सोमवार, २९ जून, २०२०

हवामानाचा अंदाज

हवामानाचा अंदाज
पावसाची शक्यता दिल्यावर
ढग मागे फिरू शकतात
हवामानखात्याचे अंदाज
कधीकधीच खरे ठरू शकतात

चोख जरी नसले तरी
निराश मनाला बरे करतात
शंभरातून निदान दोन तरी
अंदाज त्यांचे खरे ठरतात

पाऊस येईल म्हटलं कि
सारा महिना सुका असतो
बरसायला लागतो तेव्हा
मुसळधारचा धोका असतो
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
   मो. ८८०५७९१९०५

रविवार, २८ जून, २०२०

दरवाढीचा भडका

दरवाढीचा भडका
रोजच उडायला लागलाय
इंधन दरवाढीचा भडका
राजकिय पक्षही देतात
असंतोषाला मस्त तडका

सरकार आहे गपगार
विरोधी पक्ष चढत आहे
रोज पेट्रोलचे दर वाढून
नवे विक्रम मोडत आहे
•  रघुनाथ सोनटक्के, पुणे
   मो. ८८०५७९१९०५

शनिवार, २७ जून, २०२०

बोगस बियाणे

बोगस बियाणे
दरवर्षी शेतकरी फसतो
विकत घेऊन बोगस बियाणे
कंपन्या तर करतात लुट
सरकारही ऐकेना गार्‍हाणे

पेरणीपासून सुरवात होते
विकण्यापर्यंत फसत राहतो
जगाला जगवण्यासाठी तो
इमानेइतबारे कसत राहतो

• रघुनाथ सोनटक्के, पुणे
  मो. ८८०५७९१९०५
Vatratika, Raghunath Sontakke

शुक्रवार, २६ जून, २०२०

बेताल वक्तव्य

बेताल वक्तव्य
बेताल आरोपांचा नाद
प्रसिद्धीची पध्दत आहे सोपी
चौफेर टिकेनंतर मग
मागावी लागणार नाही माफी
उचलली जीभ, लावली टाळ्याला
नको तेवढी घसरते
काम न करताही किर्ती!
वादग्रस्त बोलून पसरते

सभ्यता, संकेत आणि मर्यादा
आजकाल कुणी पाळत नाही
भावनेच्या भरात बोलण्याचा
मोह सहसा कुणी टाळत नाही
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
  मो. ८८०५७९१९०५
Vatratika, Raghunath Sontakke



गुरुवार, २५ जून, २०२०

देशभक्तीच्या गप्पा

देशभक्तीच्या गप्पा
देशभक्तीच्या गप्पा आपण
बिनधास्तपणे ठोकत असतो
बलीदान देऊन सैनिकांचे
अखंडता कायम राखत असतो!

चीनच्या हल्ल्याने शहीद झाले
परत कुचकामी ठरलो आहे
मैत्री, सहकार्यासाठी कि उगीच
जग कशासाठी फिरलो आहे?
रघुनाथ सोनटक्के, पुणे
  मो. ८८०५७९१९०५
Vatratika, Raghunath Sontakke

बुधवार, २४ जून, २०२०

चीनचा बहिष्कार

चीनचा बहिष्कार
चीनने व्यापलाय बाजार
काहीजण स्वदेशी जपत आहेत
लाॅंच झाल्याझाल्याच मोबाईल
अजुनही लगोलग खपत आहेत

उशिराने का होईना आत्मनिर्भरतेची
जनतेला पोकळ हाक आहे
टेंडर आणि माल आयातीने
बहिष्कार आपला खाक आहे!
रघुनाथ सोनटक्के, पुणे
  मो. ८८०५७९१९०५
Vatratika, Raghunath Sontakke

शुक्रवार, १९ जून, २०२०

दरवाढ

दरवाढ
गरिबांच्या डोक्यावर नेहमीच
दरवाढीचा भार आहे
पैशावाल्यांना काही फरक नाही
मात्र सामान्य गारेगार आहे

