शुक्रवार, ३१ जुलै, २०२०

मेरिट पास

मेरिट पास
मेरीटचे मार्क आजकाल
कुणीही घेऊ लागला
चालणाच्या काळात जणू
सुसाट धावू लागला

शैक्षणिकदृष्ट्या चांगलेच
सारेच एकमेंकाच्या पुढे आहेत
प्रत्यक्ष व्यवहारात पाहीले तर
टिकणारे फारच थोडे आहेत

मुल्य, संस्कार, नैतिकतेचा
नव्या पिढीत र्‍हास आहे
अाज लेखीपरिक्षतेच फक्त
विद्यार्थी मेरिट पास आहे
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
  मो. ८८०५७९१९०५

Raghunath Sontakke

शनिवार, २५ जुलै, २०२०

प्लाज्मा दान

प्लाज्मा दान
कोरोनाचा रोखण्यासाठी
पुढे यायला हवेत दाते
प्लाज्मा थेरपीने रोग्याला
वाचवणे शक्य आता होते

वाढत जाणार्‍या संकटात
माणुसकी जगायला ठेवा
एकमेकांच्या साथीनेच
हा राक्षस रोखायला हवा
•  रघुनाथ सोनटक्के, पुणे
   मो. ८८०५७९१९०५
 
Vatratika, Raghunath Sontakke

शुक्रवार, २४ जुलै, २०२०

तीन चाकी गाडी

तीन चाकी गाडी
बाणाच्या सोबतीने
काकाने बसवली 'घडी'
कमळी मात्र म्हणते
ही तर तीन चाकी गाडी !

नको म्हणून 'आय'नेही
हात दिला होता
तेव्हाच कुठे भरलाय
धनुष्याचा भाता

कुरबुरी नाही करता
कायम ही ठेवा गोडी
नाहीतर लोकंच म्हणतील
ही आहे ढकलगाडी !
• रघुनाथ सोनटक्के
 

बुधवार, २२ जुलै, २०२०

भावना कि विकास?

भावना कि विकास?
कुणाला हवाय विकास
कुणाला प्रसिद्धीची हाव
जनतेनेच आता ठरवावे
कुठे न्यावी देशाची नाव

धर्म-जातीच्या डोलार्‍यावर
नकली नेत्यांचा ठेला आहे
भावना मात्र वरचढ ठरतेय
विकास कधीचाच मेला आहे
रघुनाथ सोनटक्के, पुणे
    मो. ८८०५७९१९०५

सोमवार, २० जुलै, २०२०

कोरोना योध्दा

कोरोना योध्दा
सलाम अनमोल कामाला
ते खरे कोरोना योध्दा
त्यांना सहकार्य करणे 
हे कर्तव्य आपले सुध्दा

डाॅक्टर, परिचारिका, पोलीस
अहोरात्र काम करत आहेत
अशा कठिण काळात ते
जणू देवदुतच ठरत आहेत
रघुनाथ सोनटक्के, पुणे
  मो. ८८०५७९१९०५
Vatratika, Raghunath Sontakke
 

गुरुवार, १६ जुलै, २०२०

घरातच सारं काही

घरातच सारं काही
परिक्षा, उत्सव, कार्यक्रम
सार्‍यांवरच दाट सावट आहे
घरात हवी तेवढी प्रायव्हसी
कोरोना कसा चावट आहे!

कुटुंबाचं हवं तेवढं सुख
आताच सर्वानी भोगुन घ्या
बाहेर कशाचा शोध न घेता
घरातच गोड आता मानुन घ्या
रघुनाथ सोनटक्के, पुणे
  मो. ८८०५७९१९०५

बुधवार, १५ जुलै, २०२०

साखळी

साखळी
काही करून तोडावीच लागेल
कोरोनाची ही साखळी
जबाबदारपणाचा आहे कळस
अन् उपाययोजनाही तोकडी

जीवावर उदार होऊन
कुणी मोकाट ‍फिरत आहे
साखळीच्या वाढीसाठी तो
खुपच पुरक ठरत आहे

लस येईपर्यंत तरी
ही साखळी तोडावी लागेल
अर्थचक्र चालू ठेवून
मुक्तसंचार सोडावा लागेल
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
 मो. ८८०५७९१९०५

Vatratika, Raghunath Sontakke

मंगळवार, १४ जुलै, २०२०

रंजित पत्रकारिता

रंजित पत्रकारिता
अख्खा देश संकटात आहे
न्युजवाल्यांना सेलेब्रिटी हवा
बिकाऊ, रंजक पत्रकारितेवर
मिळाली नाही अजुन दवा

सामान्यांच्या दु:ख, समस्यांचं
त्यांना काही सोयरसुतक नाही
पत्रकारितेचा भंपक वापर करणं
यासारखं मोठं पातक नाही
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
  मो. ८८०५७९१९०५
Vatratika, Raghunath Sontakke

सोमवार, १३ जुलै, २०२०

आत्महत्येचा विचार

आत्महत्येचा विचार
एकटेपणा आणि नैराश्याने
येतो आत्महत्येचा विचार
सोडून द्या नकारात्मकता
हाच आहे त्यावर उपचार

दिलखुलासपणे जगल्याने
गुंता मनाचा सुटत असतो
नाहीतर आपणच आपल्याल्या
दुश्मनासारखे वाटत असतो

बोला मनमोकळेपणाने
असो मित्र, जवळचा सखा
दु:ख, नैराश्य, अडचण सुटेल
टळेल मग पुढचा धोका
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
  मो. ८८०५७९१९०५

Vatratika, Raghunath Sontakke

शुक्रवार, १० जुलै, २०२०

साल २०२०

साल २०२०
दोन हजार विस साल
सुरवातीलाच गाजलं आहे
कोरोनाचं थैमान बघा
सार्‍या जगात माजलं आहे

सारंच कसं अवघड झालं
सगळ्याचीच कोंडी आहे
अख्खी मानवजातच आता
महामारीच्या तोंडी आहे!
रघुनाथ सोनटक्के, पुणे
  मो. ८८०५७९१९०५
 

गुरुवार, ९ जुलै, २०२०

कोरोनाचा वेग

कोरोनाचा वेग
आकड्याची बेरीज बघता
तो खुपच सुसाट सुटला आहे
बाधितांच्या आकड्यांच्यामानाने
मृत्यूदर बर्‍यापैकी घटला आहे

त्याला आवर घालताघालता
सोबत त्याच्या जगावं लागेल
आधींच्यापेक्षा खुप जबाबदारीने
आपल्याला आता वागावं लागेल

• रघुनाथ सोनटक्के

Vatratika, Raghunath Sontakke

सोमवार, ६ जुलै, २०२०

आॅनलाईन शिक्षण

आॅनलाईन शिक्षण
आजच्या काळातही अतुट
गुरू शिष्याचे नाते आहे
दक्षिणेसाठी आॅनलाईनने
मार्गदर्शन त्यांचे होते आहे

शाळा हे मंदीर होते
आता फक्त ते स्कुल आहे
शिक्षणासह संस्कार मिळतील
ही आपली भूल आहे

प्रत्यक्ष संवाद हरवतोय
हि त्याचीच एक नांदी आहे
पालक लावतो रेसमधे पैसा
संस्थाचालकांची चांदी आहे
•  रघुनाथ सोनटक्के, पुणे
   मो. ८८०५७९१९०५

Vatratika, Raghunath Sontakke