गुरुवार, २७ एप्रिल, २०१७

हातावर तुरी

हमीभाव

आधी म्हणायचे
पिकवा कडधान्य, तुरी
अाता मात्र हमीभावाची
शेतकर्‍याच्या गळ्यावर सुरी

आधी त्यांना कैवार होता
अाता बंधनाचा फास आहे
पिकवणार्‍याचा सातबारा गहाण
व्यापारी खातो नफ्याचा घास आहे

नाही म्हणायचं नाही
पाहिजे ते करायचं नाही
संपला काय तुमचा बारदाणा
आता काय आहे ते पण भरायचं नाही

फिकवतो त्याला
आता हमी नाही तर भाव द्या
काहीच उरलं नाही त्याच्या हाती
तुम्हीच आता त्याला नवं नाव द्या

उरलेत किती दिवस
सुधारा आता तरी
नाहीतरी देतच आहात 
नेहमीच हातावर तुरी
   
• रघुनाथ सोनटक्के
   8805791905

चाबुक आणि संघर्ष

« वात्रटिका »

चाबुक आणि संघर्ष


शेतकर्‍यासाठी कुणाचा 'संघर्ष'
कुणी आेढला 'चाबुक' आहे
आम्ही विजयाच्या नशेत
आसन आमचे शाबुत आहे

विकासाची आणली यांनी लाट
शेतकर्‍याच्या सदा 'पाठीशी' आहे
विसरू नका तुम्ही 'त्यांचा' इतिहास
आधीचा अनुभव 'गाठीशी' आहे

• रघुनाथ सोनटक्के
8805791905

रविवार, १६ एप्रिल, २०१७

नारायणाचे गार्‍हाणे

नारायणाचे गार्‍हाणे
पक्षात आता मला वाव नाही
एकच माझा 'नारा' आहे
स्वपक्षीयावर चिखल किती फेकू
त्यांच्यापेक्षा मि किती बरा आहे

विरोधात राहून किती दिवस
गात आहे स्वपक्षीयांचे गार्‍हाणे
उडी मारायला तयार आहे मी
थकलो आता सततच्या पराभवाने

सत्तेसाठी काहीही करू
गाऊ आता किती स्वकियांचे गार्‍हाणे
सुटला होता 'बाण' कधीचा
शोभेल आता 'हात' टवटवीत कमळाने

• रघुनाथ सोनटक्के
8805791905

पाकचा उद्दामपणा

पाकचा उद्दामपणा

दहशतवादाची मुळभुमी असुनही
पाकच्या उलट्या बोंबा
हेरेगिरीचा ठपका ठेवुन फाशी
देते फक्त त्यालाच शोभा

अपहरण करून फाशी
पाकचा उद्दामपणा कायम आहे
कुरापती काढणे हा तर
त्याचा नापाक व्यायाम आहे

काय नाहीच त्या पाकमधे
करायला त्यांची हेरेगिरी
संन्याशाला देवुन फाशी
चोर करतोय बघा शिरजोरी

कळून चुकलं जगाला
कोण पाक अन् नापाक आहे
काश्मिर मिळणं अशक्य
शेवटी भारत तुमचा बाप आहे
• रघुनाथ सोनटक्के
  तळेगाव, पुणे
  8805791905

गुरुवार, ६ एप्रिल, २०१७

कर्जमाफीचं माॅडेल

कर्जमाफीचं माॅडेल
माॅडेलचा विचार करा
बघुन या 'उत्तर', तामिळनाडू
बदलाची काय भाषाच फक्त
बदला धोरण वेळकाढू

कर्जमाफीच्या टाॅनिकने करा
'हिल' आत्महत्येचा रोग
हवालदील शेतकर्‍याला बदलण्याचा
येईल कधी बरा 'योग'
• रघुनाथ सोनटक्के©
मो. 8805791905
(http://vatratika.blogspot.in येथे भेट द्या.)