शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०१७

बुलेट विकास

  « वात्रटिका »
बुलेट विकास

सरकार आमचे सुपरफास्ट
'बुलेट' ट्रेन आणायला लागले
साधे पुल, प्लॅटफार्म नाहीत
बघा किती 'विकास' करायला लागले

हकीकत वेगळीच आहे

स्वप्नांचे इमले बांधायला लागले
घरात नाही ज्वारीचं पिठ
पुरनपोळीचे आवतन यायला लागले

जमिनीवर पाय शाबुत ठेवा

तुम्ही तर हवेत उडायला लागले!
जनतेला सोडून वार्‍यावर
कुठे सरकारधर्म पाळायला लागले?

• रघुनाथ सोनटक्के 

  मोबा. 8805791905


वऱ्हाडी रूपांतर
बुलेट ईकास

सरकार आम्चं सुपरफास्टं
'बुलेट' टेरेन आनुन राह्यले
साधे पुल, प्लॅटफार्म नाहीत
तुमीच पा किती 'ईकास' करून राह्यले

हकीकत अलगच आहे

सपनाचे ईमले बांदुन राह्यले
घरात नाही जवारीचं पिटं
अन् पुरनपोया रांदुन राह्यले

जमिनीवर पाय शाबुत ठेवा
तुमी तं हवेत उळून राह्यले!
जनतेला सोळून वार्‍यावर
कुठे सरकार धर्म पाळुन राह्यले?

• रघुनाथ सोनटक्के 

  मोबा. 8805791905

  

मंगळवार, २६ सप्टेंबर, २०१७

महागाई

« खरपुस वात्रटिका »
महागाई
महागाईनं मुश्किल झालं
सर्वसामान्यांचं जीनं
जागतिकदर कमी तेलाचे
तरी जनतेच्या तोंडाला पानं

सरकार काढतंय हिस्सा
वाढताच आहे अधिभार
जनता मात्र खात आहे
तोंड दाबुन बुक्याचा मार

पैश्याने उतरतो कधी
चढतो रूपयाने तेलाचा भाव
कोणतंही सरकार बधत नाही
जरी केली कितीही कावकाव
• रघुनाथ सोनटक्के
  फोन: 8805791905
  ब्लाॅग: https://vatratika.blogspot.in

(१ जून २०१८ च्या 'दै. युवा छत्रपती' मधे प्रकाशित)
http://yuvachhatrapati.com/epaper/edition/279/june/page/2

१९ सप्टेंबर २०१८ च्या दै. पथदर्शी मध्ये प्रकाशित तसेच ५ जून २०१८ च्या दै. डहाणू मित्र मध्ये प्रकाशित 
४ जुलै २०२० दै. आदर्श महाराष्ट्र 
Vatratika, Raghunath Sontakke

मंगळवार, १९ सप्टेंबर, २०१७

निर्णय

« निर्णय »
बाहेर पडायचं कधी ?
मुहूर्त अजुन मिळाला नाही
सोबत तर आहोत सत्तेसाठी
युतीचाही 'अर्थ' कळाला नाही

आमदारांचीच कामं होत नाहीत
तिथं आम जनतेचं काय
मंत्रीपदं म्हणजे झाली फक्त 
सरकारी झुल हाय

निर्णय काय होत नाही
दोन वर्ष अजुन बाकी आहे
'वाघाचं' मन दोलायमान
'डरकाळी' नसुन 'झाकी' आहे

• रघुनाथ सोनटक्के 

  8805791905