शनिवार, २६ सप्टेंबर, २०२०

कोरोनाचा धोका

कोरोनाचा धोका

खुपच वाढला आहे हा
कोरोनाचा भयंकर धोका
मास्क आणि नियम पाळूनच
सगळ्यांनी याला रोखा

काहीजण हलक्यात घेऊन
जबाबदारी टाळत आहेत
समजदार लोक मात्र नियम
काटोकोर पाळत आहेत

कमी पडताहेत बेड
कुठे औषधांचा काळाबाजार
सगळ्यांनी लढायचेय
हटवायचा आहे हा आजार
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
  मो. ८८०५७९१९०५
Vatratika, Raghunath Sontakke


मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२०

नट-नट्यांचा वापर

नट-नट्यांचा वापर

जुने आहेत राजकारणाशी
नट आणि नट्यांचे नाते
फायद्यासाठी होतो वापर
प्रसिद्धीसाठी मिरवले जाते

जनतेच्या सुख-दु:खांची
नसते त्यांस काडीमात्र जाण
प्रसिद्धीच्या झोतातच ते
राहतात सदा रममाण

हवा तयार करण्यापलीकडे
कुठेच ते फिरकत नाहीत
यापेक्षा आहेत बहूरूपी बरे
हे तर त्यांपेक्षाही सराईत
•  रघुनाथ सोनटक्के, पुणे
   मो. ८८०५७९१९०५
Vatratika, Raghunath Sontakke


सोमवार, १४ सप्टेंबर, २०२०

महापुरूषांशी तुलना

महापुरूषांशी तुलना

उत्साही कार्यकर्ते लागलेत

तुलना महापुरूषाशी करू

कुठे ते पराक्रमी राजे अन्

कुठे हे भंपक विकासगुरू


अतीउत्साहाच्या भरामधे

अशी बरोबरी ते साधत असतात

लीन झालेले भक्त मंदपणे

बेतालासारखे वागत असतात


व्यक्तीचा उदो-उदो करणे

बाकी त्यांना कशाची तमा नाही

असल्या अंधपणाच्या खुळाला

जनतेच्या मनामधे क्षमा नाही

• रघुनाथ सोनटक्के, पुणे

  मो. ८८०५७९१९०५

Vatratika, Raghunath Sontakke