बुधवार, २१ मार्च, २०१८

कचर्‍याची समस्या

• ख र पु स । वा त्र टि का •
« कचर्‍याची समस्या »
Calligraphy by Raghunath Sontakke

प्लाॅस्टिक कचर्‍याने होत आहे
पर्यावरणाचा अतोनात र्‍हास
विघटनशील आणि कापडी
वस्तुच वापराव्या सर्रास

शहराशहरात आता कचर्‍याचे 
मोठेमोठे ढिग साचू लागले
दुर्गंधी, जागेचा अपव्यय
आरोग्याचे बारा वाजू लागले

ओला सुका कचरा घरातला
वेगळा करणे शिकावे
सगळ्यांनी पाळून नियम
सर्वांचे आरोग्य टिकावे

मानवाने रोखावी आता ही
पर्यावरणाची होणारी हानी
झाडे, स्वच्छतापूरक कृतीने
जपावी पृथ्वी, वायु आणि पाणी

• रघुनाथ सोनटक्के©
  मो. 8805791905
   
ड‍ाऊनलोड ईबुक: https://goo.gl/aY6hVB
'रसिक'चा फेब्रुवारी अंक येथे वाचा: https://goo.gl/RuZBEU

(दि १५ एप्रिलच्या दै.  विदर्भ मतदार मध्ये प्रकाशित )

बुधवार, १४ मार्च, २०१८

डाॅक्टरांचे उपचार

• ख र पु स । वा त्र टि का •
« डाॅक्टरांचे उपचार »
Calligraphy by Raghunath Sontakke

(समस्त सेवाभावी डाॅक्टरांना नमन करून)

डाॅक्टरही आजकाल
मंत्राने उपचार करू लागले
जालीम त्यांचे इंजेक्शन
आधुनिक ठरू लागले

महागड्या उपचारानंतरही
रूग्ण जीव सोडू लागले
लाख-कोटींमधे बिलाचे
आकडे बोलू लागले

पैसा असुनही आता कुणाच्या
जिवाची हमी उरली नाही
उपचाराच्या नावे कापणार्‍यांची
कुठे कमी उरली नाही

जीव वाचवायला रूग्णाचा
डाॅक्टर दूत झाला पाहिजे
व्यवसाय नसुन सेवेचा तो
खर‍ा अवधूत झाला पाहिजे
    
• रघुनाथ सोनटक्के©
    मो. 8805791905

(आवडल्यास नावासह शेअर करा.)
  » आणखी वात्रटिका वाचण्यासाठी:
ड‍ाऊनलोड ईबुक: https://goo.gl/aY6hVB
विजिट ब्लॉग: https://vatratika.blogspot.in
'रसिक'चा फेब्रुवारी अंक येथे वाचा: https://goo.gl/RuZBEU

(१० मे २०१८ च्या कल्याण टाइम्स मध्ये प्रकाशित)

४ जूनच्या दै. युवा छत्रपती मधे प्रकाशित 
Calligraphy by Raghunath Sontakke





सोमवार, १२ मार्च, २०१८

स्वाभिमान

« स्वाभिमान »
Calligraphy by Raghunath Sontakke

वजन वापरून काहीजण
पकडतात मागचं दार
काही करून मिळवायची असते त्यांना 
सरकारी पद आणि कार

जनता जेव्हा देत नाही त्यांना 
कसलेच बळ आणि आधार
सत्तालोलूप या गोचीडांची मग
असते मग एकच मदार

राज्यसभा असो कि विधानपरिषद 
कसेही करून पायरी चढतात
'स्व‍ाभिमान'ही पडतो मग गहाण
अन् इरादे त्यांचे खरे कळतात

• रघुनाथ सोनटक्के©
    मो. 8805791905
ईबुक: https://goo.gl/aY6hVB
ब्लॉग: https://vatratika.blogspot.in
रसिकचा फेब्रुवारी अंक: https://goo.gl/RuZBEU
ईक https://m.facebook.com/story.php?story_fbid=1744588312228499&id=100000320415107

शेतकर्‍य‍ाचा लाल सलाम

« शेतकर्‍य‍ाचा 'लाल सलाम' »



दुष्काळ, बोंडअळी
तर कधी गारपिटीने हाल
'सलाम' करतच असतो
शेतकरी आमचा 'लाल'

कर्जमाफीचं गाजर दाखवुन
केला कसा भारी झोल
दिडपट भावाने कधी मिळेल
शेतीकर्‍याला उत्पन्नाचं मोल

आंदोलन झालं की समितीचं
नाटक नेहमीच वाजतं
क‍ितीही फुंकून पिलं तरी
तोंड आमचंच भाजतं

  • रघुनाथ सोनटक्के©

    मो. 8805791905

ईबुक: https://goo.gl/aY6hVB

ब्लॉग: https://vatratika.blogspot.in

रसिकचा फेब्रुवारी अंक: https://goo.gl/RuZBEU

(दि १४ मे २०१८ च्या दै. 'युवा छत्रपती' या लातूरच्या दैनिकात प्रकाशित )
http://yuvachhatrapati.com/epaper/edition/262/may/page/4





रविवार, ११ मार्च, २०१८

वाचाळवीर

« वाचाळवीर »
Calligraphy by Raghunath Sontakke

सत्तेत आल्यावर त्यांची भाषा
बदलून जाते कशी पार!
घुसते डोक्यात सत्तेची नशा
अन् घसरून जाते जीभेची तार

काय बोलतो आहोत याचं
राहत नाही त्यांना भान
दिला होता ज्यासाठी लढा
फारकत घेतात त्यापासून छान

सत्तेत सामिल असते अशी
वाचाळांची थोडी फौज
नाव गमावायला पुरे तेवढे
यांची होत ‍असते मस्त मौज

विसरू नका भुतकाळ
जायचं आहे पुन्हा जनतेच्या दारी
सत्ता, पद गेल्यावरच कळेल
अन् पडतील बोल तुम्हाला हे भारी

  • रघुनाथ सोनटक्के©
   मो. 8805791905

ईबुक: https://goo.gl/aY6hVB
ब्लॉग: https://vatratika.blogspot.in
रसिकचा फेब्रुवारी अंक: https://goo.gl/RuZBEU

(२७ मे. २०१८ च्या 'दै. युवा छत्रपती' मधे प्रकाशित)
http://yuvachhatrapati.com/epaper/edition/274/may/page/4

गुरुवार, ८ मार्च, २०१८

पुतळे

« पुतळे »
  


स्मृती, विचारांना वंदन
कधीचेच मागे पडले आहे
विटंबना, पाडापाडीसाठीच वाटते आता 
पुतळे घडले आहे

कोण? कुठे? कधी?
सन्म‍ानाचं वस्त्र फाडेल
दगडी पुतळ्यासाठी 
कोण कोणासोबत भिडेल

वाद, दंगल, चर्चा यातुन
काहीच मिळणार नाही
पुतळे मात्र बघत राहतील
त्यांना काहीच कळणार नाही

जेवढे आहेत तेवढ्यांना
आता सुखाने राहू द्या
अपमान, विटंबना गिळून
पुतळ्यांना 'पुतळा'च होऊ द्या
   • रघुनाथ सोनटक्के
     मो. 8805791905
ईबुक: https://goo.gl/aY6hVB
ब्लॉग: https://vatratika.blogspot.in
रसिकचा फेब्रुवारी अंक: https://goo.gl/RuZBEU