मंगळवार, ३१ जुलै, २०१८

आरक्षणाचं वादळ

• ख र पु स । वा त्र टि का •

« आरक्षणाचं वादळ »

Calligraphy by Raghunath Sontakke
दरवेळी जातीजातीत उठतं
आरक्षणाचं वादळ
नेहमीनेहमी उसवली जाते
एकात्मतेची वाकळ

राजकारण्यांनी केला आहे

जात आणि धर्माचा वापर
आपणच निवडून दिलं त्यांना
मग फोडावं कुणावर खापर

भडकावणे जनतेची डोकी

असतो नेत्यांचा पिंड
उचलतात मग याचा फायदा
छुपे, उपद्रवी गावगुंड

इर्षा, द्वेश, दूही पसरवुन

होत काय बरं साध्य
चर्चा, सुसंवादानेच निघेल
उपाय अन् सुवर्णमध्य


• रघुनाथ सोनटक्के

    तळेगाव दाभाडे, पुणे 

    मो. 8805791905
वात्रटिकासंग्रह: https://goo.gl/7CcLUw

१३ ऑगस्ट २०१८ च्या युवा छत्रपती मधे प्रकाशित 
Yuva Chhatrapati


३ ऑगस्ट २०१८ च्या दै. डहाणू मित्र मधे प्रकाशित 
Dahanu Mitra - Raghunath Sontakke







सोमवार, १६ जुलै, २०१८

खड्डे

• ख र पु स । वा त्र टि का •
    
     « खड्डे »


रस्त्यांची खड्डयांना
अन् खड्डयांची रस्त्यांन‍ा
गरज भासु लागली
माणसं चालली जीवानं
जनता मात्र करांचा भार सोसु लागली

नेमीची येतो पावसाळा
अविरत फिरतं खड्डयांचं 'जातं'
प्रशासनाला काही फरक नाही
म‍ाध्यमांनी चालवलं जरी अविरत भातं

प्रशासन स्तब्ध राहते
सरकारची विकासाची हाळी असते
रस्त्यात मात्र रोज कित्येकांचा
खड्ड्यांने घेतला बळी असते

खड्ड्यावरुन आजकाल बरंच 
राजकारण तापलं आहे 
एकमेंकावर आरोप झाल्यावर काहींनी 
खड्ड्यांनाही झापलं आहे

करोडो रुपये खर्चुन शेवटी काय?
हाती पडतो मातीचा चुरा
खड्डयांनाही चुकला नाही
न चुकणारा पुनर्जन्माचा फेरा


• रघुनाथ सोनटक्के
    तळेगाव दाभाडे, पुणे 

    मो. 8805791905


वात्रटिकासंग्रह: https://goo.gl/7CcLUw

७ जुलै च्या दै. युवा छत्रपती आणि डहाणू मित्र मधे प्रकाशित 


Yuva Chhatrapati - Raghunath SontakkeDahanu Mitra - Raghunath Sontakke

शनिवार, ७ जुलै, २०१८

अफवांचं पेव

• ख र पु स । वा त्र टि का •
« अफवांचं पेव »
Calligraphy by Raghunath Sontakke

जिकडे बघावं तिकडे 

अफवांच फुटलं पेव आहे
चोर सोडून संन्याशाच्या फाशीचं 
आता पडलं भेव आहे

सोशल माध्यमांचा वापर

माणसाना विचलित करायला लागला
गोंधळ, संशयाच्या वातावरणात
निरपराध हकनाक मरायला लागला

कुटील लोकांकडून विपरीतपणे

दुर्घटनेचा भास केल्या जातो
काही झालं नाही तरी मुद्दाम
शांततेचा र्‍हास केल्या जातो 

सुरक्षा, जीवाची काळजी घ्यावी

यात काही वादच नाही
खात्री, विचार आणि विवेकाने
कृतीला आपल्या सादच हवी

• रघुनाथ सोनटक्के

    तळेगाव दाभाडे, पुणे 
    मो. 8805791905
वात्रटिकासंग्रह: https://goo.gl/7CcLUw
शब्दरसिकचा जून-जुलै अंक: bit.ly/Rasik-June-July18