पेट्रोल-डिझेल वाढलं की
नेहमीच भार ठरत असते
सरकार मात्र कोणतेही असो
गल्ला खच्चून भरत असते
रघुनाथ सोनटक्के (पुणे)
   मो. ८८०५७९१९०५
 
Vatratika, Raghunath Sontakke

कंपुशाही

कंपुशाही
प्रत्येक क्षेत्रातच आहे
कंपुशाहीचं थोडंफार प्रस्थ
वर्तुळाबाहेरील, नवोदित
होतात त्याने खुप त्रस्थ

कर्तृत्व, गुणाच्या बळावर
जरी उपलब्ध संधी आहे
द्वेष, मत्सर, एकाधिकारशाही
हेतूपुरस्परपणे नाकाबंदी आहे

• रघुनाथ सोनटक्के (पुणे)
 मो. ८८०५७९१९०५

Vatratika, Raghunath Sontakke

बुधवार, १७ जून, २०२०

कोरोनाची गती

कोरोनाची गती
जो नियमांचे उल्लंघन करेल
त्याच्यावर कोरोनाचा हल्ला आहे
आरोग्य अबाधीत राखण्यासाठी
सावध राहण्याचा सल्ला आहे

काळजात धडकी भरवणारी
कोरोनाची मोठी गती आहे
बेजबाबदार वागणार्‍यासोबत
खुप घट्ट त्याची युती आहे
• रघुनाथ सोनटक्के
Vatratika, Raghunath Sontakke

चीन आणि नेपाळ

चीन आणि नेपाळ
अधूनमधून ड्रॅगनवाला चीन 
दिखा रहा है बडी आॅख
नेपाळलाही राहीला नाही
थोडासाही कुठे धाक!

चायनाला मिळातायेत टेंडर
देशप्रेम झालं नुसतं खोका
तिकडे जमिनही हडपली
म्हणे अैप अनिस्टाल ठोका
रघुनाथ सोनटक्के (पुणे)
   मो. ८८०५७९१९०५
१८ जुन २०२०, दै. युतीचक्र 
Vatratika, Raghunath Sontakke

मंगळवार, १६ जून, २०२०

सेलेब्रिटींचा शोक

सेलेब्रिटींचा शोक
सेलेब्रिटींचा आनंद थाटात
दु:ख जागतिक शोक आहे
सामान्यांचं दुखणं शुल्लकच
बड्या लोकांचं रोख आहे

झोपायला मोडकी झोपडी
गरीब सुखाने निजत आहे
पैसा, प्रसिद्धीतही सेलेब्रिटी
एकटा दु:खाने भिजत आहे

पडद्यावर जगणं आलिशान
खर्‍या 'लाईफ'मधे पोकळी आहे
गरिबांची 'जिंदगी' मात्र
साधी, सरळ अन् मोकळी आहे

•  रघुनाथ सोनटक्के (पुणे)
   मो. ८८०५७९१९०५
 
Vatratika, Raghunath Sontakke
 

सोमवार, १५ जून, २०२०

कसाईधंदा

कसाईधंदा
खरीच आहे ती म्हण कि
डाॅक्टरांपेक्षा कसाई बरा
पैशाची लूट करण्यासाठी
रोग्यावर चालवतो सुरा

रुग्णसेवा जणू देवाच्या स्थानी
मात्र काहींचा तो धंदा आहे
राजरोजपणे जीवाशी खेळणे
विषय हा खुपच गंदा आहे

• रघुनाथ सोनटक्के
 
Vatratika, Raghunath Sontakke

रविवार, १४ जून, २०२०

संकटातही प्रचार

संकटातही प्रचार
देश संकटात असतांना
काहीना राजकारण प्यारं आहे
निवडणूक आणि सत्तेचं
काहींच्या डोक्यात वारं आहे

जनतेच्या दु:खाचा विसर
नेहमीचं त्यांना वावडं असते
सत्तेच्या अट्टाहासापायी
हाती प्रचाराचं फावडं असते

• रघुनाथ सोनटक्के

Vatratika, Raghunath Sontakke

गुरुवार, ११ जून, २०२०

राजकारणाची सर्कस

राजकारणाची सर्कस
राजकारण म्हणजे खरेच
अफलातून एक सर्कस आहे
खेचाखेची करण्यात एकजण
दुसर्‍यापेक्षा वरकस आहे

