गुरुवार, २३ ऑगस्ट, २०१८

‍अफूची गोळी

खरपुस । वात्रटिका

« अफूची गोळी »




गोळी देवून अफुची
भलताच कुणी पेटतोय
भरदिवसा पुरोगाम्याला
सार्‍यादेखत लुटतोय

बुध्दीवादी, सुधारकही

अधर्मामुळे मिटतोय
अहिंसात्मक धर्माचा
तोल का असा सुटतोय

असहिष्णूता, सुड, हिंसा

हाच आता धर्म वाटतोय
मानवतेच्या पुजार्‍याला बघा
काय 'प्रसाद' भेटतोय

खुनी आणि पुजार्‍यातला

भेद आता मिटलाय
देव पाण्यात ठेवून
धर्मच आता बाटलाय

• रघुनाथ सोनटक्के
   तळेगाव दाभाडे, पुणे

   मो. 8805791905

२४ ऑगस्ट २०१८ च्या युवा छत्रपतीमधे प्रकाशित
४ सप्टेंबर २०१८ च्या सायबर क्राईम मधे प्रकाशित 
६ ऑगस्ट २०१८ च्या डहाणू मित्रमधे प्रकाशित 

शनिवार, ११ ऑगस्ट, २०१८

श्रावण

« श्रावण »

न खाता मांस-मच्छी
श्रावण पुर्ण पाळल्या जातो
निदान महिनाभर तरी
सुरा गळ्यावरून काढल्या जातो

बाकी दिवस पाप हत्येचं
झाकून कुठं ठेवलं जातं?
पुण्य कमवायला काय एवढंच!
बाकी तर आम्हालाच गोवलं जातं

हत्या आज केली काय
उद्या केली काय!
पाप-पुण्याचं गणित कळत नाही
शेवटी मरणार्‍याचं मरण
काही केल्या टळत नाही

आम्हीच नेहमी बळीचा 'बकरा'
गळ्यावर हत्येचा सुरा असतो
गोड मानावा तेवढा निदान
श्रावणच फक्त बरा असतो

• रघुनाथ सोनटक्के
तळेगाव दाभाडे, पुणे 

मो. 8805791905

वात्रटिकासंग्रह: https://goo.gl/7CcLUw

१३ ऑगस्ट २०१८ च्या युवा छत्रपती मधे प्रकाशित