गुरुवार, २८ मे, २०२०

कहर

कहर
कोरोनासोबत चालू आहे
सगळीकडे उष्णतेचा कहर
टिकणार नाही म्हणायचो आधी
त्यापुढे कोरोनाची लहर

बांधावे लागते मुसके
अन् डोक्यालाही पटके
भर उन्हाळ्यात लाहीलाही
त्यात कोरोनाचे झटके

• रघुनाथ सोनटक्के
मे २०२०, दै युवा छत्रपती
 दै. राज्योन्नती २८ मे २०२०
Vatratika, Raghunath Sontakke

बुधवार, २७ मे, २०२०

भेटीगाठी

भेटीगाठी
राज्यपालांच्या भेटीला
रोज एक नेता दारावर आहे
कुणी म्हणतो राजवट लावा
कुणी म्हणे भुकंप घडणार आहे

कधी भेटतात फडणवीस
तर भवन गाठतात राणे
कुणाला हवा सत्तापालट
कधी वेगळेच गार्‍हाणे

सामान्य माणूस आधीच
आहे कोरोनाने भयभीत
सहकार्य करणे व्यवस्थेला
यातच आहे सर्वांचे हीत

• रघुनाथ सोनटक्के
Vatratika, Raghunath Sontakke

मंगळवार, २६ मे, २०२०

घरवापसी

घरवापसी
शहरांकडून खेड्याकडे चालू
झाला आहे कोरोनाचा प्रवास
विक्रमी बाधीतांच्या आकड्याने
उजाडतो रोज नवा दिवस
भीतीने स्थलांतर वाढलेय
मुळगावी लोकांची परती आहे
पोसणार्‍या शहरांना ओहोटी
खेड्यांना मोठी भरती आहे
• रघुनाथ सोनटक्के

 २७ मे २०२०, दै युवा छत्रपती
 २७ मे २०२०, दै. युवा छत्रपती, दै. आदर्श महाराष्ट्र
Vatratika, Raghunath Sontakke
२९ मे २०२०, दै. राज्योन्नती, दै. युतीचक्र २८ मे २०२०
 

रविवार, २४ मे, २०२०

गुणाकाराने प्रसार

गुणाकाराने प्रसार
ठेवा वैयक्तिक स्वच्छता
आणि पाळा सुरक्षित अंतर
सर सलामत तो पगडी पचास
बाकी सारं होईल नंतर

वाढत चाललेत कोरोनाचे
रोज गुणाकाराने बळी
अनर्थ होईल मोठा जर
आवरला नाही प्रसार यावेळी

• रघुनाथ सोनटक्के
 २५ मे २०२०, दै. युवा छत्रपती 

Vatratika, Raghunath Sontakke

काळं आंदोलन

काळं आंदोलन
ऐन संकटकाळात आली
राजकारणाची बाजू काळी
सहकार्य आणि विश्वास सोडून
दिली आंदोलनाची हाळी

पक्षाला उभारी द्यायला
आंदोलनाची थोडी हवा आहे
नेत्यांनांही निमित्त मिळते
अन् कार्यकर्त्यांची दवा आहे

• रघुनाथ सोनटक्के
२४ मे २०२० , दै. राज्योन्नती
Vatratika, Raghunath Sontakke
 

गुरुवार, २१ मे, २०२०

शेतकर्‍याचे हाल

शेतकर्‍याचे हाल
कांदा असो कि भाज्या
असो टमाटा लालेलाल
बारोमास शेतकर्‍यांचे
होते शोषण आणि हाल

पिकवुनही मनासारखं
भाव खाली पडून जातो
शासनाच्या उदासीनतेपायी
माल कधी सडून जातो

सारं जग ठप्प असलं तरी
तो राबराब राबत असतो
अडत्या, व्यापारी आणि आपण
भाव पाडून मागत असतो
• रघुनाथ सोनटक्के

Raghunath Sontakke

मंगळवार, १९ मे, २०२०

लाखाचा टप्पा

लाखाचा टप्पा
अखेर गाठलाच आहे
कोरोनाने लाखाचा टप्पा
सोशल डिस्टंसिंगचे पालन
झाल्यात नुसता गप्पा

आरोग्याचा आहे बिकट प्रश्न
सर्वांनीच पाळायला हवी बंदी
मात्र महाभाग सोडत नाहीत
लॉकडाऊन तोडण्याची संधी

• रघुनाथ सोनटक्के

२३ मे २०२०, दै युवा छत्रपती 
२० मे २०२०, दै. युतीचक्र , दै. राज्योन्नती २१ मे २०२०,
Raghunath Sontakke

अपुरेच सारे

अपुरेच सारे
रोज वाढते आहे परेशानी
वाढत आहेत रुग्णांचे आकडे
अपुर्‍या प्रमाणात सहकार्य
प्रयत्नही पडतायत तोकडे

