बुधवार, ३१ मे, २०१७

शेतकर्‍याचा संप

« खरपुस वात्रटिका »

            शेतकर्‍याचा संप

          इतिहासात पहिल्यांदाच होतोय
शेतकर्‍याचा संप
सरकार, सामान्यांना आता
भरेल धरणीकंप

कुणीच एेकत नाही त्याचं
करा सातबारा कोरा
मालाला ना भाव, ना हमी
कधी होईल हा रोग बरा

मिळु दे धडा सरकारला
कळु दे जनतेला त्याच्या व्यथा
त्याच्याविणा जगणं कसं कठिण
लागेल आता सार्‍यांनाच पता
       • रघुनाथ सोनटक्के
भेट द्या : https://vatratika.blogspot.in

गुरुवार, २५ मे, २०१७

आशिर्वाद

« वात्रटिका »
आशिर्वाद

कुणाचं येईल विमान खाली
खरंच कुणाचा नेम नाही
आजचा दिवस चांगला
उद्याचा काही सेम नाही


आज हेलीकाॅप्टर पडलं
उद्या सरकार पडंल
कुणाच्याही आशिर्वादावर
उद्या काहीही घडंल!


शेतकर्‍यानं खुप पिकवलं
मात्र त्याला विकता नाही आलं
आशिर्वादावर कसं जगतात
हे त्याला शिकता नाही आलं
• रघुनाथ सोनटक्के
विजीट करा: https://vatratika.blogspot.in

गुरुवार, १८ मे, २०१७

सत्यपालन

« वात्रटिका »

'सत्यपाल'न
नसेल पचलं 'सत्य' कि
होतात असे भ्याड हल्ले
जिकडे तिकडे 'पाल'नकर्त्याचा
आवाज दाबणे चालले


प्रबोधनकार, विचारवंताना
राहिला ना कुणी वाली
पोलिस, सिबीआय काय
करतात कुठं रखवाली ?


कोण उचलुन धरणार
आता सत्याची बाजु
पानसरे, दाभोळकराचे मारेकरी 
लागले आहेत माजु
• रघुनाथ सोनटक्के
  8805791905

शनिवार, ६ मे, २०१७

निर्भयाचा लढा

« वात्रटिका »
निर्भयाचा लढा

निर्भयाची हत्या-बलात्कार
निर्दयी, पाशवी गुन्हा होता
शेवटपर्यंत लढली म्हणुन
देश तुझ्या पाठी उभा होता


तु दिलास लढा म्हणुन
गाजली तुझी दिल्ली
आजही असे नराधम
फिरताहेत गल्लोगल्ली


त्यांना दिल्यावर फाशी
न्याय मिळाला समजु नये
सजग राहु दे जनतेला
चेतलेली वात पुन्हा विझु नये
• रघुनाथ सोनटक्के
  8805791905