गुरुवार, ३१ डिसेंबर, २०२०

ईडी

खरपूस • वात्रटिका
 
ईडी
सुडबुद्धी हाही सत्तेचा
महत्वाचा एक घटक आहे
विरोधकांच्या मोहऱ्यांची तिने
कायदेशीर अटक आहे

अडचणीत आणायला
साम-दाम, दंड-भेद आणि 
आता ईडी आहे
सत्ता राखण्या किंवा मिळवण्याची
हिच सोपी शिडी आहे!
रघुनाथ सोनटक्के

(२४ ऑगस्ट २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २)
Vatratika, Raghunath Sontakke, Marathi Vatratika



गुरुवार, २४ डिसेंबर, २०२०

ग्रामपंचायत निवडणूक

 ग्रामपंचायत निवडणूक

ग्रामपंचायतीच्या निवडणूकीने
ढवळून निघालंय गाव
नात्यात पडतायत गट-तट
अन् पैशाला येईल भाव

कालपर्यंत नांदत होते
आता विरोधी आदळआपट
काही दिवस हे सुरू राहिल
वर्चस्वाचं व्यर्थ खुपट

• रघुनाथ सोनटक्के, पुणे
 मो. ८८०५७९१९०५

बुधवार, २३ डिसेंबर, २०२०

कोरोनाचं नवं रूप

कोरोनाचं नवं रूप
पुन्हा उघड झालंय
कोरोनाचं नवं रूप
आधी होरपळोय सारे
लाॅकडाऊनमधे खुप

कठिण गेलं होतं २०२०
जावं चांगल नववर्ष सुखाचं
घालू नका पुन्हा भेव
त्या कोरोनाच्या रुपाचं
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
मो. ८८०५७९१९०५

सोमवार, २१ डिसेंबर, २०२०

हक्काची लढाई

हक्काची लढाई
कृषी आंदोलनात बळींची
रोज येत आहे नवी खबर
शांततेत चाललेल्या संघर्षाची
मोजावी लागेल किंमत जबर


हक्क अन्  हट्टाची दिल्लीत
पेटली आहे ही लढाई
दात्याकडे दुर्लक्ष करून
सरकार मारतंय बढाई
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
मो. ८८०५७९१९०५

Vatratika, Raghunath Sontakke, Marathi Vatratika


रविवार, २० डिसेंबर, २०२०

अन्नदाता कि देशद्रोही?

अन्नदाता कि देशद्रोही?
देशाला कळून चकुलेय
खरंच कोण दलाल आहेत
अन्नदात्याला देशद्रोही ठरवणारे
भक्त खरंच कमाल आहेत!


शेतकर्‍यांची हयात जाते
संकटांना कितीतरी पेलत!
सार्‍यांचा मुकाबला करून
ऊन, वारा, थंडी झेलत
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
  मो. ८८०५७९१९०५

Vatratika, Raghunath Sontakke, Marathi Vatratika


शुक्रवार, १८ डिसेंबर, २०२०

सरकारचा हेका

सरकारचा हेका
शेतकर्‍यांच्या आंदोलनास
मिळत आहे देशाचा कल
रस्त्यावर उतरलाय तो
सोडून हातचं हल

जाणून घ्यावं त्याचं मन
नको नुसता कायद्याचा रेटा
सर्वच स्तरातून विरोध
सोडावा सरकारनेही हेका
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
  मो. ८८०५७९१९०५

मंगळवार, ८ डिसेंबर, २०२०

कृषी कायदा आंदोलन

कृषी कायदा आंदोलन

शेतकर्‍याचं नुकसान करतो
केंद्राचा नवा कृषी कायदा
पिकवणारा लुबाडला जातो
होतोय मोठ्यांचाच फायदा

किमान किंमतीचा आधार
आहे फक्त आश्वासन तोंडी
गब्बर होतील दलाल त्याने
अन् व्यावसायिकांच्या झुंडी

आंदोलन असेच चालूच ठेवू
मागे आता हटणार नाही
अहंकारावर करून प्रहार
निर्धार मधेच तुटणार नाही
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
मो. ८८०५७९१९०५
Vatratika, Raghunath Sontakke, Marathi Vatratika


शेतकर्‍याला समर्थन

शेतकर्‍याला समर्थन
फक्त स्वत:साठीच नाही
जगासाठी पिकवतो दाणा
म्हणूनच तो जगाचा पोशिंदा
आभार सर्वांनी त्याचे माना

जागत असाल तर अन्नाला
समर्थन त्याला द्यायला हवे
राजकारण, पक्षनिरपेक्षपणे
सहभागी बंदमधे व्हायला हवे
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
मो. ८८०५७९१९०५


सोमवार, ७ डिसेंबर, २०२०

साखरेचं मध

साखरेचं मध

व्यावसायिक फायद्यासाठी
दिली देशभक्तीची झालर
अस्सलतेच्या नावाखाली
चाखवली मध म्हणून साखर

आयुर्वेदिकचे नाव सांगुन
बरंच काही विकल्या जाते
आकर्षित करण्यास ग्राहकाला
फसवं लेबल लावल्या जाते

सगळंच पिवळं सोनं नाही
ना सगळेच खरेखुरे बाबा
विश्वास ठेवण्या अगोदर
सत्यताही पडताळून बघा
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
 मो. ८८०५७९१९०५

शनिवार, ५ डिसेंबर, २०२०

तिघांचं बळ

तिघांचं बळ

पदवीधर आणि शिक्षक
जिंकुन चार मतदारसंघ
तिघांच्या एकत्र बळाने
कमळाचे उडून गेले रंग

तिनचाकी गाडीचे सरकार
उडवली वेळोवेळी खिल्ली
अशीच जर ठेवली एकी
जिंकू शकतील ते दिल्ली
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
मो. ८८०५७९१९०५
Vatratika, Raghunath Sontakke, Marathi Vatratika



शुक्रवार, ४ डिसेंबर, २०२०

कोरोनाची लस

कोरोनाची लस
वाढत आहे नव्याने पुन्हा
कोरोना संसर्गाचा दर
हवं जबाबदारीचं भान
आणि प्रतिबंधावर भर


लसीची आहे प्रतिक्षा
आणि आहे प्रत्येकाचा डोळा
सगळ्यांनाच मिळावी ती
असो श्रीमंत, गरीब वा भोळा

• रघुनाथ सोनटक्के, पुणे
  मो. ८८०५७९१९०५

Vatratika, Raghunath Sontakke, Marathi Vatratika


मंगळवार, १ डिसेंबर, २०२०

अन्नदात्याची दखल

अन्नदात्याची दखल
ज्याच्यापायी मिळते खायला
अन्न आणि भाकर
दात्याकडे एवढे दुर्लक्ष 
अन् राजकारणासाठी वापर

त्याची घ्यावीच दखल
तोच तर आहे आधार
त्याच्यामुळेच चालतोय
हे जग आणि व्यापार

जगासाठी पिकवतो तो
त्याचे ऐकून घ्या मागणे
सत्तेच्या नशेत बरे नाही
एवढे अहकांरी वागणे
रघुनाथ सोनटक्के, पुणे
  मो. ८८०५७९१९०५
Vatratika, Raghunath Sontakke