मंगळवार, २४ मार्च, २०२०

दाहक स्थिती

दाहक स्थिती
दिवसेदिवस बनत चाललंय
कोरोनाने वातावरण दाहक
बाहेर पडू नये क्वारंटाईनने
बनेल तो कोरोनाचा वाहक

घालून घ्या स्वत:वरच
बाहेर न पडण्याचं बंधन
स्वत:सोबत दुसर्‍याचंही
करा कोरोनापासून रक्षण

करू नका प्रसारित फालतू
उपाय, अफवा वा टाळी
पालन करा फक्त निर्देशाचे
अन्यथा पश्वातापाची पाळी

• रघुनाथ सोनटक्के
   मो. ८८०५७९१९०५
 
Vatratika - Raghunath Sontakke
२५ एप्रिल २०२०, दै . युतीचक्र 
Vatratika, Raghunath Sontakke
 








गुरुवार, १९ मार्च, २०२०

कोरोनाची धास्ती

कोरोनाची धास्ती
शाळा, बाजार बंद
सगळ्यांनाच त्याची धास्ती
मार्केटही झालं डाऊन
मासं मच्छी खुपच सस्ती

एका विषाणूने बसवली
सार्‍या जगावर जरब
लाॅक डाऊन अख्खं जग
अन् आहे तो एक तरफ

नियोजन आणि खबरदारीने
करायची त्यावर मात
सगळं काही चांगलं होईल
जर असेल सर्वांची साथ
• रघुनाथ सोनटक्के

Vatratika - Raghunath Sontakke


कोरोनाने कोंडी

कोरोनाने कोंडी
उपायांच्या याद्या वायरल
अफवांचं पेव आहे
चर्च, मंदीर, मस्जिदी बंद
डाॅक्टरच देव आहे

फैलाव रोखण्यासाठी गर्दी नको
बाजारातही मंदी आहे
घरातच वेळ घालवण्याची
मानली तर चांगली संधी आहे
• रघुनाथ सोनटक्के
Vatratika - Raghunath Sontakke
Vatratika, Raghunath Sontakke

शुक्रवार, १३ मार्च, २०२०

कोरोनाला प्रतिबंध

कोरोनाला प्रतिबंध
प्रबोधन कमी चाललं
अफवांचा जास्त बाजार
आला आहे म्हणे
कोरोनाचा आजार

सगळे झाले सावध
नको कोरोनाची बाधा
हात धुवा, मास्क घाला
नियम आहे साधा

सावधगिरी पाळावी
राहा अफवांपासून लांब
उपचारापेक्षा प्रतिबंध बरा
हा मंत्रच आहे छान
• रघुनाथ सोनटक्के

Vatratika - Raghunath Sontakke

शुक्रवार, ६ मार्च, २०२०

अहवाल आणि चर्चा

अहवाल आणि चर्चा
आधीच्यांनी काय केलं
अहवाल नव्यानं सादर आहे
सत्तेच्या धाकाने का होईना
नव्यांना तेवढा आदर अाहे

माजींना अहवाल छळतात
आता समित्यांची चर्चा झडते
भरपूर अभ्यास करूनच
कामांकडे मग मोर्चा वळते

• रघुनाथ सोनटक्के

गुरुवार, ५ मार्च, २०२०

काॅपीबहाद्दर

कॉपीबहाद्दर
अभ्यासाअंती लक्षात येते
शेवटचा 'पर्याय' काॅपी आहे
शाळेच्या परिक्षेत पास व्हाल
आयुष्यात कुठे माफी आहे?

बहाद्दरांसोबत पालंकांचाही
शार्टकटकडे धावा दिसतो
प्रामाणिक मुलांनाच का मग
फक्त अभ्यास हवा असतो!

• रघुनाथ सोनटक्के

सोशल मीडिया


सोशल मीडिया
प्रसिद्धी, चर्चा, खोड्या
सर्वाचाच भडीमार आहे
सोशलमीडियाचा वापर
मुक्त आणि बेसुमार आहे

सोशलमीडियात महाभाग
तोडतात अकलेचे तारे
सोम्या, गोम्या आणि नार्‍या
एकाहून एक हुशार सारे

पोपटासारखा बोलायला
नको तेवढा फेकु असतो
प्रत्यक्षात संवादाची उणीव
सोशलमीडियाचा टेकू असतो

• रघुनाथ सोनटक्के

बुधवार, ४ मार्च, २०२०

टळणारी फाशी

टळणारी फाशी
न्यायच चढला फासावर
फाशी लांबली आहे
गुन्हेगार म्हणेल कारावासापेक्षा
फाशीच चांगली आहे

उशीरा मिळणार्‍या न्यायापासून
पिडीतेची कधी होणार सुटका
गुन्हेगार जगतो फाशीविणा
व्यवस्थेचा दोरच आहे तुटका

• रघुनाथ सोनटक्के

सोमवार, २ मार्च, २०२०

कोरोना

कोरोना
उपद्व्यापी स्वभावाने माणसाच्या
पेरलं आहे जहर
कधी सार्स, कधी कोरोना
घालतो आहे कहर

स्वार्थी वागण्याने त्याच्या
निसर्गावर घाला आहे
निकट वाटतो विनाश
जणू सुरू झाला आहे

• रघुनाथ सोनटक्के

१४ एप्रिल २०२०, लोकमन आणि आदर्श महाराष्ट्र, २१ एप्रिल २०२०, दै . महाराष्ट्र सम्राट
Vatratika - Raghunath Sontakke