शुक्रवार, २४ नोव्हेंबर, २०१७

निर्भया

« निर्भया »
Nirbhaya
अजून किती बळी पडाव्यात
बालकं, स्त्रिया अन् निर्भया
आहे गुन्हेगाराची एकच 'जात'
करू नये कसलीही दयामाया

फाशीच शिक्षा होऊ शकते
त्या विकृत नराधमांना
धाक, जरब बसेल मग
कथित अन् रानटी भावनांना

• रघुनाथ सोनटक्के
    8805791905
ईबुक: https://dl.orangedox.com/cs0YIg

हार्दिक स्वागत

« हार्दिक स्वागत »
आमच्या जातीला द्या आरक्षण
तरच तुमचं 'हार्दिक' स्वागत आहे
पक्ष, संघटनांचं फायदेशीर राजकारण
हरेक धंद्येवाईक म्हणुन वागत आहे

कुणी करेल विकासाची बात
बघू जनतेला कुणाचं 'पटेल'
कळेल कुणाचं खणखणीत नाणं
अन् कुणाचं भांडं फुटेल

• रघुनाथ सोनटक्के
   8805791905
ईबुक: https://dl.orangedox.com/cs0YIg

सोमवार, २० नोव्हेंबर, २०१७

खरपूस वात्रटीका : भाग १


माझं पहिलं ईबुक प्रकाशित झालं आहे,

डाउनलोड करून वाचा आणि अभिप्राय कळवा.
https://drive.google.com/open?id=17Pl-1nitFY5TsWv0HgfC5xzk3wh26YTg

https://drive.google.com/open?id=17Pl-1nitFY5TsWv0HgfC5xzk3wh26YTg

शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०१७

आपलं सरकार

« आपलं सरकार »
बाकी आहेत अजुन दोन वर्ष
आला जाहिरातबाजीला ऊत
करोडो रुपयांचं बजेट लावुन
बसवलं वेड्या विकासाचं भुत

दोनवर्षाआधीच निवडणुकीचे
ढग कसे बरसायला लागले
न केलेल्या कामाच्याही जाहिरातीत
जुने 'लाभार्थी' झळकायला लागले

प्रचाराचं पिक हंगामा आधीच
मस्त अन् जोमदार आहे
कळेलच थोड्या वर्षांनी
'आपलं सरकार' किती दमदार आहे
• रघुनाथ सोनटक्के
मो. 8805791905

गुरुवार, ९ नोव्हेंबर, २०१७

नोटबंदीची वर्षपूर्ती

नोटबंदीची वर्षपूर्ती
कधी देशभक्ती, कधी डिजीटल
तर कधी भ्रष्टाचारमुक्तीचं नाव
दिडशे लोकांनी जीव गमावुनही
विकासदर कुठं गेलाय राव?

कुणाची स्तुतीसुमनं
कुणी काळा दिवस पाळतो
भ्रष्ट, श्रीमंतचोर मात्र सेफ
शेवटी गरिबच पोळतो

रांगा लावुन, नोटा बदलून
काय साध्य झालं अंती?
भ्रष्टाचाराला आळा घालणं सोडा
अन् फसवी झाली नोटबंदी
• रघुनाथ सोनटक्के
मो. 8805791905

गुरुवार, २ नोव्हेंबर, २०१७

दरवाढ

« खरपुस वात्रटिका »
दरवाढ
दरवाढीने मारला 
सामान्याच्या कमाईवर डल्ला
'विकास' झाला वेडा
जनता करायला लागली कल्ला

गावातल्या 'उज्वला'साठी
दिली गॅसची टाकी
दरवाढीने आता आणले 
सार्‍यांच्या नऊ नाकी

कधी पेट्रोल-डिझेल
आता गॅसची दरवाढ
बंद झालंच कि जवळपास
मिळालेले अनुदान
• रघुनाथ सोनटक्के
8805791905






बुधवार, १ नोव्हेंबर, २०१७

फेरीवाले

« खरपुस वात्रटिका »
      फेरीवाले
कुणाला हवेत फेरीवाले
कुणाला नको त्यांचा जाच
कुणी बघतं 'मराठी' आहे का?
तर कुणी करतं उगाच वाद

केलं जरी 'राज'कारण
जनतेला सारं कळतं
सत्तेशिवाय कुठं कुणाला
शहाणपण 'असं' मिळतं?

जबाबदारी झटकुन मोकळे 
होतात सत्ताधार्‍यांचे हात
जो करेल प्रवाशांची सोय
त्याला मिळेल जनतेची साथ
• रघुनाथ सोनटक्के
   मो. 8805791905