शुक्रवार, २८ सप्टेंबर, २०१८

व्याभिचाराचं कलम

खरपूस • वात्रटिका

« व्याभिचाराचं कलम »

तिने केले ते पाप
असा आमचा दावा होता
स्त्रीला मालमत्ता समजणे
आधीच गुन्हा हवा होता

तिने केलेला व्याभिचार
गुन्हा झाला होता
पुरूषांच्या मक्तेदारीचा ठेका
पुन्हा झाला होता

कलमं जुनी झाली की
रद्द करायला हवी
समानतेसाठी नवी दृष्टी
अशीच बाणायला हवी
  • रघुनाथ सोनटक्के
      तळेगाव दाभाडे, पुणे
      मो. 8805791905

 सप्टेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. ३)


गुरुवार, २७ सप्टेंबर, २०१८

गुन्ह्याची जाहिरात

खरपूस • वात्रटिका
« गुन्ह्यांची जाहिरात »

जवळजवळ निम्मे गुन्हेगार
संसदेतच बसले आहेत
कायदा बनवण्याचे निर्देश ऐकून
गालातच हसले आहेत

गुन्हेगार नेत्यांना गुन्ह्यांचे वाचन
आता जाहिरातीने करावे लागेल
आपली पार्श्वभूमी सांगून
मगच पदास पात्र ठरावे लागेल

गुन्हेगारीला चाप लावण्याचा
पक्ष, सरकारवर भार टाकला आहे
धन, बंदूकीच्या जोरावरच तर
इथला हरेक पक्ष वाकला आहे

कोण किती बरा-वाईट याचे
जनतेने भान ठेवले पाहिजे
पेपरात येणार्‍या जाहिरांतीचेही
चांगले ज्ञान ठेवले पाहिजे
 रघुनाथ सोनटक्के
      तळेगाव दाभाडे, पुणे
      मो. 8805791905

 सप्टेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. )



मंगळवार, २५ सप्टेंबर, २०१८

राफेल

खरपूस • वात्रटिका
« राफेल »
Calligraphy by Raghunath Sontakke

कोण चौकीदार आहे,
तर कोण चोर आहे!
कुणाचं उडालं विमान
कुणी अजून दूर आहे

कुणी म्हणतो चांगलं
तर कुणी म्हणे फेल आहे
आरोपांच्या फैरीसाठी
फकडलं ते राफेल आहे

कुणाचं बोफोर्स होतं
तर कुणाचं हे डिल आहे
जनतेला मात्र वादळापूर्वीच
निवडणूकीचा फिल आहे


रघुनाथ सोनटक्के

   मो. 8805791905
   ईबुक: https://goo.gl/aY6hVB

२७ सप्टेंबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १)





शुक्रवार, २१ सप्टेंबर, २०१८

आॅनर किलिंग

ख र पु स । वा त्र टि का

« आॅनर किलिंग »

Calligraphy by Raghunath Sontakke

जातीपाती, विषमतेला लांघून
समतेकडे पिढी झुकली जाते
आपल्याच माणसाचा खुन करून
कसली प्रतिष्ठा राखली जाते?

मान-सन्मानाचा बाऊ करून
आॅनरचं म्हणे किलींग केले जाते
विवेक, माणुसकीला न शोभणारे
खोटंखोटं स्वत:ला फिलिंग दिले जाते

थांबायला हवे हे आता कुठेतरी
विचारांचा सन्मान व्हायला हवा
जपून नाती माणुसकीची
प्रेमाचा दीप खरा तेवायला हवा
• रघुनाथ सोनटक्के
    तळेगाव दाभाडे, पुणे
    मो. 8805791905
 सप्टेंबर २०१८ च्या दै. पथदर्शी मधे प्रकाशित   ऑक्टोबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १०)
 ऑक्टोबर २०१८ च्या दै.विदर्भ मतदार मधे प्रकाशित
Vatratika Vatratika Vatratika

गुरुवार, २० सप्टेंबर, २०१८

निष्पाप बळी

ख र पू स • वा त्र टि का
      «  निष्पाप बळी »

      


निष्पाप, लहान मुलांवर 
अत्याचाराचा रोग वाढला आहे
विकृत नराधमांबरोबरच
भल्याभल्यांचाही मेंदू सडला आहे

कोवळा, निष्पाप जीव नेहमीच
अत्याचाराळा बळी ठरत असतो
पुरोगामी, सुज्ञ म्हणवणारा समाज 
कोणती साफ तळी करत करतो

गुन्ह्यागाराला कठोेर शिक्षेने
वेळीच आळा लावला पाहिजे
होत असेल जिथे असा सौदा
दुकानाला त्या टाळा लावला पाहिजे



रघुनाथ सोनटक्के

    मो. 8805791905

ईबुक: https://goo.gl/aY6hVB

२१ सप्टेंबर २०१८ च्या दै. पथदर्शी मधे प्रकाशित 
२७ सप्टेंबर २०१८ च्या दै. डहाणू मित्र मधे प्रकाशित
Vatratika






सोमवार, १७ सप्टेंबर, २०१८

मतैक्य

ख र पू स । वा त्र टि का
« मतैक्य »
Calligraphy by Raghunath Sontakke

चाहूल लागताच इलेक्शनची
हालचाली खूप घडू लागतात
वाद करणारेही वाटघाटीसाठी
शांत, संयमाने बोलू लागतात

वाद असले तरी त्यांच्यात
मतैक्याने सोडू लागतात
पडघम वाजले कि जनतेसमोर
गोंडा मस्त घोळू लागतात

कधी स्वार्थासाठी एकमेंकावर
आरोपांच्या फैरी झडू लागतात
कधी एकाच व्यासपिठावर बघून
खरे मित्र आणि शत्रू कोण
मग आपल्याला कळू लागतात



रघुनाथ सोनटक्के
   मो. 8805791905
  ईबुक: https://goo.gl/aY6hVB

 ऑक्टोबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १३)   तसेच २० सप्टेंबर २०१८ च्या दै. डहाणू मित्र मध्ये प्रकाशित