रस्त्त्यावर उतरलेत काही
काहीजण परतीच्या वाटेवर
लाॅकडाऊन वाढवला तरी
फरक नाही कोरोना लाटेवर
• रघुनाथ सोनटक्के
२० मे २०२० , दै. राज्योन्नती


शुक्रवार, १५ मे, २०२०

फेकण्याची कला

फेकण्याची कला 
आपल्या नेत्यांकडे भरपूर
फेकण्याची मस्त कला आहे
प्रत्येकजण सहज फसतो
कारण तो भोळा अन् भला आहे

कित्येकवर्षे नेत्यांच्या शब्दांना
तो पुरता फसत आला आहे
आत्मसंतोषाने बेधुंद होऊन
प्रतिकुलतेतही हसत आला आहे

जुन्या रॅपरमधेच परतपरत
तिच जुनी दारू आहे
विकासाच्या बातांचा त्यांचा
उधळणारा चौफेर वारू आहे
• रघुनाथ सोनटक्के
(खरपूस वात्रटिका: दै. युवा छत्रपती)


१७ मे २०२०, दै. युतीचक्र  




गुरुवार, १४ मे, २०२०

घरपोच दारू

घरपोच दारू
आता तळीरामांची सोय
घरपोच मिळणार आहे दारू
बंदच्या परिस्थितीतही त्यांचा
सुसाट उधळणार आहे वारू

तिजोरीला हातभार लागतो
त्यांच्याही कामाची तुलना आहे
कुणाची हवी किती काळजी
इतरांची मोठी अवेहलना आहे
• रघुनाथ सोनटक्के
 
 

शुक्रवार, ८ मे, २०२०

दुजाभाव


दुजाभाव
परदेशातल्या अडकलेल्यासाठी
स्पेशल प्लाॅन आहे
मजूर मात्र पायदळी निघाले
वागणुक कुठे सेम आहे?

पासपोर्टवाल्यांनी रोग आणला
रेशनकार्डवाला भोगतो आहे
राजकारणीही त्याच्यासोबत
दुजाभावाने वागतो आहे

पैसेवाल्यांची घरात राहून
तेवढीतरी सुटका आहे
गरिबाची रोजगार आणि भुकेने
बिकट खरी घटका आहे
• रघुनाथ सोनटक्के 
९ मे २०२०, दै युवा छत्रपती

Vatratika, Raghunath Sontakke
२२ मे २०२०, दै. राज्योन्नती
Vatratika, Raghunath Sontakke



पोलीस

पोलीस
मोकाटांना घालावा लागतो
कंबर कसून आवर
कुणी असेल बाधीत आणि
कुठे असेल वावर

जीव घालून धोक्यात
रस्त्यावर ते उतरले आहेत
कुठे तर बंधनांनी लोक
नको तेवढे बिथरले आहेत

एवढंच कमी कि काय
पगारात कपात केली आहे
अवेहलनेतही कर्तव्याची ओळख
त्यांच्या रूपात झाली आहे
• रघुनाथ सोनटक्के



८ मे २०२०, दै युवा छत्रपती 

Vatratika, Raghunath Sontakke

गुरुवार, ७ मे, २०२०

दारूसाठी रांगा

दारूसाठी रांगा
दारूसाठी लांब रांगा
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
तळीरामांना करायची आहे
जीव धोक्यात घालून मज्जा

एवढ्या दिवसाचा संयम
त्यांनीही आता सोडला आहे
कराच्या लोभापायी सरकारने
लाॅकडाऊनच तोडला आहे

व्यसनापायी तळीरामांनी
जीवाशी कुणाच्या खेळू नये
संयम बाळगा थोडे दिवस
असे बाटलीमागे पळू नये
• रघुनाथ सोनटक्के

Vatratika, Raghunath Sontakke
७ मे २०२०, दै युवा छत्रपती
८ मे २०२०, दै. आदर्श महाराष्ट्र आणि दै. युतीचक्र
Vatratika, Raghunath SontakkeVatratika, Raghunath Sontakke
    

Vatratika, Raghunath Sontakke

मंगळवार, ५ मे, २०२०

मुहूर्त

मुहूर्त
 कोरोनामुळे मुहूर्त सारे
आपोआपच आटले आहेत
सारे दिवस सारखे
सर्वांनाच वाटले आहेत

कुणी आटोपले आॅनलाईन
दिवस खरेच लोटले आहेत!
काहींनी तर घरात राहण्याचे
फायदे बरेच लाटले आहेत
रघुनाथ सोनटक्के
५ मे २०२०, दै युवा छत्रपती
७ मे २०२०, दै. युतीचक्र आणि  ६ मे २०२०, दै. आदर्श महाराष्ट्र

Vatratika, Raghunath Sontakke