाशित)

शनिवार, १४ एप्रिल, २०१८

हल्लाबोल

« हल्लाबोल »
Calligraphy by Raghunath Sontakke

त्यांचा 'हल्ला' परतवण्यासाठी
खडे 'बोल' सुनावले जातात
सत्ताकारणाच्या पटावर
चांगली माणसंही हिणवली जातात

सत्तेत नसतांना जनतेचा
कैवार घेतल्या जातो
फसव्या आश्वासनांचा पाढा
पुरेपूर वदल्या जातो


• रघुनाथ सोनटक्के
   फोन: 8805791905
   शब्दरसिकचा मार्च अंक: https://goo.gl/NnhtL4
वात्रटिकासंग्रह: https://goo.gl/7CcLUw
दिवाळी अंक २०१७: https://goo.gl/RxRw8g

बुधवार, ११ एप्रिल, २०१८

गुंडगिरीची लागण

ख • र • पू • स । वा • त्र • टि • का
« गुंडगिरीची लागण »
   
Calligraphy by Raghunath Sontakke

गुंड, अपक्षांच्या भरतीची 
मागणी मोठी जोरात होते
प्रत्येक पक्षात आयारामांची
एंट्री भारी तोर्‍यात होते

सच्च्या कार्यकर्त्याच्या डोक्यावर
झुंडशाहीची 'गोळी' असते
पक्ष वाढविण्याच्या नादात
श्रेष्ठींची 'दम'दार खेळी असते

निवडणूकीच्या तोंडावर गुंडाना
पक्षांकडून नेहमीच मागणी असते
सच्चा कार्यकर्त्याच्या जखमेवर
मिठाची ही कडक डागणी असते

पांढर्‍या कपड्याखाली
काळी कृत्ये झाकली जातात
कार्यकर्त्यांच्या नावाखाली
टोळकी मस्त राखली जातात

पक्षाकडून होणारी ही आयात
मतदारांनाही कळाली पाहिजे
दाताखाली चिभ चावल्याची फिलिंग 
श्रेष्ठीनांही मिळाली पाहिजे

• रघुनाथ सोनटक्के
   फोन: 8805791905
   शब्दरसिकचा मार्च अंक: https://goo.gl/NnhtL4
वात्रटिकासंग्रह: https://goo.gl/7CcLUw
दिवाळी अंक २०१७: https://goo.gl/RxRw8g

(दि ६ मे  २०१८ च्या दै. 'युवा छत्रपती' या लातूरच्या दैनिकात प्रकाशित)

शुक्रवार, ६ एप्रिल, २०१८

खरा न्याय?

• ख र पु स । वा त्र टि का •

« खरा न्याय? »

Calligraphy by Raghunath Sontakke

उशिरा का होईना इथे 
खरा न्याय मिळतो आहे
वर्षानुवर्षे मोकाट राहून आरोपी
कायदा मस्त 'पाळतो' आहे!

कुणाला मदमस्तीचा जोर
दुर्बल मात्र त्याचा शिकार आहे
संथगतीने न्याय म्हणजे अन्यायच
व्यवस्थेला जडला विकार आहे

खुन्याने करावे दान लाखाचे
सुट मागण्याची चांगली साद आहे
प्रसिद्धी अन् वजन वापरणे
हि तर अंगावर लागलेली दाद आहे

• रघुनाथ सोनटक्के©

  मो. 8805791905

शब्दरसिकचा मार्च अंक: https://goo.gl/NnhtL4

रघुनाथ सोनटक्के यांचा वात्रटिकासंग्रह:

https://goo.gl/7CcLUw

दिवाळी अंक २०१७:
https://goo.gl/RxRw8g

(कविता आवडल्यास नावासह शेअर करा.)

(दि  मे २०१८ च्या दै. 'युवा छत्रपती' या लातूरच्या दैनिकात प्रकाशित )
Yuva Chhatrapati-Poems by Raghunath Sontakke

मंगळवार, ३ एप्रिल, २०१८

पेट्रोल-डिझेलची दरवाढ

• ख र पु स । वा त्र टि का •
« दरवाढ »


Calligraphy by Raghunath Sontakke

पेट्रोल-डिझेल वाढलं की
नेहमीच भार ठरत असतो
सरकार अन् माफिया मात्र
आपला गल्ला भरत असतो

दर वाढला कि लगेच
बाकींचाही भाव चढत असतो
थोड्याश‍ा पैश्यांच्या वाढीने
खुप फरक पडत असतो

गरिबांच्या डोक्यावर नेहमीच
दरवाढीचा भार असतो
पैशावाल्यांना काही फरक नाही
मात्र सामान्य गारेगार असतो

उतरतो पैश्याने, चढतो रूपयाने
कसा तर्क ल‍ावल्या जातो
करवाढीच्या हातोड्याखाली
गरिबच बरा मारल्या जातो



• रघुनाथ सोनटक्के©
  मो. 8805791905


शब्दरसिकचा मार्च अंक: https://goo.gl/NnhtL4
रघुनाथ सोनटक्के यांचा वात्रटिकासंग्रह:https://goo.gl/7CcLUw
दिवाळी अंक २०१७:https://goo.gl/RxRw8g

(कविता आवडल्यास नावासह शेअर करा.)

 ऑक्टोबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. )


Vatratika

(२३ मे. २५ मे. २०१८ च्या 'दै. युवा छत्रपती' मधे प्रकाशित)
http://yuvachhatrapati.com/epaper/edition/272/may/page/4