गुरुवार, ३० एप्रिल, २०२०

कर्जमाफी

कर्जमाफी
 जनतेच्या पैशातून केली
मोठ्या धेंडाना कर्जमाफी 
सामान्य मरतो कर भरून
सुरक्षित आहेत लुटारू, पापी!

चोरांनाच अभय मिळाले
टाकुन जनतेच्या पैशावर डल्ला
आपण जर चुकवला हप्ता
होतो आपल्यावर चौफेर हल्ला
 • रघुनाथ सोनटक्के

मंगळवार, २८ एप्रिल, २०२०

भ्रष्टाचार आणि नफेखोरी

भ्रष्टाचार आणि नफेखोरी
भ्रष्टाचारी लोक खातात
मृताच्या टाळूवरचे लोणी
संकटकाळात होते मग
समाजाची अपरिमित हानी

अडचण पाहून जनतेची
येतो नफेखोरीला ऊत
कडक बंदोबस्ताशिवाय
उतरत नाही त्यांचं भूत

निर्लज्जपणाचा गाठतात
असे बेईमान अतुच्य कळस
माणुसकीला वाटत राहते
यांच्या वागणुकीची किळस
• रघुनाथ सोनटक्के


Vatratika, Raghunath Sontakke
३० एप्रिल  २०२०, दै. युतीचक 
Vatratika, Raghunath Sontakke



सोमवार, २७ एप्रिल, २०२०

भुकबळी

भुकबळी
अन्नदान करायला हवे
शोधुन निराधार आणि गरीब
उपाशी झोपणार नाही
असेल कुणी आपल्या करीब

काम नाही, कमाई नाही
दुकान, कारखान्यांना टाळं
उपासमारीमारीने मरतायत
मजुर, महिला आणि बाळं

संकटात दाखवुया आपल्यातल्या
मानवतेचे थोडेसे रूप
वाचेल गरिबाचा जीव
अन् शमेल त्याची भूक
• रघुनाथ सोनटक्के


 २८ एप्रिल  २०२०, आदर्श महाराष्ट्र

शुक्रवार, २४ एप्रिल, २०२०

आकडा

आकडा
दिवसेंदिवस वाढतोय आकडा
होत नाही अजून उणे
मुंबईवाल्यांचा बेजाबदारपणा
मागे नाही थोडे पुणे

जे लोक पाळणार नाहीत
नियम आणि कायदे
त्यांच्यामुळे बुडणार आहेत
लाॅकडाऊनचे फायदे
• रघुनाथ सोनटक्के
Vatratika, Raghunath Sontakke

गुरुवार, २३ एप्रिल, २०२०

बेजबाबदारपणा

बेजबाबदारपणा
भारी पडू शकते एखाद्याचं
बेजबाबदारपणे वागणं
नियम पाळणं गरजेचं आहे
घरातच निमुटपणे थांबणं

घालून घ्यावी स्वत: वरच
प्रतिबंध आणि बंदी
घरात बर्‍याच आहेत
चांगलं करायच्या संधी
• रघुनाथ सोनटक्के

Vatratika, Raghunath Sontakke

बुधवार, २२ एप्रिल, २०२०

माॅब लिंचिंग

माॅब लिंचिंग
भरकटलेले, अनियंत्रित लोक
माॅब लिंचिंगला कारण
चोर सोडून होऊन जाते
मग सन्यांश्याचे मरण

चूकीची माहिती, अफवा
प्रकार हा रोखला पाहिजे
कुणीही का गुंतला असेना
सरळ आत घातला पाहिजे

राजकारणी लोकांना मात्र
द्यायचा असतो धार्मिक रंग
शांतता, संयमच राखायला हवा
समाजात लोकांच्या संग
• रघुनाथ सोनटक्के
 

सोमवार, २० एप्रिल, २०२०

जगाचा पोशिंदा

जगाचा पोशिंदा
सरकारचे साफ दुर्लक्ष 
आंदोलनानेच हक्क मिळणार आहे!
अशातही व्यापार्‍यांकडून
लुबाडणूक भरमसाठ सोसतो आहे

तो पिकवतो म्हणूनच तर 
आपणही खुशाल जगतो आहोत
मातीमोल भावात माल तो
किती दिवस विकणार आहे?

सारं जग ठप्प झालेलं
घरात राहून जगतो आहोत
पोशिंदा असुनही त्याच्यासोबत
आपण कसे वागतो आहोत?
• रघुनाथ सोनटक्के
दिवाळी अंक: http://bit.ly/ShabdRasik-2019
 २१ एप्रिल २०, दै. आपला महाराष्ट्र 
Vatratika, Raghunath Sontakke
 

गुरुवार, १६ एप्रिल, २०२०

चीनचा डाव

चीनचा डाव
कोरोनामागे दडलाय
चीनचा कुटील डाव
अख्खं जग भोगत आहे
विपरीत परिणाम राव!