पक्षापक्षात वादाची परिसीमा
कारभार्‍याच्या पाठीत हंटर आहे
श्रेष्ठत्व आणि तुच्छतेच्या लढाईत
जनतेचं भलं मात्र नंतर आहे

• रघुनाथ सोनटक्के 

जुन २०२० दै. युतीचक्र
Vatratika, Raghunath Sontakke

  

मंगळवार, ९ जून, २०२०

अनलाॅक १.०

अनलॉक १.०
अनलॉकने जबाबदारीचा
लागणार आहे खरा कस
कुणाला वाटत आहे सेफ
कुणाला हवी आहे लस

भारत पोहचला आहे
रूग्णसंख्येने पाचव्या स्थानावर
आरोग्य संघटनेचा इशारा
यावे आतातरी थोडे भानावर

• रघुनाथ सोनटक्के

 ११ जुन २०२०, दै. युतीचक्र आणि आदर्श महाराष्ट्र
Vatratika, Raghunath Sontakke



सोमवार, ८ जून, २०२०

निसर्गाची कला

निसर्गाची कला
कुठे पडझड, पाऊस
कधी वादळाने हैदोस
कधी करतो उधळण
निसर्ग देतो भरघोस

मानव झाला अतिरेकी
वागायला हवा तो भला
निसर्ग वागतो मग विचित्र
अजब त्याची ही कला

• रघुनाथ सोनटक्के

(रोज दै. युवा छत्रपती, लातूर आणि
दै. राज्योन्नती, अकोला मधे प्रकाशित)
१३ जुन २०२० दै.  युतीचक्र
Vatratika, Raghunath Sontakke

रविवार, ७ जून, २०२०

प्राण्यांची हत्या

प्राण्यांची हत्या
हत्ती असो वा वाघ
आणखी दुसरा प्राणी
बळी पडत आला आहे
माणसाची मनमानी !

अधाशासारखे घाव आवासावर
उजाडला त्यांचा वावर
नेहमी गाजवत आला आहे
मानव त्याची पावर

कधीकधी येतो माणसाच्या
निर्दयतेचा खुप किळस
जेव्हा दिसतो त्यातला राक्षस
अन् स्वार्थीपणाचा कळस

• रघुनाथ सोनटक्के
Raghunath Sontakke


स्वदेशीचे सल्ले

स्वदेशीचे सल्ले
अधूनमधून मिळत राहतात
स्वदेशी वापराचे सल्ले
निती ठरवुन टाकते सरकार
सामान्यावर उपदेशाचे हल्ले

काहीजण स्वदेशीचा प्रचार
नेटून मात्र करत असतात
सोबत देशप्रेमाचेही डोस
ठासून खुप भरत असतात

• रघुनाथ सोनटक्के
 मो. ८८०५७९१९०५

Raghunath Sontakke

शनिवार, ६ जून, २०२०

शाळेला सुरवात

शाळेला सुरवात
सरकार करणार आहे म्हणे
शाळेचा पुन्हा सुरू पाठ
मुलांचीही पडणार आहे मग
कठिण कोरोनाशी गाठ

जीव वाचला तर कोणतंही
नुकसान पुन्हा भरून निघेल
हळूहळू सारं जग या
कोरोनातून तरून निघेल

ई-लर्निंग, स्व-अध्ययन
करायला काय हरकत आहे
कारण दिवसेंदिवस जीवघेण्या
कोरोनामधे बरकत आहे

• रघुनाथ सोनटक्के
 मो. ८८०५७९१९०५
Raghunath Sontakke

सोमवार, १ जून, २०२०

लढा

लढा
हजारोने पडते आहे
रोज नव्या रूग्णांची भर
कठिन होईल जगणे आपले
झाला स्फोट असाच जर

जिंकू शकू आपण हा
कोरोनाचाविरूध्दचा लढा
सगळ्यांनीच केले सहकार्य
अन् दाखवला संयम थोडा
• रघुनाथ सोनटक्के
 
Vatratika, Raghunath Sontakke