मंगळवार, २७ जून, २०१७

लॉकर

« खरपुस वात्रटिका »
लॉकर
Raghunath Sontakke

लॉकर मधील मुद्देमालाची 
बँकही घेत नाही आता हमी 
ग्राहकांकडूनच पैसे उकळण्याची
शक्कल आहे त्यांची नामी 

कागदपत्र, सोनं-नाणं 
ठेवतो आपला अनमोल ठेवा 
आयत्या बिळावरचा आवडतो 
बँकेला खायला मस्त मेवा 

जुनं ते सोनं हेच खरं 
आता घरात करावी का तिजोरी 
आपल्याच पैश्यावर नफा  
मग का ऐकावी त्यांची मुजोरी 
रघुनाथ सोनटक्के 

सोमवार, २६ जून, २०१७

निकषाची कर्जमाफी

« खरपुस वात्रटिका »
निकषाची कर्जमाफी
Raghunath Sontakke
निकषाच्या पात्रतेवर
उतरतील जे खरे
त्यांचेच केल्या जातील
सातबारे कोरे

झाले जेवढे ते ठिक
पेव आंदोलनाचे आणु नका
ताणल्या जाते म्हणुन
उगाच जादा आता ताणु नका

तुमचा हंगाम असतो बारामाही
त्याला आता पेरू द्या
विरोधकाचा रणनितीचा भाग
त्यांना किती घेरायचं ते घेरू द्या
रघुनाथ सोनटक्के
  8805791905
  https://vatratika.blogspot.in

शुक्रवार, १६ जून, २०१७

कर्ज माफी कि मुक्ती

« वात्रटिका »

(रघुनाथ सोनटक्के यांच्या खरपुस वात्रटिका)

कर्ज माफी कि मुक्ती
• • •
कुणाला हवी कर्जमाफी
कुणी म्हणतो कर्जमुक्ती
कोण करेल भुकंप कधी?
कुणाची मध्यावधीची दर्पोक्ती

सुटणार नाही खरा बळी
लागु द्या आणखी थोडा काळ
घेवु नये सधन, लखपतींनी
शिजवुन आपली डाळ

• रघुनाथ सोनटक्के
  8805791905

मंगळवार, १३ जून, २०१७

बढाई


बढाई

ना त्यांचा खरा होता 
ना ह्यांचा खरा होता 
शेतकऱ्याने दिलेला लढा
आपलाच असल्याचा होरा होता

तुम्ही तर नावालाच विरोधी 
सत्तेसाठी लढाई आहे 
शेतकऱ्याच्या दुःखाचं केलं भांडवल 
वरचढ होण्यासाठी बढाई आहे 

• रघुनाथ सोनटक्के
8805791905

गुरुवार, ८ जून, २०१७

कर्जाचा फास

कर्जाचा फास 

त्यांनी केलं 'सिंचन'
तुम्ही कुठे दिला भाव 'हमी'
तरी का झाल्या नाही
बळीच्या आत्महत्या कमी 

तुमचाही होता नारा 
'सबका साथ सबका विकास'
मग का बरं आहे अजुन 
गळ्यात कर्जाचा फास 

पाहू नका अंत आता 
पडेल कधी, कुठे बाँम्ब 
मग पडेल तुम्हाला सारी 
पळता भुई लांब 

• रघुनाथ सोनटक्के 
8805791905