सार्‍या जगाला लोटून
महामारीच्या या खाईत
त्यातही जपतो व्यापारी वृत्ती
बघा कसा ड्रॅगन सराईत

जगावर राज्य करायचे त्याला
हे ओळखुन आहेत सारे
दुसर्‍यांना त्रास देऊन
मोठे होणे आहे का बरे?
• रघुनाथ सोनटक्के

मंगळवार, १४ एप्रिल, २०२०

कधी नव्हे ते

कधी नव्हे ते
कधी घडल नव्हतं
असं आता घडलं आहे
आपल्याच घरात लपणे
कसं भाग पडलं आहे!

माणसं घुसली बिळात
प्राणी येतायत बाहेर
निसर्गांशी करून प्रतारणा
माणुस झालाय कायर
• रघुनाथ सोनटक्के

Vatratika, Raghunath Sontakke

डाॅक्टरांवर हमले

डाॅक्टरांवर हमले
डाॅक्टरांवर होत आहेत
अजुनही जीवघेणे हमले
त्यांच्याचमुळे तर खरे
आहेत कितीजण जगले

कठिणप्रसंगी त्यांच्याशिवाय
कोण आणि कधी धावले?
जीथे भल्याभल्यांनीच तर
आपले दरवाजे आहेत लावले
• रघुनाथ सोनटक्के

Vatratika, Raghunath Sontakke

सोमवार, १३ एप्रिल, २०२०

शिक्केबाज दानशूर

शिक्केबाज दानशूर
भयंकर संकटातही काहींना
चमकोगिरीची खाज आहे
कळत नाही मदत करतो कि
नुसता जाहिरातबाज आहे!

धान्य, भाजीपाला, वस्तूंच्या
पाकिटांवरही यांचे शिक्के आहेत
उगवलेल्या मोसमी दानशूरांचे
फोटोसाठी एकमेकांना धक्के आहेत
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
  मो. ८८०५७९१९०५

Vatratika, Raghunath Sontakke

शुक्रवार, १० एप्रिल, २०२०

कोरोनापासून बचाब

कोरोनापासून बचाव
कोरोनापासून वाचण्यासाठी
घरात बसणे हाच आहे सल्ला
तरच परतवून लावू शकु
कोरोनाचा भयानक हल्ला

सरकार, प्रशासन जनतेला
सांगुन आता आहे थकले
दिवसरात्र झटतायत डाॅक्टर्स
वाचवायला जीव आपले
रघुनाथ सोनटक्के
Vatratika - Raghunath Sontakke

मंदीचं सावट

मंदीचं सावट
रोगराईनंतर होणार हे
नोकरदारांची कपात
भलं मोठं संकट उभं आहे
बेरोजगारीच्या रूपात

रूपया, देशाचा जीडेपी
कमालीचा घसरला आहे
त्यात महागाईचा रोगही
नको तेवढा पसरला आहे

• रघुनाथ सोनटक्के

Vatratika - Raghunath Sontakke

बुधवार, ८ एप्रिल, २०२०

घरातला वेळ

घरातला वेळ
तोंडाला हवा रूमाल
ठेवा पाच फुट अंतर
सेफ राहा घरातच
फिरा हवे तसे नंतर

बाहेर फिरून उगाच
करू नका जीवाशी खेळ
घरात राहूनच घालवा
कुटुंबासह आपला वेळ
• रघुनाथ सोनटक्के
('खरपूस' सदर दै. युवा छत्रपतीमधे)
 ८ एप्रिल, आदर्श महाराष्ट्र

मंगळवार, ७ एप्रिल, २०२०

सोशल डिस्टंटसींग

सोशल डिस्टंटसींग
सोशल डिस्टंटसींगची होत आहे
काही कडून एैसी तैशी
अजुन फिरत आहेतच
काही महाभाग हौशी

रूग्णांच्या लपेटमधे येऊन
जळेल ओला अन् सुका
अशानच वाढत जातोय
कोरोनाचा भंयकर धोका

• रघुनाथ सोनटक्के
('खरपूस' सदर दै. युवा छत्रपतीमधे)

Vatratika - Raghunah Sontakke


रविवार, ५ एप्रिल, २०२०

फेक न्युज

फेक वार्ता
फेक न्युज आणि अफवा
सर्वांनीच यांना रोखा
कोरोनापेक्षा माणसांना
यांचाच आहे धोका

सकारात्मक गोष्टींपेक्षा
भंपकपणाला ऊत आहे
भीती, उथळपणाचा येथे
प्रत्येकजण दुत आहे
रघुनाथ सोनटक्के
('खरपूस' सदर दै. युवा छत्रपतीमधे)
 ६ एप्रिल, आदर्श महाराष्ट्र 
 १३ एप्रिल २०, जनमाध्यम
६ एप्रिल २०२०, आदर्श महाराष्ट्र 
 १३ एप्रिल २०२०, जनमाध्यम
Vatratika, Raghunath Sontakke
६ एप्रिल २०२०, शब्दराज 
Vatratika - Raghunath Sontakke