शुक्रवार, २८ जुलै, २०१७

भ्रष्टा'चारा'चा पारा

« भ्रष्टा'चारा'चा पारा »
'भ्रष्टा'चे इरादे होणार ना सफल
पुत्रानेच तुम्हाला 'नमो'वलं
हातचं सारंच जाईल हळूहळू
जेवढं तुम्ही आजपर्यंत कमावलं

मार्ग आमच्या 'निती'चा

अन् जनतेच्या हिताचा आहे
'खेळ' बघा कसा जमला
प्रश्न आता बहूमताचा आहे

उघड होतील किती घोटाळे

खाली त्यांचा पारा नाही
तुरूंगात जाण्याशिवाय आता
राहिला तुम्हा कुठे 'चारा' नाही



         • रघुनाथ सोनटक्के
     8805791905

बुधवार, १२ जुलै, २०१७

मन कि बात


मन कि बात 
कुठं धुमसतं काश्मीर 
कुठं घडतं अमर'नाथ' आहे
खंबीर 'राज' असलं तरी 
जनतेला कुठं त्यांची 'साथ' आहे 

त्यांचे हल्ले, आमचे मिशन 
आमचे शहीद, त्यांना कंठस्नान आहे 
करतो आम्ही 'मन कि बात' 
परदेशातच आमचं जास्त ध्यान आहे 

सिमेवर सैनिक हुतात्मा 
शेतकऱ्याच्या गळ्यात फास आहे 
हातचं सोडून धावणारी 
रणनिती आमची 'खास' आहे 
• रघुनाथ सोनटक्के

  संपादक । रसिक ई-मॅगझिन
  ब्लाॅग: https://vatratika.blogspot.in

शुक्रवार, ७ जुलै, २०१७

वृक्षारोपण

« वृक्षरोपन »



गेल्यावर्षी रोपन केलेले 
गेलेत कुठे वृक्ष ?
मागचं सपाट झालं
पुढचं कोटींचं लक्ष !


जनतेला फसवुन करू नका
पर्यावरणाचा र्‍हास
कधीतरी उघडं होईलच
तयार केलेला भास


अजुन किती शिकवणार
वृक्षसंवर्धनाचा लेसन
प्रत्येकाने लावा एक झाड
घाला वृक्षतोडीला वेसन


• रघुनाथ सोनटक्के
  संपादक । रसिक ई-मॅगझिन
  ब्लाॅग: https://vatratika.blogspot.in